Sunday, 6 March 2016

मंडळाधिकारी यांचे न्यायालयातील तक्रार केस

फेरफार नोंदवही मध्ये नोंद केलेनंतर तलाठी सदर नोंदीबाबत काही आक्षेप असलेस 15 दिवसांची मुदत देऊन तलाठी कार्यालयात कळविणे बाबत हितसंबंधित व्यक्तींना नोटीस बजावतात.उक्त 15 दिवसात एखाद्या हितसंबंधित व्यक्तीने अशा नोंदीबाबत हरकत घेतल्यास तलाठी हे सदर हरकतीची नोंद गाव नमुना- 6अ विवाद ग्रस्त प्रकरणांची नोंदवही यामध्ये नोंद करून त्या नोंदीचा सदर नोंदीबाबत प्राप्त अर्ज ,फेरफार,तक्रार अर्ज,व गाव नमुना 6अ ची नक्कल जोडून तालुक्यात पाठवतात.अशा नोंदी पुढे तक्रार केस चालवण्यासाठी मंडळ अधिकारी यांचेकडे येतात अशा वेळी वादी व प्रतिवादी यांना नोटीस बजवावी लागते व त्यांचे लेखी युक्तिवाद घ्यावे लागतात.तसेच वेगवेगळ्या फेरफार मध्ये निकाल कसे देतात व याबाबत पूर्ण कार्यवाही कशी करायची याबाबत माहिती देणारे सदर ब्लॉगवर आजपासून "मंडळाधिकारी " या नावाने चालू करत आहोत त्यामध्ये आज  वादी व प्रतिवादी यांना  बजवणेत येणारी नोटीस नमुना पाहणार आहोत.
सदर नमुना प्राप्त करणेसाठी क्लिक करा.

No comments: