Thursday, 10 March 2016

मे.अंडरसन साहेब यांचे मुलकी हिशेबाचे पुस्तकाचे मराठी भाषांतर आवृत्ती

🚹मे.अंडरसन साहेब यांचे इंग्रजी पुस्तकाचे मराठी भाषांतर केलेल्या पुस्तकाची प्रस्तावना ✍🏻


नामदार मुंबई सरकारचे हुकुमावरून मे.एफ.जी.एच अंडरसनसाहेब,एम.ए,आय.सी.एस यांनी मुलकी हिशोबाचे पुस्तक तयार करून त्याची पहिली आवृत्ति सं १९१५ साली प्रसिद्ध केली.त्यानंतर मुलकी हिशाबामध्ये पुष्कळ फेरफार होऊन नवीन पुस्तक सन १९३१ मध्ये तयार होऊन प्रसिद्ध झाले.या पुस्तकावरून गावाचे हिसेबापुरता भाग कुलकर्णी,तलाठी व फक्त मराठी जाणणारे कारकून यांचे माहितीसाठी मरठीतून प्रसिध्द करावे असे सरकारने ठरवून हे काम आमचे कडेस सोपवनेत आले होते.इंग्रजी पुस्तकातील सर्व मजकुराचे हे पुरे भाषांतर नाही.क्वचित घडणाऱ्या काही गोष्टी व ज्यांचा संबंध गावाचे कुलकर्ण्याशी न येत फक्त मामलेदार व तालुका कचेरी यांचेशी येतो ,अशा काही मजकुराचे भाषांतर बुकाचा आकार निष्कारण न वाढवा म्हणून गाळले आहे.तसेच इंग्रजी शब्दाचे केवळ शब्दशः भाषांतर न करता सोपी भाषा वापरणेचा हरप्रयत्न केला आह. व जेथे मूळ पुस्तकाचे निव्वळ भाषांतराने अडचणी येणेचा संभव दिसला,अशा ठिकाणी खुलाशासाठी ज्यादा वाक्य व शब्दही दाखल केले आहेत.तथापि जेव्हा एखादे हुकमाचे अर्थसंबंधाने  शंका येईल किंवा भाषांतर एकदा मुद्दा न आलेमुळे त्या संबंधाने हुकुमाची आवश्यकता वाटेल तेव्हा मामलेदार यांजकडे कळवावे,म्हणजे इंग्रजी पुस्तक पाहून ते खुलासा करतील.

आर.टी.देव ✍🏻
पारोळे,तारीख  ८ मे १९३२


🔴🔴🔴🔴🔴🔴🔴🔴🔴

आर.टी.देव,मामलेदार,पारोळा,यांनी सन 1932साली मराठी भाषांतर केलेले Anderson manual- Pages -230 
या पुस्तकांच्या शासकीय प्रति पाहिजे असलेस ९७६६३६६३६३ नंबर वर whatsapp message करून मागणी कळवा
mohsin7-12.blogspot.in
9766366363
⚫⚫⚫⚫⚫⚫⚫⚫⚫

No comments: