Sunday, 26 June 2016

जनमाहिती अधिकारी

                                                    


माहिती अधिकार कायदा 2005 साली अस्तित्वात आला.आजपर्यंतच्या झालेल्या सर्व कायद्यापैकी सर्वात प्रभावशाली आणि जनताभिमुख असा हा कायदा आहे.या कायद्यामुळे अनेक गैरव्यवहार,भ्रष्टाचार व अनियमितता उघडकीस आली आहे.सर्वात जास्त वापर होणारा हा कायदा असून यामुले शासन लोकभिमुख ,पारदर्शक आणि गतिमान होणेस मदत होणार आहे.आज या कायद्याला 11 वर्ष झाले तरी नागरिकांचे या कायद्याविषयी असणारे आकर्षण व जनमाहिती अधिकारी यांना वाटणारी भिती अद्याप कमी झालेली नाही.
यातून असे निदर्शनास आले की,नागरिकांना मार्गदर्शन करणेसाठी या कायद्याविषयी मोठ्या प्रमाणात साहित्य उपलब्ध आहे.परंतु जनमाहिती अधिकारी यांना कामकाज करताना येणाऱ्या अडचणी त्यावर कोणते उपाय आहेत हे सांगणारे एकही पुस्तक आज बाजारात उपलब्ध नाही.या कायद्याबद्दल अनेक न्यायालयीन निर्णय आहेत परंतु एका ठिकाणी संकलित केलेले नाहीत.तसेच आज प्रत्येक कार्यालयात येणारे अर्ज पैकी 10% अर्ज केवळ त्रास देणेचे उद्देशाने आलेले असतात अशा अर्जांना कसा पायबंद घालता येईल हे पुस्तकात प्रामुख्याने नमूद आहे. या पुस्तकामध्ये जनमाहिती अधिकारी यांना उपयुक्त असणारे दोन शासन निर्णय ,कायद्यातील दोन कलमे व 24 न्यायनिर्णय संकलित करून एकत्ररित्या उपलब्ध करून दिले आहे.प्रथमदर्शनी हे पुस्तक जरी नकारात्मक वाटत असले तरी या पुस्तकामुळे ज्या लोकांकडून या कायद्याचा गैरवापर  जात आहे.आणि या कायद्याच्या उद्देशाला हरताळ फासला जात आहे त्यावर प्रभावीपणे वापरता येईल.त्या अर्थाने हे पुस्तक सकारात्मक असून सर्व जनमाहिती अधिकारी या पुस्तकाचा वापर करून मा.सर्वोच्च न्यायलय यांनी या कायद्याला “Sunshine Law”  अशी जी उपमा दिली आहे ती सार्थ ठरवतील ही अशा आहे.

हे पुस्तक प्राप्त करणेसाठी  खालील लिंक वर क्लिक करा 


लेखक:-श्री.शशिकांत जाधव 
नायब तहसिलदार ,सावंतवाडी
संकलन:-श्री.मोहसिन शेख 
तलाठी-शिंपोरा ता.कर्जत जि.अहमदनगर 
mohsin7-12.blogspot.in
mohsin7128a@gmail.com
9766366363

No comments: