Friday, 2 March 2018

महसूल प्रश्नोत्तरे- सुधारित आवृत्ती

महसूल अधिकारी किंवा कर्मचारी म्हणून काम करतांना आपण राज्य शासनाच्या एकूण ३७ शासकीय विभागांपैकी २६ विभागांसाठी दररोज अनेक भिन्न भिन्न कायद्यांतर्गत काम करीत असतो. प्रत्येक कामाबद्दल आपल्याला पुरेसे ज्ञान असतेच असे नाही. त्यामुळे काहीवेळा अजाणतेपणाने आपल्या हातून चुका होतात. कधी कधी याची फार मोठी किंमत मोजावी लागते.  
      महसूल खात्यांत अनेक वेळा तात्काळ निर्णय घ्यावा लागतो. त्यावेळेस अनेक प्रश्न मनात उपस्थित होतात. त्यांची उत्तरे शोधण्याचा प्रयत्न‍ केला तर अनेक कायद्यााची पुस्तके चाळावी लागतात.अनेक अधिकारी/कर्मचारी यांनी विविध प्रकारचे अभ्यासू व अनुभवी मार्गदर्शन करतांना, कायदेशीर तरतुदींवर अनेक उत्कृष्ठ लेख लिहिलेले आहेत. परंतु अशा लेखांतून नेमके उत्तर शोधणे काहीवेळा शक्य होत नाही.

        या गोष्टींचा विचार करून, तातडीच्या वेळेला नेमके उत्तर मिळावे या दृष्टीकोनातून "महसूल प्रश्नोत्तरे" ची रचना केलेली आहे. पहिल्या आवृत्ती मध्ये एकूण ३९१ प्रश्न होते सुधारित दुसऱ्या आवृत्तीमध्ये महसूल विषयक विभाग २४८ प्रश्न ,कुळकायदा विषयक विभाग ५१ प्रश्न,वारस विषयक ११० प्रश्न, न्यायदान विषयक ७६ प्रश्न असे एकूण ४८५ प्रश्न असे भाग करून प्रश्नांचे विविध संच, विषयनिहाय उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केला आहे. विविध प्रश्नांची उत्तरे देतांना, शक्य तिथे कायदेशीर तरतुदी, कायद्यातील कलम आणि न्यायालयीन आदेशांचा संदर्भ दिलेला आहे. यामुळे कायदेशीर अथवा न्या‍यालयीन निकालाचा संदर्भ देऊन निकाल लिहिण्यास किंवा एखाद्या अर्जाला उत्तर देण्यास मदत होईल.  

       "महसूल प्रश्नो्त्तरे" महसूल खात्यातील सर्वच स्तरावरील अधिकारी/कर्मचार्यांसाठी उपयुक्त ठरेल अशी अपेक्षा आहे. "महसूल प्रश्नोत्तरे" मध्ये काही त्रुटी असण्याची शक्यता नाकारता येत नाही. आवश्यक तेथे अद्ययावत तरतुदींचा संदर्भ घ्यावा ही विनंती.

हे पुस्तक प्राप्त करणेसाठी खालील लिंक वर क्लिक करा 

7 comments:

Nanasaheb Surwase said...

Sir mazi sheti jamkhed talukyat aahe.maze vadil 4 years purvi varle talathyane varas nondisathi paise gheun adich varshani nond keli v nantar 6 mahinyapurvi mi tyach talathyala khatefod sathi arj v fess mhanun 25000 rs dile pan tyane khate fod keli nahi v mazi fasvnuk keli kay karawe plz margdarshan kara

Unknown said...

महोदय
भुमी अभिलेख कार्यालयात न्यायालयीन आदेशानुसार फेरफार घेऊन अभिलेखात नोंद करणेसाठी अर्ज केलेला आहे. सदर अर्जानुसार कार्यालयाने सरकारी वकीलांचा अभिप्राय सुध्दा मागविला आहे. सरकारी वकील साहेबांचे अभिप्रायानुसार नोंद घ्यायला पाहीजे पण कार्यालयाने सहधारकांना नमुना 9 अन्वये नोटीस पाठवायचे ठरविले आहे. माझा प्रश्न खालीलप्रमाणे आहे
१] न्यायालयीन आदेशाने अर्जदारास ताबा देण्यात आल्यानंतर सुध्दा सहधारकांना नमुना ९ अन्वये नोटीस देणे आवश्यक असते का?
२] न्यायालयीन आदेशाने नोंद घेण्याची भुमी अभिलेख कार्यालयाची पध्दत कशी असते.
कृपया मार्गदर्शन करावे हि विनंती

amol dhepe said...

सर मी अमोल मार्च महिन्यात 30 गुंठे जमीन खरेदी केली होती पण त्या 7/12 वर मयत व्यक्तीचे नाव तसेच होते त्या मुळे ती नोंद रद्द करण्यात आली नंतर मी वारस नोंद करून घेतली व नवीन नोंद करण्यासाठी नवीन index पण तलाठयाला दिली परंतू तो आता sub resiter परवानगी घ्यावी लागते म्हणतोय तर मला काय करावे लागेल process काय असेल

Vinayak Baba Mahamunkar said...

सात बारावर मूळ खातेदाराचे नाव कमी दुस-याचे नाव दाखल झाले हाेते .तक्रार केल्यानंतर चुकीने लावण्यात आलेले नाव कमी न करता मूळ खातेदाराचे नाव कब्जेदार रकान्यात दाखल करून सुधारीत सातबारा दिला व साेबत पत्र दिले की हे सर्व चुकीने झाले हाेते.चुकून लागलेले मूळ नाव कमी झालेच नाही.मूळ मालकास मात्र कब्जेदार म्हणून दाखल केले .हे कितपत याेग्य आहे?

Unknown said...

सर बाजूच्या शेतकर्याची संमती नसेल तर शेतजमीनीची मोजणी होत नाही का.

Unknown said...

plz reply

Unknown said...

सर म. ज. म. अ. 1966 चे कलम 85/2 अन्वये करावयाच्या कार्यपध्दतीबद्दल माहिती सांगा