भारतीय वारसा हक्क कायदा 1925 प्रमाणे जर एखाद्या व्यक्तीने जिवंत असताना आपले इच्छापत्र
किंवा मृत्युपत्र करून ठेवले असेल, तर त्याची अंमलबजावणी
म्हणजे मालमत्तेचे हस्तांतरण त्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर कायद्यातील कोणत्याही
तरतुदींच्या अगोदर होते; मात्र अशाप्रकारचे इच्छापत्र किंवा
मृत्युपत्र केलेले नसेल, तर सदर व्यक्ती विनामृत्युपत्र मृत
झाली असे समजण्यात येते आणि कायद्यातील तरतुदी मिळकत या हस्तांतरासाठी अस्तित्वात
येतात. सदर मृत व्यक्तीची मिळकत वारसा हक्काने संबंधित वारसांना प्राप्त होते. मृत
व्यक्तीची मिळकत त्या मृत व्यक्तीस लागू पडत असलेल्या वारसा कायद्याप्रमाणे
वारसांनाच मिळते.अशा वारस कायद्यातील मुलभूत तरतुदी अंत्यत मोजक्या व सोप्या भाषेत समजावून सांगणारा लेख ऍड.लक्ष्मण खिलारी ,पुणे यांनी लिहलेला असून हा लेख वाचून आपले खालील बाबी स्पष्ट होतील.
- हिंदू वारसा कायदा 1956 नुसार वारसांचे चार वर्ग कोणते ?
- वारसांची नियामवली कशी आहे ?
- वर्ग 1 वर्ग 4 यामधील उत्तराधिकारांचा नियम व क्रम
- हिंदू स्त्रीची मिळकत
- विनामृत्युपत्र मृत हिंदू स्त्रीच्या संपत्तीची विल्हेवाट ठरविण्याचा क्रम व नियम-
- नात्यातील क्रम
- गर्भातील अपत्याचा हक्क
लेख:- ऍड.लक्ष्मण खिलारी ,पुणे
संकलन:-
श्री.मोहसिन शेख ,तलाठी
तालुका-कर्जत
जिल्हा-अहमदनगर
Email:-mohsin7128a@gmail.com
Blog:-mohsin7-12.blogspot.in
Contact:-9766366363
No comments:
Post a Comment