तलाठी दप्तर हे १ ते २१ नमुन्यांमध्ये विभागलेले आहे.यामधील सर्वात
महत्वाचा व सर्वसामान्य शेतकरी / खातेदार यांचे अंत्यत जिव्हाळ्याचा विषय म्हणजे “गाव नमुना नं ६-फेरफार नोंदवही”.शेतकरी
हे तलाठी यांचेकडे ७/१२ उताऱ्यावरील नोंदी
करणेसाठी अर्ज करतात. ७/१२ उताऱ्यावर करणेत येणाऱ्या या नोंदीस आपण
महसुली भाषेत फेरफार असे म्हणतो.तलाठी यांना दैनदिन कामकाज करताना ७/१२
उताऱ्यावर अनेक प्रकारचे फेरफार करावे लागतात व तलाठी यांनी केलेला फेरफार मंडळ
अधिकारी यानी महसूल कायद्यातील कायदेशीर तरतुदी पाहून प्रमाणित करावा लागतो.तलाठी
यांनी केलेला फेरफार हा मंडळ अधिकारी यांनी प्रमाणित केलेनंतर महारष्ट्र जमीन
महसूल अधिनियम १९६६ चे कलम १५७ अन्वये सिध्द करणेत येईपर्यंत किंवा त्याबद्दल
नवीन नोंद कायदेशीररीत्या दाखल करण्यात येईपर्यंत खरी असलेचे गृहीत धरला जातो.यामुळे तलाठी व मंडळ अधिकारी यांनी केलेला
फेरफार शेतकरी यांचेसाठी खूपच महत्वाचा आहे.\तो जर चुकीचा असेल तर शेतकरी यांना
खूप त्रासदायक ही ठरू शकतो.
फेरफार नोंदीस
शेतकरी तसेच तलाठी व मंडळ अधिकारी यांचेसाठी अनन्यसाधारण महत्व आहे.अनेकवेळा चुकीचा फेरफार
केलेमुळे शेतकरी यांना त्रास तर होतोच परंतु तलाठी व मंडळ अधिकारी यांना देखील
शिस्तभंग कारवाई ला सामोरे जाणेची वेळ येते.अशा महसूल मधील अत्यंत महत्वाच्या
विषयावर सखोल मार्गदर्शन व प्रशिक्षण आवश्यक आहे परंतु नेहमी प्रशिक्षणात सर्व
बाबी समजणे कठीण आहे.अशावेळी या फेरफार नोंदी विषयी एखादे सखोल मार्गदर्शन करणारे
पुस्तक असावे अशी सर्व तलाठी व मंडळ अधिकारी यांची नेहमी मागणी राहिलेली आहे.या
सर्व बाबींचा विचार करून सोप्या सुटसुटीत भाषेत महसुली पुस्तकाची मांडणी करणारे
मा.डॉ.संजय कुंडेटकर सर ,उपजिल्हाधिकारी सातारा यांनी एक पुस्तक तयार केले आहे. सरांनी
१०१ प्रकारचे फेरफार अत्यंत सोप्या भाषेत “चला गोष्टींतून फेरफार शिकुया ..” या
पुस्तकात समजावून सांगितले आहेत.
या पुस्तकाचे वाचन
करून तलाठी व मंडळ अधिकारी यांना फेरफार नोंदी बाबत कोणतेही अडचण येणार नाही याची मला
खात्री आहे.मा.डॉ.संजय कुंडेटकर सर यांनी “महसूल मित्र मोहसिन शेख” ( mohsin7-12.blogspot.in) या संकेतस्थळावर सर्वांसाठी हे पुस्तक उपलब्ध
करून दिलेबद्ल संपूर्ण तलाठी व मंडळ अधिकारी संवर्गातर्फे हार्दिक धन्यवाद.......
हे पुस्तक प्राप्त करणेसाठी खालील लिंक वर क्लिक करा.
No comments:
Post a Comment