Thursday, 28 January 2016

ग्रामपंचायत सरपंच/उपसरपंच निवडणूक कार्यपद्धती -मा.श्री.शशिकांत जाधव सर ,नायब तहसिलदार

ग्रामपंचायत सदस्य निवडणूक पार पडलेनंतर अंत्यंत महत्वाचा टप्पा असतो सरपंच / उपसरपंच निवडणूक.
ही निवडणूक कशाप्रकारे पार पाडावी याबाबत  खालील विषयाबाबत माहिती देणारी ppt  मा. श्री.शशिकांत जाधव सर ,नायब तहसिलदार ,सावंतवाडी यांनी तयार केली आहे.
 • सरपंच/उपसरपंच निवडणूक सभेची नोटीस 
 • सरपंच पदाचे आरक्षण व पात्र निर्वाचित सदस्य 
 • नामनिर्देशनपत्रे 
 • गणपूर्ती 
 • नामनिर्देशनपत्राची छाननी 
 • उमेदवारी मागे घेणे 
 • निवडणूक कार्यपद्धती 
 • इतर महत्वाचे 
ही सर्व माहिती pdf स्वरूपात प्राप्त करणेसाठी खालील लिंक वर क्लिक करा
ग्रामपंचायत सरपंच/उपसरपंच निवडणूक कार्यपद्धती -मा.श्री.शशिकांत जाधव सर ,नायब तहसिलदार

Saturday, 23 January 2016

निवडणूक विषयी मुलभूत माहिती-

महसूल विभागात काम करताना अनेक प्रकारची कामे महसूल अधिकारी व कर्मचारी यांना पार पाडावी लागतात त्यापैकी महत्वाचे कामकाज म्हणजे 'निवडणूक'.विविध प्रकारचे निवडणूक महसूल विभाग मार्फत घेतली जाते.अगदी ग्रामपंचायत पासून ते लोकसभा निवडणूक कामकाज महसूल विभागाच्या नियंत्रणाखाली चालते.अशावेळी आपणास या प्रक्रियेबद्दल माहिती असणे अनिवार्य आहे.कोणत्याही कामाबद्दल माहिती असलेशिवाय ते काम अचूक होऊ शकत नाही.निवडणूक हा खूप मोठा विषय आहे व यामध्ये काम करताना ब-याच अडचणी येतात अशावेळी आपले वाचन नसेल तर अडचणीत वाढ होते.अनेक नवीन सेवाप्रवेश केलेल्या  मित्रांना याविषयी माहित नसलेने निवडणूक विषयी मुलभूत माहिती हवी अशी मागणी ब्लॉग नियमित पाहणाऱ्या मित्रांकडून  होत असलेने अहमदनगर प्रशिक्षण प्रबोधिनी मार्फत निवडणूक विषयी मुलभूत माहिती देणारे उदा.निवडणूक आयोग,मतदार यादी पासून ते मतदानाचा दिवस पूर्वतयारी अशी माहिती देणारी ppt ही pdf स्वरुपात तयार केली आहे.सदर pdf वाचून मुलभूत माहिती आपणास प्राप्त होईल.सदर pdf प्राप्त करणेसाठी  खालील लिंक वर क्लिक करा.

Friday, 22 January 2016

महाराष्ट्र नागरी सेवा (सेवेच्या सर्वसाधारण शर्ती) नियम 1981 - मा.श्री.पी.एम.रेंघे ,लेखाधिकारी (से.नि)

महाराष्ट्र नागरी सेवा (सेवेच्या सर्वसाधारण शर्ती) नियम 1981 बाबत मा.श्री.पी.एम.रेंघे ,लेखाधिकारी (से.नि) यांनी उत्तम  ppt  तयार केली आहे.या ppt चे pdf रूपांतरण केले आहे . सदर ppt ही खालील पाच विभागाबद्दल आहे.
 1. नियमांची तोंड ओळख,उगम व व्याप्ती 
 2. व्याख्या 
 3. सेवा प्रवेश शर्ती व पूर्तता 
 4. धारण अधिकार 
 5. सेवापुस्तक 
ppt प्राप्त करणेसाठी खालील लिंक वर क्लिक करा
महाराष्ट्र नागरी सेवा (सेवेच्या सर्वसाधारण शर्ती) नियम 1981 - मा.श्री.पी.एम.रेंघे ,लेखाधिकारी (से.नि)

Wednesday, 20 January 2016

तलाठी व लिपिक प्रशिक्षण -मा.श्री.विनोद भामरे सर ,तहसिलदार

अहमदनगर जिल्हा महसूल प्रबोधिनी तर्फे घेणेत येणाऱ्या प्रशिक्षणातील लेख व ppt पैकी आज लिपिक व तलाठी यांना आवश्यक प्रशिक्षण  याबाबत मा.श्री.विनोद भामरे सर,तहसिलदार, जि.अहमदनगर यांनी तयार केलेली ppt प्रकाशित करत आहोत.या मध्ये खालील माहिती ,मिळेल 
 • शासकिय पत्रव्यवहार प्रकार 
 • कोणता प्रकारचा वापर कसा व कधी करावा? 
 • सहा संच पद्धत 
 • वेगवेगळ्या नोंदवह्या ठेवणेची पद्धत 
 • अभिलेख संरक्षण
ppt प्राप्त करणेसाठी खालील लिंक वर क्लिक करा

तलाठी व लिपिक प्रशिक्षण -मा.श्री.विनोद भामरे सर ,तहसिलदार  

Tuesday, 12 January 2016

कार्यालयीन कामकाज व व्यवस्थापन-मा.श्री.कुंदन सोनवणे सर,उपविभागीय अधिकारी ,शिर्डी जि.अहमदनगर

अहमदनगर जिल्हा महसूल प्रबोधिनी तर्फे घेणेत येणाऱ्या प्रशिक्षणातील लेख व ppt पैकी आज महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम १९६६ मधील खंड ३ प्रमाणे कार्यालयीन कामकाज व व्यवस्थापन याबाबत मा.श्री.कुंदन सोनवणे सर,उपविभागीय अधिकारी ,शिर्डी जि.अहमदनगर यांनी तयार केलेली ppt प्रकाशित करत आहोत.ppt प्राप्त करणेसाठी खालील लिंक वर क्लिक करा
कार्यालयीन कामकाज व व्यवस्थापन -मा.श्री.कुंदन सोनवणे सर 


Monday, 11 January 2016

सरपंच व उपसरपंच यांचे विरुद्ध अविश्वास प्रस्ताव कार्यपद्धती -मा.श्री.बबन काकडे सर ,तहसिलदार

सरपंच व उपसरपंच यांचे विरुद्ध दाखल होणाऱ्या अविश्वास ठरावा संदर्भातील तरतुदी ग्रा.प. अधिनियम कलम 35 व 1975 च्या नियमात दिलेल्या आहेत. तथापि या संदर्भात कार्यवाही करीत असतांना तांत्रिक स्वरूपाच्या अनेक त्रुटी राहून त्यामुळे मोठया प्रमाणावर विवाद दाखल होत असल्याने शासनाने 4 जुलै 1998 रोजी या संदर्भात एक परिपत्रक निर्गमित केलेले आहे . या परिपत्रकात अविश्वास ठराव दाखल करुन घेण्यापासून ते विशेष सभा आयोजित करण्या संदर्भातील संपूर्ण कार्यपद्धती सविस्तरपणे दिलेली आहे. या सर्व तरतुदी विचारात घेऊन मा.श्री.बबन काकडे सर ,तहसिलदार यांनी एक PPT तयार केली आहे.सदर ppt प्राप्त करणेसाठी येथे क्लिक करा

Saturday, 9 January 2016

महाराष्ट्र कुळवहिवाट व शेतजमीन अधिनियम १९४८ मध्ये करणेत आलेली सुधारणा

महाराष्ट्र कुळवहिवाट व शेतजमीनअधिनियम १९४८ ,हैद्राबाद कुळवहिवाट अधिनियम १९५० व महाराष्ट्र कुळवहिवाट व शेतजमीन (विदर्भ प्रदेश ) यामध्ये आणखी  सुधारणा दिनांक १ जानेवारी २०१६ चे राजपत्र नुसार  करणेत आलेली आहे.हे राजपत्र प्राप्त करणेसाठी येथे क्लिक करा