Sunday 17 April 2016

चारा छावणी -डॉ.संजय कुंडेटकर सर ,उपजिल्हाधिकारी सातारा

आपला भारत देश  हा कृषिप्रधान देश असून आपल्या देशात कृषिबरोबरच पूरक व्यवसाय म्हणून पशुपालन हा जोडधंदा करणेत येतो किंबहुना हा शेतकरी यांचेसाठी अत्यंत महत्वाचा विषय आहे.महाराष्ट्र मध्ये देखील पशुपालन हा जोडधंदा सर्रास केला जातो.शेतीचे उत्पन्न हे अनिश्चित असलेने पशुपालानास अनन्यसाधारण महत्व आहे.मुख्यत दुग्ध उत्पादन व शती मशागती साठी जनावरांचा वापर केला जातो.सध्या  राज्यात वारंवार दुष्काळ पडल्यामुळे पाणी टंचाई बरोबरच चारा टंचाई ही देखील मोठी समस्या बनली आहे.चारा टंचाई मुळे शेतकऱ्यांना आपली जनावरे बाजारात विकण्याशिवाय पर्याय राहत नाही.अशा परिस्थितीमध्ये शासनाच्या चारा छावण्या एक प्रकारे शेतकऱ्यांना वरदानच ठरतात.अशा चारा छावणी बाबत माहिती देणारी छोटी पुस्तिका डॉ.संजय कुंडेटकर सर,उपजिल्हाधिकारी सातारा यांनी तयार केली असून ही पुस्तिका शेतकरी.छावणी चालक संस्था,अधिकारी यांना खूप उपयोगी आहे.या पुस्तिकेमध्ये प्रामुख्याने खालील विषय आहेत.
  • छावणीसाठी कायदेशीर तरतूद 
  • छावणीसाठी मान्यता प्राप्त संस्था 
  • छावणी चालक यांनी करावायचे अर्ज व संबंधित कार्यपद्धती व करार 
  • छावणी मधील पूर्ण व्यवस्था व छावणी रचना 
  • छावणीसाठी आवश्यक नोंदवह्या व रजिस्टरचे नमुने 
  • अधिकारी यांना नवीन छावणी साठी करावयाचा आदेश नमुना 
  • छावणी तपासणी अधिकारी यांना तपासणी नमुना 
तसेच इतर छावणी संबंधी सर्व प्रकारची माहिती प्राप्त करणेसाठी खालील लिंक वर क्लिक करा 




लेख-डॉ.संजय कुंडेटकर सर,उपजिल्हाधिकारी सातारा 
संकलन-श्री.मोहसिन शेख ,तलाठी-कर्जत ,अ.नगर 
Email:-mohsin7128a@gmail.com
Blog:-mohsin7-12.blogspot.in
contact:-9766366363

No comments: