राहाता मंडळ अधिकारी कार्यालय बनले राज्यातील पहिले क्यू-आर कोड वाचनालय
मंडळ अधिकारी डॉ.मोहसिन शेख यांचा नाविन्यपूर्ण उपक्रम
महाराष्ट्र शासन राजीव गांधी प्रशासकीय गतिमानता -२०२३ प्रथम क्रमांक पुरस्कार प्राप्त राहाता शहराचे मंडळ अधिकारी डॉ.मोहसिन शेख यांनी मंडळ अधिकारी कार्यालय राहाता येथे क्यू आर कोड वाचनालय या संकल्पनेचा नाविन्यपूर्ण प्रयोग राबविला असून त्यामुळे राहाता मंडळ अधिकारी कार्यालय राज्यातील पहिले क्यू आर कोड वाचनालय निर्माण करणारे कार्यालय बनले आहे.क्यू आर कोड वाचनालय मध्ये वरिष्ट महसूल उप जिल्हा अधिकारी डॉ.संजय कुंडेटकर, उप जिल्हाधिकारी श्री.बबन काकडे , उप जिल्हाधिकारी श्री.गणेश मिसाळ तहसिलदार श्री.शशिकांत जाधव,मंडळ अधिकारी श्री.विनायक यादव व डॉ.मोहसिन शेख यांनी लिखाण व संकलित केलेले केलेले पुस्तकांचे आकर्षक मुखपृष्ठ तयार करणेत आले असून सदर मुखपृष्ठावर त्या पुस्तकाचे क्यू आर कोड दर्शिवण्यात आले आहे.सदर क्यू आर कोड स्कॅन केल्यानंतर सदर पुस्तक सहज मोबाईल वर विनामूल्य उपलब्ध होणार आहे.
राहाता मंडळ अधिकारी कार्यालयाने राबविलेल्या क्यू आर कोड वाचनालय या संकल्पनेमुळे सर्व सामान्य नागरिक,शेतकरी व विधिज्ञ यांना फायदा होत असून या वाचनालय मध्ये वारस कायदे,फेरफार नोंदी ,महसूल प्रश्नोत्तरे,तालुका स्तरीय समित्या , माहिती अधिकार कायदा ,तलाठी मार्गदर्शिका ,ऑनलाईन ७/१२ व महसूल संबंधी जवळपास १०१ लेख यांचा समावेश असणारे नाबाद १०१ अशा पुस्तकांचा समावेश आहे.यामुळे महसूल मधील कायद्यामधील किचकट बाबी सहज सोप्या भाषेत नागरिकांना त्यांचे मोबाईल द्वारे मिळणार आहेत. सदर पुस्तकांची प्रिंट काढून पुस्तके संग्रही ठेवता येणार आहेत.
महसूल संबंधी माहिती व कायद्याचे ज्ञान सर्व सामान्य नागरिकांना सहज एका क्लिक वर मिळावे म्हणून मंडळ अधिकारी कार्यालय येथे क्यू आर कोड वाचनालय ही संकल्पना राबविण्यात आली असून याचा सर्व सामान्य नागरिकांना नक्कीच फायदा होईल -डॉ.मोहसिन शेख ,मंडळ अधिकारी, राहाता
विशेषतः जनसामान्याच्या दृष्टिकोनातून अत्यंत उपयुक्त आणि प्रशंसनीय उपक्रम आहे.-डॉ.संजय कुंडेटकर उपजिल्हाधिकारी (से.नि)
No comments:
Post a Comment