Sunday, 28 February 2021

तक्रारकेस नमुने

मंडळ अधिकारी यांना तक्रार केसचे कामकाज करताना आवश्यक असे नोटीस नमुने ,रोजनामा व माहितीसाठी काही निर्णय खालील pdf मध्ये दिलेले आहे.सदर दिलेले निर्णय त्या त्या प्रकरणातील परिस्थितीचे अवलोकन करून दिलेले आहे.तक्रार केस प्रकरणात नोटीस,रोजनामा व अंतिम  निर्णय नमुना सर्वसाधारण पणे कसा असावा? यासाठी सदर pdf तयार केली आहे त्यात आपण परिस्थितीनुसार बदल करू शकता. 


सदर pdf प्राप्त करणेसाठी खालील लिंक वर क्लिक करा

तक्रार केस नमुने-मोहसिन शेख


🔴🔵⚫🔴🔵⚫🔴🔵⚫🔴🔵⚫

*संकलन-मोहसिन शेख,मंडळ अधिकारी*

Blog-mohsin7-12.blogspot.com

Email-mohsin7128a@gmail.com

Contact-9766366363

🔴🔵⚫🔴🔵⚫🔴🔵⚫🔴🔵⚫Wednesday, 3 February 2021

सरपंच उपसरपंच निवडणूक

 सरपंच /उपसरपंच निवडणूक साठी अध्यासी अधिकारी यांनी नेमके कसे कामकाज करावे यासाठी आमचे मित्र विशाल काटोल, तलाठी यांनी प्रशिक्षण ppt तयार केली आहे.तसेच अध्यासी अधिकारी यांनी कशा प्रकारे इतिवृत्त व अहवाल तयार करावे याबाबत मोहसिन शेख व श्री.शशिकांत जाधव सर तहसीलदार रत्नागिरी यांनी तयार केलेली माहिती pdf स्वरूपात सर्वाना उपलब्ध करून दिली आहे . सदर pdf प्राप्त करणे साठी खालील लिंक वर क्लिक करा. 


अध्यासी अधिकारी प्रशिक्षण

सरपंच निवडणूक नमुने

इतिवृत्त व अहवाल

Wednesday, 13 January 2021

पुरवठा विभाग एक दृष्टीक्षेप

 मा.श्री राजू नंदकर सर उपजिल्हाधिकारी हे  जालना येथे जिल्हा  पुरवठा अधिकारी या पदावर कार्यरत असतांना लेखन व संकलन केलेल्या *"पुरवठा विभाग एक दृष्टीक्षेप "* या त्यांचे चौथ्या पुस्तकाचे मंत्रालय मुंबई येथे   *माननीय राजेश टोपे साहेब मंत्री सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण महाराष्ट्र राज्य तथा पालकमंत्री जालना* यांच्या हस्ते विमोचन करण्यात आले. 

ह्या  पुस्तकाची हार्ड प्रत ही २०८ पानांची  असून डीजीटल पीडीएफ प्रत ही  ४३० पानांची आहे. 

पुरवठा विभागात काम करणारे अधिकारी व कर्मचारी, स्वस्त धान्य दुकानदार व सामान्य नागरिक यांना हे पुस्तक निश्चितच उपयोगी पडेल याची मला खात्री आहे .सदर पुस्तके हे *मा. राजू नंदकर सर* यांचे ब्लॉगवरील खालील लिंक वर उपलब्ध आहे.

👇👇👇


श्री .राजू नंदकर सर ब्लॉग


तसेच *महसूल मित्र शेख* या ब्लॉगवरील खालील लिंक वर उपलब्ध आहे 

👇👇👇

पुरवठा एक दृष्टीक्षेपात


Wednesday, 16 December 2020

ग्रामपंचायत निवडणूक २०२०

महाराष्ट्र राज्यात सध्या ग्रामपंचायत निवडणूक कार्यक्रम जाहीर झालेला असून दिनांक २३/१२/२०२० पासून नामनिर्देशन पत्र भरणे चालू होणार आहे.बरेच निवडणूक निर्णय अधिकारी नवीन आहेत तसेच निवडणूक लढवणारे उमेदवार देखील नव्याने निवडणूक मध्ये भाग घेत आहेत.निवडणूक निर्णय अधिकारी,ग्रामपंचायत निवडणूक मध्ये भाग घेणारे अधिकारी व कर्मचारी तसेच उमेदवार यांना निवडणुकीबाबत बरेच प्रश्न उपस्थित होतात व याबाबत साहित्य हवे तसे उपलब्ध होत नाही या सर्व बाबींचा विचार करून आमचे मित्र शशिकांत सानप,तलाठी जुई,ता. उरण यांनी ग्रामपंचायत प्रशिक्षण ppt तसेच आवश्यक कागदपत्रे यादी pdf स्वरूपात तयार केली आहे.तसेच आयोगाकडून निवडणूक अधिकारी यांचेसाठी आवश्यक माहितीपुस्तिका व नागरिकांनी वारंवार विचारलेले प्रश्न यासाठी तयारी केलेले पुस्तक देखील याठिकाणी उपलब्ध करून दिले आहे.तसेच वेळोवेळी आयोगाकडून येणारी अपडेट ही याच लेखात दुरुस्त केली जाईल.खालील लिंक वर क्लिक करून आपण हवी ती फाईल प्राप्त करू शकता.


 📝📝📝📝📝📝📝📝📝📝📝📝


*लेख:-श्री.शशिकांत सानप,तलाठी-साझा-जुई,तहसिल उरण जि. रायगड*

*संकलन-मोहसिन शेख,मंडळ अधिकारी*

Blog-mohsin7-12.blogspot.com

Email-mohsin7128a@gmail.com

Contact-9766366363

,🔴🔵⚫🔴🔵⚫🔴🔵⚫🔴🔵⚫

Thursday, 10 December 2020

विशेष सहाय्य योजना

 विशेष सहाय्य योजना 

१.संजय गांधी निराधार अनुदान योजना

२.श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजना

३.इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धपकाळ निवृत्तीवेतन योजना

४.इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्तीवेतन योजना

५.इंदिरा गांधी राष्ट्रीय अपंग निवृत्तीवेतन योजना

या सर्व योजनांच्या अटी ,अर्जाचा नमुना व मिळणारी निवृत्तीवेतन याबाबत माहिती देणारा सर्वसमावेशक शासन निर्णय २० ऑगस्ट २०१९ रोजी घेण्यात आलेला आहे .हा शासन निर्णय खालील लिंक वर क्लिक करून प्राप्त करू शकता.

विशेष सहाय्य योजना
फेरफार नोंद कालावधी

 तलाठी यांचेकडे नोंदीसाठी कागदपत्रे दिल्यानंतर किती दिवसात फेरफार झाला पाहिजे याबाबत बरेच खातेदार व शेतकरी नेहमी प्रश्न विचारत असतात.महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम २०१५ नुसार ज्या फेरफार बाबत तक्रार आलेली नसेल असा फेरफारचा कालावधी ३० दिवस असा करण्यात आला होता. परंतु मा.जमाबंदी आयुक्त आणि संचालक भूमी अभिलेख यांचेकडील परिपत्रक ३०/१२/२०१७ रोजी परिपत्रकानुसार सदर कालावधी ३० ऐवजी २५ दिवस करण्यात आलेला आहे.सदर परिपत्रक प्राप्त करणेसाठी खालील लिंकवर क्लिक करा.


फेरफार कालावधी

फेरफार नोंदी अर्ज व आवश्यक कागदपत्रे

 तलाठी कार्यालयात फेरफार नोंदीसाठी अर्ज कसा द्यावा ?अर्जाचा नमुना कसा असावा? तसेच अर्जासोबत कोणत्या नोंदीसाठी कोणती कागदपत्रे आवश्यक आहेत असे प्रश्न बरेच वेळा विचारले जातात.तलाठी कार्यालयात नोंदीसाठी अर्ज देताना अर्जाचा नमुना व आवश्यक कागदपत्रे याबाबत शासनाने १५ जुलै २०१० रोजी शासन परिपत्रक काढलेले आहे हे परिपत्रक खालील लिंक वर क्लिक करून प्राप्त करू शकता


फेरफार अर्ज