Thursday, 9 July 2015

अहमदनगर जिल्‍हयातील तलाठी व महसुल विभागात शोककळा

अहमदनगर जिल्‍हा तलाठी संघटनेचे अध्‍यक्ष कै. नितीन डावखर यांचे आज हार्ट अटॅक ने निधन झाले. अहमदनगर मधील सर्वात मोठया सावेडी सजेस त्‍यांनी उत्‍तमपणे कामकाज करून पुर्ण जिल्‍हयात नावलौकीक मिळवला होता त्‍यांना तलाठी कामकाजात दाखवलेल्‍या कर्तव्‍यनिष्‍ठेमुळे महाराष्‍ट्र शासनाचा आदर्श तलाठी पुरस्‍कार मा. मुख्‍यमंत्री यांचे हस्‍ते मिळालेला आहे.अहमदनगर जिल्‍हा तलाठी संघटनेचे अध्‍यक्ष,अहमदनगर जिल्‍हा रेव्‍हेन्‍यु सोसायटी चेअरमन अशी पदे त्‍यांनी यशस्‍वीपणे हातळली आहेत. सदया ते अहमदनगर जिल्‍हा तलाठी संघटनेचे अध्‍यक्ष पदी कार्यरत होते .अत्‍यंत मनमिळावु स्‍वभाव ,कामकाज तत्‍परता इ. गुणांमुळे ते जिल्‍हयात प्रसिदध असुन सर्वांचे लाडके नेते होते. अचानक त्‍यांचे जाणेमुळे
अहमदनगर जिल्‍हयातील तलाठी व महसुल विभागात शोककळा पसरली आहे त्‍यांची पोकळी न भरून येणारी आहे ईश्‍वर त्‍यांचे पवित्र आत्‍म्‍यास चिरशांती देवो व त्‍यांचे कुटुंबियांना या दुखातून सावरणेची ताकद देवो हीच ईश्‍वरचरणी प्रार्थना......

No comments: