*ग्रामपातळीवरील राजस्व कार्यपद्धती-एक विवेचन*
तलाठी,मंडळ अधिकारी तसेच महसूल अधिकारी व कर्मचारी यांना ग्राम पातळीवरील राजस्व पद्धती सर्वाना माहिती व्हावी यासाठी सोप्या आणि सहज भाषेत हे पुस्तक पारनेर तलाठी मित्र परिवार यांनी सन 1990 मध्ये प्रकाशित केले.
*प्रस्तावना*
पारनेर उप-विभागाच्या तलाठी मित्र मंडळाचे हे पहिलेच पुस्तक आपल्या हाती देताना आम्हाला अत्यंत आनंद होत आहे. हे मित्र मंडळ म्हणजे काही प्रकाशन संस्था नाही. मात्र जी दुर्मिळ माहिती आमच्या सर्व तलाठी बांधवांना व इतर अधिकाऱ्यांना सतत आवश्यक असते ती एकत्र करुन मर्यादित वितरणासाठी प्रकाशीत करणे हा आमचा उद्देश आहे. जमीन महसुल पद्धती व त्यातील समस्या जितक्या गुंतागुंतीच्या तितक्याच त्या पुरातन आहेत. स्वातंत्र्य प्राप्तीनंतर शासनाने विचारपूर्वक जे धोरण अंगिकारले आहे त्या धोरणाशी सुसंगत ठरेल अशी “ हक्क नोंद पद्धती अस्तित्वात येणे निकडीचे आहे कारण त्यावर विविध भुसुधारणा कायद्यांचे यशापयश अवलंबून आहे. ग्रामपातळीपासुन प्रत्येक स्तरावरील महसुल अधिकाऱ्यांना विविध कायदे, नियम, शासन आदेश परिपत्रके, न्यायनिवाडे इ. बाबतची अद्यावत माहिती देणेसाठी वरचेवर प्रशिक्षण देणेची गरज आहे. नाशिक महसूल विभागामध्ये सुरुवातीला नेमणूकीनंतर तलाठी मित्रांना सुरुवातीचे प्रशिक्षण दिले गेले होते. ते फक्त चार गटांपुरते मर्यादित होते. नंतर सेवाकालीन प्रशिक्षणाची व्यवस्था झाली नाही. देशभर आणि जगभर प्रचंड वेगाने माहितीचा स्फोट व संस्करण होत आहे या प्रक्रियेत महसूल प्रशासनाचा महत्वाचा घटक असणारा तलाठी व इतर अधिकारीवर्ग दुर्लक्षिला जाऊ नये असे वाटते. *पारनेर उपविभागाचे सहाय्यक जिल्हाधिकारी मा. श्री. विपीन मल्लीक, व पारनेरचे तहसीलदार श्री. प्रल्हाद कचरे* यांचेशी सतत या विषयावर आम्ही चर्चा करायचो तेच आमचे प्रशिक्षण झाले असे आम्ही समजतो. तेव्हा आम्हाला " हक्क नोंद व इतर संलग्न विषयांवर " लिखीत स्वरुपात काही माहिती उपलब्ध करुन द्या असा आम्हीच त्यांचेकडे आग्रह धरला आणि त्यांनीसुद्धा आमच्या विनंतीचा आदर करुन दैनंदिन कामातून वेळ काढून अभ्यासपूर्वक आणि परिश्रमपूर्वक लिहिलेल्या या पुस्तकाचे हस्तलिखित आम्हाला दिले याबद्दल आम्ही त्यांचे ऋणी आहोत. या पुस्तकामध्ये महसुल पद्धती हक्क नोंदीच्या इतिहासापासुन विविध पैलूंवरती कायदे व नियम यांच्या आधारे माहिती दिली आहे. या पुस्तकाचे वैशिष्ट्य म्हणजे तलाठ्याला त्याचे कर्तव्य म्हणून माहित असाव्यात अशा सर्व वारसा कायद्यांतील महत्वाच्या तरतूदी यामध्ये समाविष्ट करण्यात आल्या आहेत. इतर संलग्न विषयांची माहितीही दिली आहे. काही ठिकाणी संपादकांनी त्यांचे मतप्रदर्शन केले आहे, ते योग्य की अयोग्य यावर वाद करण्याऐवजी आम्ही ते याद्वारे चर्चेसाठी खुले ठेवीत आहोत. या पुस्तकातील माहितीमूळे वाचकांच्या मनातील जून्या प्रथा व नवे नियम या बाबतचा गोंधळ दूर होईल तसेच यातील माहितीचा उपयोग सर्व स्तरावरील अधिका-यांना त्यांच्या कार्यालयीन कामात विदिक्कतपणे करता येईल अशी आमची धारणा आहे. आम्हाला हे पुस्तक लिहून देवून ते प्रकाशीत करण्याची संधी दिली याबद्दल या संपादक द्वयाचे पुनश्च ऋण व्यक्त करतो. हे पुस्तक अल्पावधीत छापून देणेसाठी "शिवशक्ती प्रिंटींग प्रेसचे मालक श्री. शंकरराव हिरणवाळे व त्यांचे कर्मचारी " तसेच वल्लाकटी कर्माशयल आर्टीस्ट, अहमदनगरचे श्री. वेंकटेश वल्लाकटी व सुभाष वल्लाकटी यांनी संदर्भानुरुप मुखपृष्ठ तयार करुन देण्यासाठी जे परिश्रम घेतले, त्याबद्दल आम्ही त्यांचे आभारी आहोत !
*तलाठी मित्र मंडळ, पारनेर उपविभाग, अहमदनगर - प्रकाशन समिती*
१) श्री. तुळशीराम दत्तात्रय काळे कामगार तलाठी. वनकुटे. ता. पारनेर अध्यक्ष
२) श्री. बी. एन. फुलारी कामगार तलाठी, जलालतूर, ता. कर्जत उपाध्यक्ष
३) श्री. एन. के. वायकर कामगार तलाठी, टाकळीलोणार, ता. श्रीगोंदा सरचिटणीस ४) श्री. ए. बी. पवार कामगार तलाठी, राजूरी, ता. जामखेड खजिनदार
५) श्री. एम. एस. खराडे कामगार तलाठी, फक्राबाद, ता. जामखेड सदस्य
६) श्री. एस. एल. निकम कामगार तलाठी, चिलवडी, ता कर्जत सदस्य
७) श्री. एन. एम. गटकळ कामगार तलाठी, काष्टी, ता श्रीगोंदा सदस्य
८) श्री. बी. एम. हिंगे कामगार तलाठी, टाकळी ढोकेश्वर ता. पारनेर सदस्य
९) श्री. बी. आर. दाते कामगार तलाठो, पळशी, ता. पारनेर सदस्य
१०) श्री. एस. वाय. गिरमकर कामगार तलाठी, भानगांव, ता श्रीगोंदा सदस्य
११) श्री. बी. एस. जायभाय कामगार तलाठी, मोहा, ता. जामखेड सदस्य
१२) श्री. डी. एच. रासकर तलाठी, लोणी मसदपूर ता.कर्जत सदस्य
सदरचे हे जुने पुस्तक सर्वाना माहितीसाठी व अभ्यासासाठी ब्लॉग वर उपलब्ध करून देण्यात येत आहे
सदर पुस्तक pdf स्वरूपात प्राप्त करणेसाठी खालील लिंक वर क्लिक करावे 👇👇👇
ग्रामपातळीवरील राजस्व कार्यपद्धती-एक विवेचन
🟡🟠🔴⚫🟣🔵🟢🟡🟠🔴
*लेख-पारनेर उपविभाग तलाठी*
*संकलन-श्री.मोहसिन शेख*
*मंडळ अधिकारी राहाता*
Blog-mohsin7-12.blogspot.com
Mail-mohsin7128a@gmail.com
Contact -9766366363
🔴🟠🟡🟢🔵🟣⚫🔴🟠🟡
No comments:
Post a Comment