Tuesday, 6 November 2018

सूचना

कृपया महसूल विषयी काही प्रश्न असल्यास ते जनपीठ विभागात विचारणे साठी सोय दिलेली आहे त्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा ....ब्लॉग वरील कमेंटला रिप्लाय देता येत नाही .त्यामुळे ब्लॉगवर प्रश्न न विचारता खालील लिंक वर क्लिक करून प्रश्न विचारावेत ...


https://maharashtracivilservice.org/janpith?janid=4943

Friday, 26 October 2018

पैसेवारी रजिस्टर वर्ड फाईल-शिवानंद वाकदकर

                                                  🌿पैसेवारी रजिस्टर🌿


                                                     


पिकपैसेवारी काढताना मंडळ अधिकारी,तलाठी तसेच ग्रामपातळीवर अधिकारी व कर्मचारी यांना बरेच संभ्रम निर्माण होत असतात. यासाठी सोप्या सुटसुटीत भाषेत माहिती देणारे लेख किंवा साहित्य उपलब्ध नव्हते या सर्व बाबींचा विचार करून माझे मित्र श्री. शिवानंद वाकदकर तलाठी-सिंधखेडराजा, बुलढाणा यांनी श्री.संतोष कणसे, तहसिलदार सिंदखेड राजा यांचे मार्गदर्शन घेऊन विस्तृत माहिती देणारा वर्ड फाईल स्वरुपात असणारे साहित्य तयार केले आहे.या वर्ड फाईलचा वापर करून आपल्याला हवे ते बदल करून घेऊन एकाच ठिकाणी सर्व इतिवृत्त व पिक पैसेवारी बाबत माहिती पाहता येईल व तयार करता येईल अशी सोय करण्यात आलेली आहे.सदर वर्ड फाईल आपण संगणकावर प्राप्त करून घेऊन वापरू शकता.या फाईल चा आपणास नक्कीच उपयोग होईल अशी अपेक्षा आहे.

🔵⚫🔴🔵⚫🔴🔵⚫🔵⚫🔴🔵⚫🔴

लेख :-
श्री.शिवानंद वाकदकर
तलाठी -सिंधखेडराजा,बुलढाणा
9822601070    

मार्गदर्शक:-
श्री. संतोष कणसे ,तहसीलदार सिंदखेडराजा
9527941369


संकलन :-

श्री.मोहसिन शेख
मंडळ अधिकारी -मिरजगाव ता.कर्जत
जि.अहमदनगर
9766366363
⚫🔴🔵⚫🔴🔵⚫🔴🔵⚫🔵🔵⚫🔴


पैसेवारी रजिस्टर वर्ड फाईल संगणकावर प्राप्त करण्यासठी खालील लिंक वर क्लिक करा.

Wednesday, 22 August 2018

मंडळ अधिकारी यांनी सादर करावयाचे अहवाल


  • मंडल अधिकारी यांनी सादर करावयाचे अहवाल                                                                                                                 वरीष्ठ कार्यालयाकडुन मंडल अधिकारी यांच्याकडुन अनेक प्रकारचे  अहवाल मागविले जातात. बर्‍याचदा अनेक मंडल अधिकारी हे अपुर्ण माहितीचा, स्वंयस्पष्ट असा अहवाल सादर करीत नाहीत. याला अनेक कारणे असु शकतात, त्यापैकीच एक कारण म्हणजे अहवाल कसा असावा याबाबत मंडल अधिकारी यांचे प्रशिक्षण किंवा माहिती यांना दिली जात नाही. त्यामुळेच अनेकदा चुका होतात. त्यामुळे खालील लेख हा मंडल अधिकारी यांनी वेगवेगळ्या विषयावरील अहवाल बनवताना तो कसा बनवावा, कोणत्या बाबींचा त्यात समावेश असावा, कोणत्या बाबींचा समावेश नसावा आणि काही महत्वाचे अहवालाचे नमुने अवलोकनासाठी व निव्वळ माहितीसाठी सोबत जोडले आहेत. तसेच तलाठी दफ्तराची कपाटात रचना कशी असावी, तलाठी दफ्तराची अभिलेख जतनाची वर्गवारी कशी आहे याबाबत खालील लेखामध्ये सविस्तरपणे मांडणी केलेली आहे. सदर लेख हा बनवण्यासाठी श्री निलेश पाटील, मंडल अधिकारी देवरुख आणि श्री रोहीत पाठक, तलाठी  हरपुडे यांनी विशेष सहाय्य केले आहेत... आपल्या सर्वांच्या माहिती व अभ्यासासाठी सदर लेख.... 👇🏻🙂संकलन व लेख
श्री.शशिकांत जाधव ,नायब तहसीलदार
श्री.निलेश पाटील,मंडळ अधिकारी
श्री.रोहित पाठक, तलाठी

खालील लिंक वर क्लिक करून लेख प्राप्त करून घ्यावा

मंडळ अधिकारी यांनी सादर करावयाचे विविध अहवाल व तलाठी दप्तर बाबत थोडक्यात माहिती

Thursday, 16 August 2018

विभागीय दुय्यम सेवा परीक्षा तलाठी संवर्ग )-२०१८ अहमदनगर विशेष

  
 विभागीय दुय्यम सेवा परीक्षा तलाठी यांनी मुदतीत म्हणजे ४ वर्ष आणि ३ संधी मध्ये उत्तीर्ण होणे आवश्यक आहे.तलाठी संवर्ग विभागीय दुय्यम सेवा परीक्षा यामध्ये ४ विषय बाबत प्रश्नपत्रिका असतात आणि  एक विषय हा मुलाखतीचा विषय असतो.प्रश्नपत्रिका क्रमांक १ व २ हे २५० गुणांचे असून यामध्ये पास होणेसाठी किमान ५०% म्हणजे १२५ गुणांची आवश्यकता आहे. पण अनेक तलाठी या परीक्षे मध्ये नापास होतात कारण प्रश्नपत्रिका कशी सोडवावी याबाबत जास्त माहिती नसलेमुळे हे घडते. महसूल बाबी क्र. १ प्रश्नपत्रिके विषयी आज आपण माहिती घेऊ या. हा विषय  महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम १९६६ व त्याखालील नियम यावर आधारित आहे.यामध्ये मागील प्रश्नपत्रिका चे अवलोकन केले असता बरेच प्रश्न दरवर्षी विचारले जातात.सर्वसाधारण पणे व्याख्या ४० गुणांसाठी विचारले जातात मागील वर्षीची प्रश्नपत्रिका पहिली असता व्याख्या ऐवेजी टिपा व संक्षिप्त माहिती द्या या स्वरूपाचे प्रश्न विचारले गेले आहेत यावर्षीही याप्रकारच्या प्रश्नाचा समावेश होऊ शकतो.सर्वसाधारणपणे व्याख्या लिहिताना महाराष्ट्र जमिन महसूल अधिनियम १९६६ चे कलम २ मधील पोटकलम चा उल्लेख करावा उदा.जमीन मालक व्याख्या विचारलेसमहाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम १९६६ चे कलम २ (१७)नुसार जमीन मालक या संज्ञेचा अर्थ जमीन पट्ट्याने देणारा असा होतो. अशा प्रकारे लिहावी कोणत्याही अधिनियमात व्याख्या या कलम २ मधेच असतात त्यामुळे पोटकलम लक्षात ठेवावे. महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम १९६६ मधील कलम २ मध्ये एकूण ४४ व्याख्या सर्व व्याख्या पाठ कराव्यात याचा तलाठी कामकाज खूप फायदा होतो व संकल्पना ही स्पष्ट होतात.मागील प्रश्नपत्रिका चा विचार करता महत्वाच्या व्याख्या पुढील प्रमाणे दुमाला ,शेतातील इमारत,चावडी ,जमीन महसूल,भोगवटदार,पार्डी जमीन कुळ ,वाडा जमीन ,नागरी क्षेत्र या व्याख्या पाठ कराव्यात व वर सांगितले प्रमाणे कलम २ मधील पोटकलम उल्लेख करून लिहावे.तसेच प्रत्येक मोठा प्रश्न,छोटा प्रश्न किंवा टिप लिहिताना संदर्भ म्हणून म.ज.म अ.१९६६ चे कलम..... असे अधोरीखीत करून उत्तर लिहण्यास सुरुवात करावी.अशा महत्वाचे प्रश्न व त्यांची उत्तरे देणारी pdf तयार केल्या आहेत याचा सर्वाना उपयोग होईल.याचप्रमाणे पेपर क्र २,३ व ४ बाबत माहिती देणारी नोट्स स्वरूपातील pdf तयार केलेल्या आहेत याचा सर्वाना नक्की फायदा होईल.pdf प्राप्त करणेसाठी खालील लिंक वर क्लिक करावे.


Thursday, 12 April 2018

कमी जास्त पत्रक


कमी जास्त पत्रक हा जमिन महसूल नोंदीमधील महत्वाचा भाग आहे.तलाठी किंवा मंडळ अधिकारी यांना बऱ्याच प्रकरणात कमी जास्त पत्रक नोंद कशी घ्यावी याबाबत माहिती नसते किंवा त्याबाबत पुरेसे साहित्य उपलब्ध होत नाही त्यामुळे जलद काम करता येत नाही.कमी जास्त पत्रक बाबत उत्तम असा लेख डॉ.संजय कुंडेटकर सर उपजिल्हाधिकारी परभणी यांनी लिहला आहे हा लेख वाचून खालील संकल्पना स्पष्ट होण्यास नक्कीच मदत होईल.

१.कमी जास्त पत्रक म्हणजे काय ?
२.कमी जास्त पत्रक कोणत्या प्रकरणात केले जाते ?
३.कमी जास्त पत्रक कसे असते ?
४.कमी जास्त पत्रकाचा गाव दप्तरी अंमल कसा द्यावा ?

हा लेख प्राप्त करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा

कमी जास्त पत्रक

Friday, 2 March 2018

महसूल प्रश्नोत्तरे- सुधारित आवृत्ती

महसूल अधिकारी किंवा कर्मचारी म्हणून काम करतांना आपण राज्य शासनाच्या एकूण ३७ शासकीय विभागांपैकी २६ विभागांसाठी दररोज अनेक भिन्न भिन्न कायद्यांतर्गत काम करीत असतो. प्रत्येक कामाबद्दल आपल्याला पुरेसे ज्ञान असतेच असे नाही. त्यामुळे काहीवेळा अजाणतेपणाने आपल्या हातून चुका होतात. कधी कधी याची फार मोठी किंमत मोजावी लागते.  
      महसूल खात्यांत अनेक वेळा तात्काळ निर्णय घ्यावा लागतो. त्यावेळेस अनेक प्रश्न मनात उपस्थित होतात. त्यांची उत्तरे शोधण्याचा प्रयत्न‍ केला तर अनेक कायद्यााची पुस्तके चाळावी लागतात.अनेक अधिकारी/कर्मचारी यांनी विविध प्रकारचे अभ्यासू व अनुभवी मार्गदर्शन करतांना, कायदेशीर तरतुदींवर अनेक उत्कृष्ठ लेख लिहिलेले आहेत. परंतु अशा लेखांतून नेमके उत्तर शोधणे काहीवेळा शक्य होत नाही.

        या गोष्टींचा विचार करून, तातडीच्या वेळेला नेमके उत्तर मिळावे या दृष्टीकोनातून "महसूल प्रश्नोत्तरे" ची रचना केलेली आहे. पहिल्या आवृत्ती मध्ये एकूण ३९१ प्रश्न होते सुधारित दुसऱ्या आवृत्तीमध्ये महसूल विषयक विभाग २४८ प्रश्न ,कुळकायदा विषयक विभाग ५१ प्रश्न,वारस विषयक ११० प्रश्न, न्यायदान विषयक ७६ प्रश्न असे एकूण ४८५ प्रश्न असे भाग करून प्रश्नांचे विविध संच, विषयनिहाय उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केला आहे. विविध प्रश्नांची उत्तरे देतांना, शक्य तिथे कायदेशीर तरतुदी, कायद्यातील कलम आणि न्यायालयीन आदेशांचा संदर्भ दिलेला आहे. यामुळे कायदेशीर अथवा न्या‍यालयीन निकालाचा संदर्भ देऊन निकाल लिहिण्यास किंवा एखाद्या अर्जाला उत्तर देण्यास मदत होईल.  

       "महसूल प्रश्नो्त्तरे" महसूल खात्यातील सर्वच स्तरावरील अधिकारी/कर्मचार्यांसाठी उपयुक्त ठरेल अशी अपेक्षा आहे. "महसूल प्रश्नोत्तरे" मध्ये काही त्रुटी असण्याची शक्यता नाकारता येत नाही. आवश्यक तेथे अद्ययावत तरतुदींचा संदर्भ घ्यावा ही विनंती.

हे पुस्तक प्राप्त करणेसाठी खालील लिंक वर क्लिक करा 

Sunday, 10 December 2017

अभिलेख कक्षातील कागदपत्रांची यादी व वर्गीकरण

  • कोणकोणत्‍या प्रकारची कागदपत्रे असतात? 
  • त्‍यांचे वर्गीकरण कसे करतात? 
  • त्‍यांना किती काळ जतन करायचे ?
  • किंवा नष्‍ट कधी करावे?
  • याबाबत कायदेशीर तरतुदी कोणत्‍या ?
  •  कोणत्‍या कागदपत्रे कोणत्‍या गटात मोडतात 
या सर्व बाबी जाणुन घेणेकरीता लेख व तक्‍ता स्‍वरूपात माहिती तयार केली आहे.PDF वाचणेसाठी येथे क्लिक करा