- मंडल अधिकारी यांनी सादर करावयाचे अहवाल वरीष्ठ कार्यालयाकडुन मंडल अधिकारी यांच्याकडुन अनेक प्रकारचे अहवाल मागविले जातात. बर्याचदा अनेक मंडल अधिकारी हे अपुर्ण माहितीचा, स्वंयस्पष्ट असा अहवाल सादर करीत नाहीत. याला अनेक कारणे असु शकतात, त्यापैकीच एक कारण म्हणजे अहवाल कसा असावा याबाबत मंडल अधिकारी यांचे प्रशिक्षण किंवा माहिती यांना दिली जात नाही. त्यामुळेच अनेकदा चुका होतात. त्यामुळे खालील लेख हा मंडल अधिकारी यांनी वेगवेगळ्या विषयावरील अहवाल बनवताना तो कसा बनवावा, कोणत्या बाबींचा त्यात समावेश असावा, कोणत्या बाबींचा समावेश नसावा आणि काही महत्वाचे अहवालाचे नमुने अवलोकनासाठी व निव्वळ माहितीसाठी सोबत जोडले आहेत. तसेच तलाठी दफ्तराची कपाटात रचना कशी असावी, तलाठी दफ्तराची अभिलेख जतनाची वर्गवारी कशी आहे याबाबत खालील लेखामध्ये सविस्तरपणे मांडणी केलेली आहे. सदर लेख हा बनवण्यासाठी श्री निलेश पाटील, मंडल अधिकारी देवरुख आणि श्री रोहीत पाठक, तलाठी हरपुडे यांनी विशेष सहाय्य केले आहेत... आपल्या सर्वांच्या माहिती व अभ्यासासाठी सदर लेख.... 👇🏻🙂
संकलन व लेख
श्री.शशिकांत जाधव ,नायब तहसीलदार
श्री.निलेश पाटील,मंडळ अधिकारी
श्री.रोहित पाठक, तलाठी
खालील लिंक वर क्लिक करून लेख प्राप्त करून घ्यावा
मंडळ अधिकारी यांनी सादर करावयाचे विविध अहवाल व तलाठी दप्तर बाबत थोडक्यात माहिती
17 comments:
माझी जमीन विकून त्याच पैशावर लगेच दुसरी जमीन घेतली तर मी भूमिहीन होऊ शकतो का?
लिंक वर काही प्रॉब्लेम आहेत काय ?
फेरफार करण्यासाठी किती काळ लागतो
Nice
उत्पन्न दाखला रु.२१०००/- वार्षिक (अत्यल्प उत्पन्न गट) असा काढायचा असेल तर मंडल अधिकारी यांचा चौकशी अहवाल जोडा असे सांगितले आहे.तो कसा काढावा?.
मला EWS प्रमानपत्र काढायचे आहे त्यासाठी मंडल अधीकार्यांचा अहवाल सांगीतला आहे कसा काढावा
गृह चौकशी अहवाल कुणाला मागावा??
Mandal adhikari yancha kade lok ayuktani choukashi ahaval magavla pan amchi ji takrar hoti tyacha ulekh tya ahvalat alach nhi ata kay karu shkato
Respected sir mazhe nav vishal Prabhakar kalinkar ahe me khamgaon dist buldhana yethil rahivasi asun me hiwara bk yethe shet gat nu 89 kharedi kele ahe sadar shetivar pik karj aslyane mandal Adhikari shri gawande yani arjdar yanche navane ferfar nond karnyas nakar dila tya mule sadar nond hou shakali nahi tasech yababat nond karu naye ase kahi shasan nirnay ahe Kay tasech pik karj asatana tya shetichi nond kharedi karnarya che navane hou shakte Kinwa kase yababat margdarshan karave hi vinanati
मी बक्षीस प्रत केले आहे जमीन सामाईक आहे आजिच्या नावावर१/५२ आहे पन मंडळ अधिकारी नोंद घेत नाही वडिलोपार्जित जमीन आहे म्हनते तर आता काय करावे
नमस्कार सर ,
मी मार्च २०२० मध्ये ९० गुंठे जमीन खरेदी केली. रीतसर मुद्रांक शुल्क भरून दुय्यम निंभनदक कार्यलयया खरेदीखत करून घेतले . तलाठी कार्यालल्यात फेरफार नोंदी साठी प्रकरण दिले . तलाठी ने संबंधीत मूळ मालकाला ऑगस्ट २०२० नोटीस काढली . नोटीस चा पिरियड पण संपला . मूळ मालकाने नोटीस वर अंगठा पण दिला . फेर मंजुरी साठी मंडलाधिकारी कडे पडून आहे . आता मूळ मालकाच मुलगा मंडलाधिकारी कार्यालयात जाऊन म्हणत आहे कि आमचे काही पैसे बाकी आहे. आणि नोटीस वर आम्ही सही केली नाही. मंडलाधिकारी फेर मंजुर करत नाही . कृपया काय कायदेशीर कारवाई करावी ?
सर माझी हवेली तालुक्यात वडिलोपार्जित जमीन आहे माझे पणजोबा 1983 साली मयत आहे त्यांच्या नावावर आहे वारस नोंद आत्ता करायला दिली आहे पण मंडळ अधिकारी यांनी सक्षम न्यायालयाच
प्रमाण पत्र घेऊन या असा शेरा मारला आहे तो योग्य आहे का कारण मंडल अधिकारी यांनी 1976 ची सेम दुसऱ्या गावातील नोंद मंजूर केली आहे आणि आमची करत नाही काय करावे
त्यांची कंप्लेंट कोणाकडे करावी
फेरफार पास करण्यासाठी किती काळ लागतो
मला मंडळ अधिकारी अहवाल कडयचा आहे
मंडळ अधिकारी EWS अहवाल आर्ज
मी बाजीराव बापू बोराडे राहणार हातकणंगले शाहूनगर माळभाग माझ्या वडिलांच्या जन्मापासुन आम्ही या गावचे रहिवासी आहे पन्नास ते साठ वर्षापासून या गावांमध्ये राहत आहे तरी आम्हाला घर व जागा स्वतःचे नाही माझी अकरा जणांची कुटुंब माझे 11 जणांचे कुटुंब आहे शासकीय प्लॉटवरशासकीय प्लॉटवर अतिक्रमण करून राहत आहे शासकीय प्लॉटवर अतिक्रमण करून राहात आहे 1991 पासून ते 2022 पर्यंत आजतागायत इथे राहतो शासकीजागाआहे जागा मालकीहक्काचा निघाला आहे तर माझ्यावर अन्याय होत आहे दमदाटी करून हुसकावून लावण्याचा प्रयत्न करत आहेत मला कुठेतरी पर्यायी मार्ग मिळावा म्हणून मी अर्ज केले होते तर माझी कोणीही दखल घेईना झाले अत्यंत गरीबाची परिस्थिती आहे मला कुठेतरी पर्यायी मार्ग मिळावा
Post a Comment