*वडिलांच्या संपत्ती मध्ये मुलींना समान हक्क*
सर्वोच्च न्यायालयाच्या Vineeta Sharma vs Rakesh Sharma या दिनांक ११ ऑगस्ट २०२० च्या क्रांतिकारी निर्णयाने स्री-पुरुष समानतेच्या दिशेने महत्वाचा प्रवास सुरु झाला आहे. “मुलींना मुलांप्रमाणे समान हक्क दिलेच पाहिजेत. मुलगा हा लग्न होईपर्यंत मुलगा असतो. मात्र मुलगी आयुष्यभर एक प्रेमळ कन्या असते. “A son is a son until he gets a wife. A daughter is a daughter throughout her life” असे म्हणत वडील जिवंत असोत वा नसोत, मुलगी आयुष्यभर समान भागीदार (कोपार्सनर) राहील” असे स्पष्ट करीत हिंदू वारसा (दुरुस्ती) कायदा 2005 हा 9 सप्टेंबर 2005 रोजी अस्तित्वात आला. त्यावेळी वडील हयात होते किंवा नव्हते, त्याने फरक पडणार नाही. 9 सप्टेंबर 2005 रोजी हयात असलेल्या सर्व मुलींना वडिलांच्या संपत्तीमध्ये मुलाप्रमाणे समान वाटा मिळणार, असा महत्त्वपूर्ण निर्णय सुप्रीम कोर्टाने दिला. दिनांक २० डिसेंबर २००४ पर्यंत ज्या अविभक्त कुटुंबाच्या मिळकतीचे नोंदणीकृत वाटणीपत्र झाले नसेल अशा सर्व मिळकतीत मुलीना मुलासारखा समान हक्क मिळेल. मात्र दिनांक २० डिसेंबर २००४ पूर्वी अविभक्त कुटुंबाच्या मिळकतीचे जर नोंदणीकृत वाटणीपत्र झाले असेल किंवा न्यायालयाच्या हुकूमनाम्यानुसार वाटणी झाली असेल, तर मात्र कायद्याने नव्याने निर्माण झालेला घटक म्हणून मुलीस प्राप्त होणाऱ्या अधिकाराचा अशा वाटणीवर काहीही परिणाम होणार नाही किंवा वाटणीला बाधा येणार नाही असेही न्यायालयांने स्पष्ट केले आहे. या सर्व बाबीचे व्हिडीओ मार्गदर्शन मा.प्रल्हाद कचरे सर ,से.नि अपर जिल्हाधिकारी (निवड श्रेणी) यांनी केले आहे.
*व्हिडीओ प्रशिक्षण साठी खालील लिंक वर क्लिक करा*
3 comments:
It is very useful to hindu daughter,
Sir video kasa pahayacha? Konti link ahe video chi?
Mobile madhe open kele asel tar tyat view web version var click kara tyatun video var click kara
Post a Comment