तलाठी संवर्ग हा नेहमी कामात व्यस्त असतो अशावेळी तलाठी संवर्गास अनेक योजना अनेक नवनवीन शासन उपक्रम राबवणे यामध्ये तलाठी संवर्गास स्वतः साठी काही तरी करणेसाठी वेळ मिळत नाही. या सर्व बाबी लक्षात घेता तलाठी संवर्गासाठी ही एखादा विशेष दिवस असावा अशी संकल्पना नगर तालुका तलाठी संघटना जिल्हा अहमदनगर यांना सुचली आणि त्यांनी नगर तालुका तर्फे ७/१२/२०१५ म्हणजे ७-१२ या तारखेला ७-१२ दिन हा तलाठी दिन कार्यशाळा व स्नेह मेळावा या स्वरुपात साजरा करणेचा निर्णय घेतला.या कार्यक्रमात मा.जिल्हाधिकारी अहमदनगर श्री.कवडे सर स्वतः अध्यक्ष म्हणून उपस्थित राहणार आहेत तसेच इतर मान्यवर अधिकारी तलाठी संवर्गास मार्गदर्शन करणार आहेत.तलाठी दिवस म्हणून जिल्ह्यातील सर्व तलाठी बांधवानी या कार्यक्रमास हजर राहावे असे आवाहन श्री.गणेश जाधव ,अध्यक्ष नगर तालुका तलाठी संघटना यांनी केले आहे.तरी सर्वांनी खालील निमंत्रण पत्रिका हे निमंत्रण समजून उपस्थित राहावे ही नम्र विनंती.
दिनांक :- सोमवार दिनांक ७/१२/२०१५ रोजी
स्थळ व वेळ :- माऊली संकुल सभागृह ,सावेडी अहमदनगर सकाळी ८.४५
आपला ,
मोहसिन शेख,अध्यक्ष, कर्जत तालुका तलाठी संघटना
No comments:
Post a Comment