Sunday, 27 March 2016

नोटीस ऑफ लिस पेंडन्स-मोहसिन शेख

नोटीस ऑफ लिस पेंडन्स बाबत अनेक तलाठी मित्रामध्ये ७-१२ उताऱ्यावर नोंद करणेबाबत संभ्रमावस्था दिसून येते. नोटीस ऑफ लिस पेंडन्स बाबत मुलभूत माहिती किंवा याचा उद्देश माहित नसलेमुळे ही संभ्रमावस्था निर्माण होते किंवा बरेच वेळा वरिष्ठ कार्यालयातून उचित मार्गदर्शन मिळत नाही व अर्जदार यांचा विनाकारण रोष तलाठी व मंडळ अधिकारी यांचेवर राहतो.बरेच वेळा तहसिल कार्यालयातून “योग्य त्या कार्यवाहीसाठी” किंवा “नियमानुसार उचित कार्यवाहीसाठी” पत्र प्राप्त होतात व तो नियम आपलेला शोधणे क्रमप्राप्त ठरते किंबहुना आपलेला याशिवाय पर्याय नसतो.अशावेळी आपण योग्य वाचन,नियमांची माहिती व परिपत्रकांचा अभ्यास केलेस आपला व्यर्थ वेळ वाया जाणार नाही . नोटीस ऑफ लिस पेंडन्स बाबत अशी परिस्थिती बरेच मित्रांची होते व त्यांना वकिलामार्फत ही नोंदी बाबत नेहमी विचारणा होत राहते अशा वेळी नोटीस ऑफ लिस पेंडन्स या दस्ताविषयी आपणास मुलभूत माहिती असलेस अडचण येणार नाही.या लेखात या दस्ताविषयी खालीलप्रमाण माहिती देणेत आली आहे.


 1. नोटीस ऑफ लिस पेंडन्स म्हणजे काय ?
 2. नोटीस ऑफ लिस पेंडन्स दस्त नोंदविल्यास त्याचा नेमका काय उपयोग/परिणाम होतो
 3. नोटीस ऑफ लिस पेंडन्सच्या दस्तास किती नोंदणी फी देय आहे ?
 4. नोटीस ऑफ लिस पेंडन्स ची नोंद ७-१२ वर करता येते का ?  कायदेशीर तरतूद आहे काय?
 5. महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम १९६६ चे कलम १४८(क) काय आहे ?
 6. नोटीस ऑफ लिस पेंडन्स ची नोंद करताना तलाठी यांनी कोणती दक्षता घ्यावी ?
 7. कायदेशीर तरतुदी व परिपत्रके व मा.मुबई उच्च न्यायालय यांचा निकाल 
हे सर्व pdf स्वरुपात प्राप्त करणेसाठी खालील लिंक वर क्लिक करा 

लेख:-मोहसिन शेख ,तलाठी ता.कर्जत जि.अहमदनगर 
Email:-mohsin7128a@gmail.com
Blog:-mohsin7-12.blogspot.in
contact:-9766366363

Thursday, 24 March 2016

मुद्रांक विभागातील काही महत्वाच्या व्याख्या

महाराष्ट्र मुद्रांक अधिनियमातील अनेक तरतुदीचा महसूल विभागाशी संबंध येतोच अशावेळी मुद्रांक विभागाकडून सर्वसामान्यपणे नोंदविले जाणारे दस्त व त्यांची माहिती आपलेला असणे अनिवार्य ठरते.मुद्रांक अधिनियमातील अशाच महसूल संदर्भातील व्याख्या या ठिकाणी संकलित केल्या आहेत.

 • बंधपत्र (Bond) म्हणजे काय?
 • अभिहस्तांतरणपत्र (Conveyance) म्हणजे काय?
 •  बक्षिसपत्र/ दानपत्र (Gift Deed) म्हणजे काय?
 •  वाटणीपत्र (Partition Deed) म्हणजे काय?
 • भाडेपट्टा (Lease Deed) म्हणजे काय?
 • गहाणखत (Mortgage deed) म्हणजे काय?
 •  मुखत्यारनामा (Power of Attorney) म्हणजे काय?
 • संव्यवस्था (Settlement) म्हणजे काय?
 • स्थावर मालमत्ता (Immovable Property)म्हणजे काय?
 • जंगम मालमत्ता (Movable Property)म्हणजे काय?
PDF  स्वरुपात प्राप्त करणेसाठी खालील लिंक वर क्लिक करा

मुद्रांक विभागातील काही महत्वाच्या व्याख्यासंकलन:-  मोहसिन शेख
तलाठी–ता.कर्जत,जि.अहमदनगर
Email:-mohsin7128a@gmail.com
Blog:-mohsin7-12.blogspot.in
Contact:-9766366363


Tuesday, 15 March 2016

वारस कायदा -ऍड.लक्ष्मण खिलारी ,पुणे

भारतीय वारसा हक्क कायदा 1925 प्रमाणे जर एखाद्या व्यक्तीने जिवंत असताना आपले इच्छापत्र किंवा मृत्युपत्र करून ठेवले असेल, तर त्याची अंमलबजावणी म्हणजे मालमत्तेचे हस्तांतरण त्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर कायद्यातील कोणत्याही तरतुदींच्या अगोदर होते; मात्र अशाप्रकारचे इच्छापत्र किंवा मृत्युपत्र केलेले नसेल, तर सदर व्यक्ती विनामृत्युपत्र मृत झाली असे समजण्यात येते आणि कायद्यातील तरतुदी मिळकत या हस्तांतरासाठी अस्तित्वात येतात. सदर मृत व्यक्तीची मिळकत वारसा हक्काने संबंधित वारसांना प्राप्त होते. मृत व्यक्तीची मिळकत त्या मृत व्यक्तीस लागू पडत असलेल्या वारसा कायद्याप्रमाणे वारसांनाच मिळते.अशा वारस कायद्यातील मुलभूत तरतुदी अंत्यत मोजक्या व सोप्या भाषेत समजावून सांगणारा लेख ऍड.लक्ष्मण खिलारी ,पुणे यांनी लिहलेला असून हा लेख वाचून आपले खालील बाबी स्पष्ट होतील.

 • हिंदू वारसा कायदा 1956 नुसार वारसांचे चार वर्ग कोणते ?
 • वारसांची नियामवली कशी आहे ?
 • वर्ग 1 वर्ग 4 यामधील उत्तराधिकारांचा नियम व क्रम 
 • हिंदू स्त्रीची मिळकत
 • विनामृत्युपत्र मृत हिंदू स्त्रीच्या संपत्तीची विल्हेवाट ठरविण्याचा क्रम व नियम- 
 • नात्यातील क्रम 
 • गर्भातील अपत्याचा हक्क 
या सर्व बाबी pdf स्वरुपात प्राप्त करणेसाठी खालील लिंक वर क्लिक करा.लेख:- ऍड.लक्ष्मण खिलारी ,पुणे
संकलन:- श्री.मोहसिन शेख ,तलाठी
तालुका-कर्जत जिल्हा-अहमदनगर
Email:-mohsin7128a@gmail.com
Blog:-mohsin7-12.blogspot.in
Contact:-9766366363

Thursday, 10 March 2016

मे.अंडरसन साहेब यांचे मुलकी हिशेबाचे पुस्तकाचे मराठी भाषांतर आवृत्ती

🚹मे.अंडरसन साहेब यांचे इंग्रजी पुस्तकाचे मराठी भाषांतर केलेल्या पुस्तकाची प्रस्तावना ✍🏻


नामदार मुंबई सरकारचे हुकुमावरून मे.एफ.जी.एच अंडरसनसाहेब,एम.ए,आय.सी.एस यांनी मुलकी हिशोबाचे पुस्तक तयार करून त्याची पहिली आवृत्ति सं १९१५ साली प्रसिद्ध केली.त्यानंतर मुलकी हिशाबामध्ये पुष्कळ फेरफार होऊन नवीन पुस्तक सन १९३१ मध्ये तयार होऊन प्रसिद्ध झाले.या पुस्तकावरून गावाचे हिसेबापुरता भाग कुलकर्णी,तलाठी व फक्त मराठी जाणणारे कारकून यांचे माहितीसाठी मरठीतून प्रसिध्द करावे असे सरकारने ठरवून हे काम आमचे कडेस सोपवनेत आले होते.इंग्रजी पुस्तकातील सर्व मजकुराचे हे पुरे भाषांतर नाही.क्वचित घडणाऱ्या काही गोष्टी व ज्यांचा संबंध गावाचे कुलकर्ण्याशी न येत फक्त मामलेदार व तालुका कचेरी यांचेशी येतो ,अशा काही मजकुराचे भाषांतर बुकाचा आकार निष्कारण न वाढवा म्हणून गाळले आहे.तसेच इंग्रजी शब्दाचे केवळ शब्दशः भाषांतर न करता सोपी भाषा वापरणेचा हरप्रयत्न केला आह. व जेथे मूळ पुस्तकाचे निव्वळ भाषांतराने अडचणी येणेचा संभव दिसला,अशा ठिकाणी खुलाशासाठी ज्यादा वाक्य व शब्दही दाखल केले आहेत.तथापि जेव्हा एखादे हुकमाचे अर्थसंबंधाने  शंका येईल किंवा भाषांतर एकदा मुद्दा न आलेमुळे त्या संबंधाने हुकुमाची आवश्यकता वाटेल तेव्हा मामलेदार यांजकडे कळवावे,म्हणजे इंग्रजी पुस्तक पाहून ते खुलासा करतील.

आर.टी.देव ✍🏻
पारोळे,तारीख  ८ मे १९३२


🔴🔴🔴🔴🔴🔴🔴🔴🔴

आर.टी.देव,मामलेदार,पारोळा,यांनी सन 1932साली मराठी भाषांतर केलेले Anderson manual- Pages -230 
या पुस्तकांच्या शासकीय प्रति पाहिजे असलेस ९७६६३६६३६३ नंबर वर whatsapp message करून मागणी कळवा
mohsin7-12.blogspot.in
9766366363
⚫⚫⚫⚫⚫⚫⚫⚫⚫

Sunday, 6 March 2016

कृषिनिर्णय -मासिक'

🌿🌿🌿🌿🌿🌿🌿
'कृषिनिर्णय -मासिक'
🌿🌿🌿🌿🌿🌿🌿
'वाचाल तर वाचाल'
 नियमित वाचा
    'कृषिनिर्णय'
🌿🌿🌿🌿🌿🌿🌿
कृषिनिर्णय मासिक सभासद नोंदणीसाठी बँक तपशिल

बँकचे नाव-सेंट्रल बँक ऑफ इंडिया
शाखा-चांदा.
खात्याचे नाव- कृषिनिर्णय
खाते नं-3456777849
IFSC CODE-CBIN0281750

🌷कृषिनिर्णय मासिक किंमत=30₹🌷
🌷वार्षिक=300₹🌷

     ✅डी.डी.चेक,मनीऑर्डर,खात्यावर रोख,ट्रान्सफर किंवा NEFT ने नोंदणी करता येईल.

✅ डी.डी."कृषिनिर्णय"या नावाने काढावा.

✅ चेक ACCOUNT PAYEE असावा.

✅ वर्गणीदार कोणत्याही महिन्यापासून होता येते.

✅ आपले संपूर्ण नाव ,पिनकोडसह पत्ता 9822347348 या WHATSAPP क्रमांकावर पाठवावा.

✅ खात्यात रक्कम भरल्यास त्या पावतीची फोटो काॅपी 9822347348 या WHATSAPP क्रमांकावर पाठवावा.

✅ नाव ,पिनकोड किंवा पत्ता चुकीचा असेल तर अंक न मिळाल्यास "कृषिनिर्णय"जबाबदार राहणार नाही.

➡➡➡➡➡➡➡

पत्रव्यहाराचा किंवा चेक,मनीऑर्डर पाठवण्याचा पत्ता⬇⬇⬇

संपादक-कृषिनिर्णय
चांदा.ता.नेवासा जि.अहमदनगर(महा)
414606
ऑ.फोन:(02427)234761
मो.9822347348
Email: krushinirnay@gmail.com

मंडळाधिकारी यांचे न्यायालयातील तक्रार केस

फेरफार नोंदवही मध्ये नोंद केलेनंतर तलाठी सदर नोंदीबाबत काही आक्षेप असलेस 15 दिवसांची मुदत देऊन तलाठी कार्यालयात कळविणे बाबत हितसंबंधित व्यक्तींना नोटीस बजावतात.उक्त 15 दिवसात एखाद्या हितसंबंधित व्यक्तीने अशा नोंदीबाबत हरकत घेतल्यास तलाठी हे सदर हरकतीची नोंद गाव नमुना- 6अ विवाद ग्रस्त प्रकरणांची नोंदवही यामध्ये नोंद करून त्या नोंदीचा सदर नोंदीबाबत प्राप्त अर्ज ,फेरफार,तक्रार अर्ज,व गाव नमुना 6अ ची नक्कल जोडून तालुक्यात पाठवतात.अशा नोंदी पुढे तक्रार केस चालवण्यासाठी मंडळ अधिकारी यांचेकडे येतात अशा वेळी वादी व प्रतिवादी यांना नोटीस बजवावी लागते व त्यांचे लेखी युक्तिवाद घ्यावे लागतात.तसेच वेगवेगळ्या फेरफार मध्ये निकाल कसे देतात व याबाबत पूर्ण कार्यवाही कशी करायची याबाबत माहिती देणारे सदर ब्लॉगवर आजपासून "मंडळाधिकारी " या नावाने चालू करत आहोत त्यामध्ये आज  वादी व प्रतिवादी यांना  बजवणेत येणारी नोटीस नमुना पाहणार आहोत.
सदर नमुना प्राप्त करणेसाठी क्लिक करा.

Saturday, 5 March 2016

विशेष अर्थसहाय्य योजना अंमलबजावणी

'विशेष अर्थसहाय्य योजना'  महसूल विभागामार्फत राबवले जातात. या योजनांचे लाभार्थी  निकष,आवश्यक कागदपत्रे ,व याबाबत कोणते शासन निर्णय आहेत याबाबत अनेकांना माहिती मिळत नाही.कागदपत्रे गोळा करताना अडचणी येतात व कोणत्या योजनेत कोणता लाभार्थी पात्र ठरू शकतो हेही  ठरवता येत नाही.त्यामुळे योजनांची माहिती असलेस योग्य लाभार्थी निवड करणेस व त्यांना सदर योजनेचा लाभ तात्काळ देणे शक्य होईल म्हणुन खालील योजनांची माहिती शासन निर्णय,लाभार्थी,निकष,आवश्यक कागदपत्रे व अनुदान या स्वरुपात एकत्र दिली आहे.
 • संजय गांधी निराधार अनुदान योजना 
 • श्रावण बाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना 
 • इंदिरा गांधी वृध्दपकाळ  निवृत्ती वेतन योजना 
 •  इंदिरा गांधी अपंग निवृत्ती वेतन योजना 
 • राष्ट्रीय कुटुंब अर्थसहाय्य योजना 
 • आम आदमी विमा योजना 
या योजनाची माहिती प्राप्त करणेसाठी खालील लिंक वर क्लिक करा 

Tuesday, 1 March 2016

कार्यालयीन व्यवस्थापन भाग-3

दैनदिन कार्यालयीन  कामकाज करताना अनेक अडचणी येतात.कार्यालयीन व्यवस्थापन व कार्यालयीन कामकाज कसे करावे याबाबत माहिती असलेस कामकाज करणे सोयीस्कर होते.या सर्व अडचणींचा अभ्यास करून यशदा प्रशिक्षण संस्था पुणे यांचे  मार्फत DoPT:-Iduction Training programme अंतर्गत विविध विषयावर मार्गदर्शन अहमदनगर महसूल प्रबोधीनी मध्ये करणेत येते. त्यापैकी कार्यालयीन व्यवस्थापन हा 3 भागात असलेला विषय यशदा,पुणे  मार्फत pdf स्वरुपात तयार करणेत आलेला आहे.त्यातील तिसरा व अंतिम  भाग आज प्रकाशित करत आहोत.कार्यालयीन व्यवस्थापन भाग3   मध्ये खालील मुद्द्यांवर माहिती दिली आहे.
 • पत्रव्यव्हाराचे प्रकार 
 • साधे पत्र ,अर्धशासकीय पत्र,
 • अनौपचारिक संदर्भ 
 • ज्ञापन 
 • पृष्ठंकन 
 • परिपत्रक ,कार्यालयीन आदेश,अधिसूचना
 • प्रसिद्धीपत्रक,शासन निर्णय 
 • सहा गठ्ठा पद्धती
 • दप्तर दिरंगाईस प्रतिबंध 
 • बैठकांचे आयोजन 
 • बैठकीचे इतिवृत्त 
संदर्भ:- यशदा प्रशिक्षण संस्था पुणे
हा लेख प्राप्त करणेसाठी खालील लिंक वर क्लिक करा
कार्यालयीन व्यवस्थापन भाग-3