Saturday 7 October 2023

राजीव गांधी प्रशासकीय गतिमानता पुरस्कार

 महाराष्ट्र शासनाचा प्रथम क्रमांकाचा पुरस्कार


       *अर्धन्यायिक प्रकरणातील क्यू आर कोडच्या नाविन्यपूर्ण व्यक्तिगत उपक्रमास राज्याचा प्रथम क्रमांक*


    प्रशासनाच्या सेवांच्या गुणवत्तेमधील वाढ,लोकाभिमुखता व निर्णय क्षमता आणण्यासाठी तसेच सर्वांच्या सहकार्यातून उत्तम प्रशासन कार्यन्वित करण्यासाठी राजिव गांधी प्रशासकीय गतिमानता अभियान महाराष्ट्र शासनामार्फत राबविण्यात येते.या अभियाना अंतर्गत सहभाग घेऊन सर्वोत्तम कामगिरी करणारी कार्यालयेअधिकारी व सर्वोत्कृष्ट कल्पना उपक्रम सुचविणा-या शासकीय संस्था ,अधिकारी व कर्मचारी यांना पारितोषिके देऊन गौरविण्यात येते 

            महाराष्ट्र शासनातर्फे देण्यात येणारा प्रशासकीय क्षेत्रातील सर्वोच्च राजिव गांधी प्रशासकीय गतिमानता  २०२२ चा राज्यातील प्रथम क्रमांकाचा पुरस्कार डॉ.मोहसिन शेख मंडळ अधिकारी राहाता यांना आज शासन निर्णयाद्वारे महाराष्ट्र शासनाने जाहीर केला आहे.मोहसिन शेख यांनी अर्धन्यायिक प्रकरणात देशात प्रथमच क्यू आर कोडचा प्रभावी वापर करून प्रशासन गतिमान केले याची दखल महाराष्ट्र शासनाने घेतली असून आज शासन निर्णयाद्वारे डॉ.मोहसिन शेख यांचे क्यू आर कोड या नाविन्यपूर्ण उपक्रमास महाराष्ट्र  राज्याचा प्रथम क्रमांकाचा जाहीर केला आहे. प्रशासकीय क्षेत्रातील सर्वोच्च राजिव गांधी प्रशासकीय गतिमानता २०२२ चा राज्यातील प्रथम क्रमांकाचा पुरस्कार घेणारे डॉ.मोहसिन शेख मंडळ अधिकारी राहाता हे राज्यातील पहिलेच मंडळ अधिकारी ठरले आहेत.यापूर्वी अनेक सामाजिक संघटना यांनी मोहसीन शेख यांचे सामाजिक उपक्रम तसेच महसूल मित्र मोहसिन शेख या ब्लॉगची दखल घेऊन अनेक राज्यस्तरीय पुरस्कार त्यांना जाहीर केलेले आहेत तसेच मा.महसूल मंत्री महाराष्ट्र राज्य व मा.विभागीय आयुक्त नाशिक यांनी देखील क्यूआर कोड उपक्रमाची दखल घेऊन डॉ.मोहसिन शेख यांना सन्मानित केलेले आहे. महाराष्ट्र राज्यातील प्रशासकीय क्षेत्रातील सर्वोच्च राजिव गांधी प्रशासकीय गतिमानता २०२२ चा राज्यातील प्रथम क्रमांकाचा पुरस्कारमध्ये ५००००/- रु.प्रशस्तीपत्र व सन्मानचिन्ह असे पुरस्काराचे स्वरूप असून महाराष्ट्र राज्याचे मा.मुख्यमंत्री,मा.उपमुख्यमंत्री व मा.मुख्य सचिव यांचे हस्ते २१ एप्रिल रोजी नागरी सेवा दिना निमित हा पुरस्कार मुंबई येथे डॉ.मोहसिन शेख यांना प्रदान करणेत येणार आहे.



 “ माझे महसूल कारकीर्द मधील हा सर्वोच्च बहुमान मला मिळालेला असून आता जबाबदारी अनेक पटीने वाढली आहे.माझे कुटुंबीय व मित्र परिवार यांची खंबीर साथ असलेने मी हा यशस्वीउपक्रम करू शकलो. तसेच मा.महसूल मंत्री ना.राधाकृष्ण विखे पाटील, शिर्डी उपविभागीय अधिकारी गोविंद शिंदे,डॉ.संजय कुंडेटकर उपजिल्हाधिकारी ,राहाता तालुक्याचे तहसीलदार कुंदन हिरे,निशिकांत पाटील तलाठी जळगाव माझे गुरु सुरेश जेठे तलाठी अहमदनगर,व महसूल महाराष्ट्र ग्रुप मधील मार्गदर्शक यांचे वेळोवेळी मार्गदर्शन व सहकार्य लाभले .महाराष्ट्र शासनाने दिलेला हा सन्मान महसूल ,महाराष्ट्र ग्रुप मधील सर्व सदस्य, महसूल खात्यात नाविन्यपूर्ण उपक्रम करणारे राज्यातील सर्व मंडळ अधिकारी तलाठी , महसूल सहायक व अव्वल कारकून यांना मी अर्पण करत आहे”.-डॉ.मोहसिन शेख,मंडळ अधिकारी राहाता


















No comments: