शासकीय कामकाज करत असताना अत्यंत उपयोगी असणारी दैनंदिनी व कार्यालय प्रमुख यांची हस्तपुस्तिका आज mohsin7-12.blogspot.in या संकेतस्थळावर प्रसिध्द करत आहोत.राजपत्रित अधिकारी तसेच कर्मचारी यांना माहितीसाठी अंत्यंत उपयोगी अशी दैनंदिनी व हस्तपुस्तिका आहे.उपयोगी कायदे ,सेवा शर्ती ,तसेच कामकाज विषयी आवश्यक असणारे कायदेशीर बाबी यात समाविष्ट केलेल्या आहेत.आपले शासकीय कर्तव्य पार पाडत असताना या दैनंदिनी व हस्तपुस्तीकेचा नक्कीच सर्वाना उपयोग होईल.ही दैनंदिनी व हस्तपुस्तिका श्री.अण्णाराव भुसणे ,अप्पर कोषागार अधिकारी तथा सरचिटणीस महाराष्ट्र राज्य राजपत्रित महासंघ लातूर जिल्हा समन्वय समिती यानी मला प्रकाशित करणेसाठी उपलब्ध करून दिली आहे त्यांचे हार्दिक आभार .
खालील लिंक वर क्लिक करून pdf स्वरुपात दैनंदिनी व हस्तपुस्तिका प्राप्त करा
1 comment:
प्रश्न : नमस्कार साहेब १९८० मध्ये फेरफार झाला आहे कि जमिन मालक माझी पणजी यांनी वर्दी दिलेवरून व वर्दी पाहून नोटीस लागू केली .असा शेरा आहे व त्यानुसार सदर व्यक्तीची कुळ म्हणून नोंद ७/१२ मध्ये आली आहे. पूर्वी पासून हि शेती माझ्याच कब्जावहिवाट मध्ये आहे आणि त्याचा खंडही मीच भरत आहे. तसेच २००९ पासून चे ७/१२ माझ्याकडे आहेत त्यामध्ये त्या व्यक्तीचे नाव ब्रॅकेट आहे .हे त्याला माहित होत व त्यानंतर त्याने मला नोटीस मारली आणि सांगितले कि हि शेतजमीन मी तुमच्या पणजी कडून ३ जानेवारी १९७९ च्या कराराने विकत घेतली आहे तेव्हा तू त्याचे खरेदीखत करून दे.त्याच्या नोटीसला मी सविस्तर उत्तर दिले व त्याला त्या नोटीसच्या माध्यमातून सांगितले कि तू खोटे बनावट दाखले बनवून त्यांचा आधार घेऊन माझी व महसूल खात्याची दिशाभूल करीत आहेत शिवाय सदरील शेतीमध्ये माझा आतापर्यंत कबजावहीवाट आहे. तसेच असा चावटपणा पुंन्हा करू नये . असे झाल्यास आपल्यावर कायदेशीर करण्यात येईल असे त्याला मी नोटीसच्या माध्यमातून सांगितले . त्या नोटीस ला त्याने काही उत्तर दिले नाही. परंतु आता त्याने फेरफार दुरुस्ती करून स्वतःच्या नावाची नोंद करून पुन्हा त्या शेतीमध्ये वहिवाट सुरु केली आहे तरी याबाबत काय करायला हवे. सहकार्य अपेक्षित
Post a Comment