Saturday, 7 December 2024

राहाता मंडळ अधिकारी कार्यालय बनले राज्यातील पहिले QR कोड कार्यालय

 राहाता मंडळ अधिकारी कार्यालय बनले राज्यातील पहिले क्यू-आर कोड वाचनालय


मंडळ अधिकारी डॉ.मोहसिन शेख यांचा नाविन्यपूर्ण उपक्रम


महाराष्ट्र शासन राजीव गांधी प्रशासकीय गतिमानता -२०२३ प्रथम क्रमांक पुरस्कार प्राप्त  राहाता शहराचे मंडळ अधिकारी डॉ.मोहसिन शेख  यांनी मंडळ अधिकारी कार्यालय  राहाता येथे क्यू आर कोड वाचनालय या संकल्पनेचा नाविन्यपूर्ण प्रयोग राबविला असून त्यामुळे राहाता मंडळ अधिकारी कार्यालय राज्यातील पहिले क्यू आर कोड वाचनालय निर्माण करणारे कार्यालय बनले आहे.क्यू आर कोड वाचनालय मध्ये वरिष्ट महसूल उप जिल्हा अधिकारी डॉ.संजय कुंडेटकर, उप जिल्हाधिकारी श्री.बबन काकडे , उप जिल्हाधिकारी श्री.गणेश मिसाळ तहसिलदार श्री.शशिकांत जाधव,मंडळ अधिकारी श्री.विनायक यादव व डॉ.मोहसिन शेख  यांनी लिखाण व संकलित केलेले केलेले पुस्तकांचे आकर्षक मुखपृष्ठ तयार करणेत आले असून सदर मुखपृष्ठावर त्या पुस्तकाचे क्यू आर कोड दर्शिवण्यात आले आहे.सदर क्यू आर कोड स्कॅन केल्यानंतर सदर पुस्तक सहज मोबाईल वर विनामूल्य उपलब्ध होणार आहे.
              राहाता मंडळ अधिकारी कार्यालयाने राबविलेल्या  क्यू आर कोड वाचनालय या संकल्पनेमुळे सर्व सामान्य नागरिक,शेतकरी व विधिज्ञ यांना फायदा होत असून या वाचनालय मध्ये वारस कायदे,फेरफार नोंदी ,महसूल प्रश्नोत्तरे,तालुका स्तरीय समित्या , माहिती  अधिकार कायदा ,तलाठी  मार्गदर्शिका ,ऑनलाईन ७/१२ व महसूल संबंधी जवळपास १०१ लेख यांचा समावेश असणारे नाबाद १०१ अशा पुस्तकांचा समावेश आहे.यामुळे महसूल मधील कायद्यामधील किचकट बाबी सहज सोप्या भाषेत नागरिकांना त्यांचे मोबाईल द्वारे मिळणार आहेत. सदर पुस्तकांची प्रिंट काढून पुस्तके संग्रही ठेवता येणार आहेत.

    महसूल संबंधी माहिती व कायद्याचे ज्ञान सर्व सामान्य नागरिकांना सहज एका क्लिक वर मिळावे म्हणून मंडळ अधिकारी कार्यालय येथे क्यू आर कोड वाचनालय ही संकल्पना राबविण्यात आली असून याचा सर्व सामान्य नागरिकांना नक्कीच फायदा होईल   -डॉ.मोहसिन शेख ,मंडळ अधिकारी, राहाता
    विशेषतः जनसामान्याच्या दृष्टिकोनातून अत्यंत उपयुक्त आणि प्रशंसनीय उपक्रम आहे.-डॉ.संजय कुंडेटकर उपजिल्हाधिकारी (से.नि)

















Friday, 29 December 2023

ग्राम पातळीवरील राजस्व पद्धती -एक विवेचन


*ग्रामपातळीवरील राजस्व कार्यपद्धती-एक विवेचन*


तलाठी,मंडळ अधिकारी तसेच महसूल अधिकारी व कर्मचारी यांना ग्राम पातळीवरील राजस्व पद्धती सर्वाना माहिती व्हावी यासाठी सोप्या आणि सहज भाषेत हे पुस्तक पारनेर तलाठी मित्र परिवार यांनी  सन 1990 मध्ये प्रकाशित केले.


*प्रस्तावना*


पारनेर उप-विभागाच्या तलाठी मित्र मंडळाचे हे पहिलेच पुस्तक आपल्या हाती देताना आम्हाला अत्यंत आनंद होत आहे. हे मित्र मंडळ म्हणजे काही प्रकाशन संस्था नाही. मात्र जी दुर्मिळ माहिती आमच्या सर्व तलाठी बांधवांना व इतर अधिकाऱ्यांना सतत आवश्यक असते ती एकत्र करुन मर्यादित वितरणासाठी प्रकाशीत करणे हा आमचा उद्देश आहे. जमीन महसुल पद्धती व त्यातील समस्या जितक्या गुंतागुंतीच्या तितक्याच त्या पुरातन आहेत. स्वातंत्र्य प्राप्तीनंतर शासनाने विचारपूर्वक जे धोरण अंगिकारले आहे त्या धोरणाशी सुसंगत ठरेल अशी “ हक्क नोंद पद्धती अस्तित्वात येणे निकडीचे आहे कारण त्यावर विविध भुसुधारणा कायद्यांचे यशापयश अवलंबून आहे. ग्रामपातळीपासुन प्रत्येक स्तरावरील महसुल अधिकाऱ्यांना विविध कायदे, नियम, शासन आदेश परिपत्रके, न्यायनिवाडे इ. बाबतची अद्यावत माहिती देणेसाठी वरचेवर प्रशिक्षण देणेची गरज आहे. नाशिक महसूल विभागामध्ये सुरुवातीला नेमणूकीनंतर तलाठी मित्रांना सुरुवातीचे प्रशिक्षण दिले गेले होते. ते फक्त चार गटांपुरते मर्यादित होते. नंतर सेवाकालीन प्रशिक्षणाची व्यवस्था झाली नाही. देशभर आणि जगभर प्रचंड वेगाने माहितीचा स्फोट व संस्करण होत आहे या प्रक्रियेत महसूल प्रशासनाचा महत्वाचा घटक असणारा तलाठी व इतर अधिकारीवर्ग दुर्लक्षिला जाऊ नये असे वाटते. *पारनेर उपविभागाचे सहाय्यक जिल्हाधिकारी मा. श्री. विपीन मल्लीक, व पारनेरचे तहसीलदार श्री. प्रल्हाद कचरे* यांचेशी सतत या विषयावर आम्ही चर्चा करायचो तेच आमचे प्रशिक्षण झाले असे आम्ही समजतो. तेव्हा आम्हाला " हक्क नोंद व इतर संलग्न विषयांवर " लिखीत स्वरुपात काही माहिती उपलब्ध करुन द्या असा आम्हीच त्यांचेकडे आग्रह धरला आणि त्यांनीसुद्धा आमच्या विनंतीचा आदर करुन दैनंदिन कामातून वेळ काढून अभ्यासपूर्वक आणि परिश्रमपूर्वक लिहिलेल्या या पुस्तकाचे हस्तलिखित आम्हाला दिले याबद्दल आम्ही त्यांचे ऋणी आहोत. या पुस्तकामध्ये महसुल पद्धती हक्क नोंदीच्या इतिहासापासुन विविध पैलूंवरती कायदे व नियम यांच्या आधारे माहिती दिली आहे. या पुस्तकाचे वैशिष्ट्य म्हणजे तलाठ्याला त्याचे कर्तव्य म्हणून माहित असाव्यात अशा सर्व वारसा कायद्यांतील महत्वाच्या तरतूदी यामध्ये समाविष्ट करण्यात आल्या आहेत. इतर संलग्न विषयांची माहितीही दिली आहे. काही ठिकाणी संपादकांनी त्यांचे मतप्रदर्शन केले आहे, ते योग्य की अयोग्य यावर वाद करण्याऐवजी आम्ही ते याद्वारे चर्चेसाठी खुले ठेवीत आहोत. या पुस्तकातील माहितीमूळे वाचकांच्या मनातील जून्या प्रथा व नवे नियम या बाबतचा गोंधळ दूर होईल तसेच यातील माहितीचा उपयोग सर्व स्तरावरील अधिका-यांना त्यांच्या कार्यालयीन कामात विदिक्कतपणे करता येईल अशी आमची धारणा आहे. आम्हाला हे पुस्तक लिहून देवून ते प्रकाशीत करण्याची संधी दिली याबद्दल या संपादक द्वयाचे पुनश्च ऋण व्यक्त करतो. हे पुस्तक अल्पावधीत छापून देणेसाठी "शिवशक्ती प्रिंटींग प्रेसचे मालक श्री. शंकरराव हिरणवाळे व त्यांचे कर्मचारी " तसेच वल्लाकटी कर्माशयल आर्टीस्ट, अहमदनगरचे श्री. वेंकटेश वल्लाकटी व सुभाष वल्लाकटी यांनी संदर्भानुरुप मुखपृष्ठ तयार करुन देण्यासाठी जे परिश्रम घेतले, त्याबद्दल आम्ही त्यांचे आभारी आहोत !


*तलाठी मित्र मंडळ, पारनेर उपविभाग, अहमदनगर - प्रकाशन समिती*


१) श्री. तुळशीराम दत्तात्रय काळे कामगार तलाठी. वनकुटे. ता. पारनेर अध्यक्ष 

२) श्री. बी. एन. फुलारी कामगार तलाठी, जलालतूर, ता. कर्जत उपाध्यक्ष 

३) श्री. एन. के. वायकर कामगार तलाठी, टाकळीलोणार, ता. श्रीगोंदा सरचिटणीस ४) श्री. ए. बी. पवार कामगार तलाठी, राजूरी, ता. जामखेड खजिनदार 

५) श्री. एम. एस. खराडे कामगार तलाठी, फक्राबाद, ता. जामखेड सदस्य 

६) श्री. एस. एल. निकम कामगार तलाठी, चिलवडी, ता कर्जत सदस्य

 ७) श्री. एन. एम. गटकळ कामगार तलाठी, काष्टी, ता श्रीगोंदा सदस्य

 ८) श्री. बी. एम. हिंगे कामगार तलाठी, टाकळी ढोकेश्वर ता. पारनेर सदस्य 

९) श्री. बी. आर. दाते कामगार तलाठो, पळशी, ता. पारनेर सदस्य

 १०) श्री. एस. वाय. गिरमकर कामगार तलाठी, भानगांव, ता श्रीगोंदा सदस्य

 ११) श्री. बी. एस. जायभाय कामगार तलाठी, मोहा, ता. जामखेड सदस्य 

१२) श्री. डी. एच. रासकर तलाठी, लोणी मसदपूर ता.कर्जत सदस्य


सदरचे हे जुने पुस्तक सर्वाना माहितीसाठी व अभ्यासासाठी ब्लॉग वर उपलब्ध करून देण्यात येत आहे 


सदर पुस्तक pdf स्वरूपात प्राप्त करणेसाठी खालील लिंक वर क्लिक करावे 👇👇👇


ग्रामपातळीवरील राजस्व कार्यपद्धती-एक विवेचन  


🟡🟠🔴⚫🟣🔵🟢🟡🟠🔴

*लेख-पारनेर उपविभाग तलाठी*

*संकलन-श्री.मोहसिन शेख*

*मंडळ अधिकारी राहाता*

Blog-mohsin7-12.blogspot.com

Mail-mohsin7128a@gmail.com

Contact -9766366363

🔴🟠🟡🟢🔵🟣⚫🔴🟠🟡

Saturday, 7 October 2023

राजीव गांधी प्रशासकीय गतिमानता पुरस्कार

 महाराष्ट्र शासनाचा प्रथम क्रमांकाचा पुरस्कार


       *अर्धन्यायिक प्रकरणातील क्यू आर कोडच्या नाविन्यपूर्ण व्यक्तिगत उपक्रमास राज्याचा प्रथम क्रमांक*


    प्रशासनाच्या सेवांच्या गुणवत्तेमधील वाढ,लोकाभिमुखता व निर्णय क्षमता आणण्यासाठी तसेच सर्वांच्या सहकार्यातून उत्तम प्रशासन कार्यन्वित करण्यासाठी राजिव गांधी प्रशासकीय गतिमानता अभियान महाराष्ट्र शासनामार्फत राबविण्यात येते.या अभियाना अंतर्गत सहभाग घेऊन सर्वोत्तम कामगिरी करणारी कार्यालयेअधिकारी व सर्वोत्कृष्ट कल्पना उपक्रम सुचविणा-या शासकीय संस्था ,अधिकारी व कर्मचारी यांना पारितोषिके देऊन गौरविण्यात येते 

            महाराष्ट्र शासनातर्फे देण्यात येणारा प्रशासकीय क्षेत्रातील सर्वोच्च राजिव गांधी प्रशासकीय गतिमानता  २०२२ चा राज्यातील प्रथम क्रमांकाचा पुरस्कार डॉ.मोहसिन शेख मंडळ अधिकारी राहाता यांना आज शासन निर्णयाद्वारे महाराष्ट्र शासनाने जाहीर केला आहे.मोहसिन शेख यांनी अर्धन्यायिक प्रकरणात देशात प्रथमच क्यू आर कोडचा प्रभावी वापर करून प्रशासन गतिमान केले याची दखल महाराष्ट्र शासनाने घेतली असून आज शासन निर्णयाद्वारे डॉ.मोहसिन शेख यांचे क्यू आर कोड या नाविन्यपूर्ण उपक्रमास महाराष्ट्र  राज्याचा प्रथम क्रमांकाचा जाहीर केला आहे. प्रशासकीय क्षेत्रातील सर्वोच्च राजिव गांधी प्रशासकीय गतिमानता २०२२ चा राज्यातील प्रथम क्रमांकाचा पुरस्कार घेणारे डॉ.मोहसिन शेख मंडळ अधिकारी राहाता हे राज्यातील पहिलेच मंडळ अधिकारी ठरले आहेत.यापूर्वी अनेक सामाजिक संघटना यांनी मोहसीन शेख यांचे सामाजिक उपक्रम तसेच महसूल मित्र मोहसिन शेख या ब्लॉगची दखल घेऊन अनेक राज्यस्तरीय पुरस्कार त्यांना जाहीर केलेले आहेत तसेच मा.महसूल मंत्री महाराष्ट्र राज्य व मा.विभागीय आयुक्त नाशिक यांनी देखील क्यूआर कोड उपक्रमाची दखल घेऊन डॉ.मोहसिन शेख यांना सन्मानित केलेले आहे. महाराष्ट्र राज्यातील प्रशासकीय क्षेत्रातील सर्वोच्च राजिव गांधी प्रशासकीय गतिमानता २०२२ चा राज्यातील प्रथम क्रमांकाचा पुरस्कारमध्ये ५००००/- रु.प्रशस्तीपत्र व सन्मानचिन्ह असे पुरस्काराचे स्वरूप असून महाराष्ट्र राज्याचे मा.मुख्यमंत्री,मा.उपमुख्यमंत्री व मा.मुख्य सचिव यांचे हस्ते २१ एप्रिल रोजी नागरी सेवा दिना निमित हा पुरस्कार मुंबई येथे डॉ.मोहसिन शेख यांना प्रदान करणेत येणार आहे.



 “ माझे महसूल कारकीर्द मधील हा सर्वोच्च बहुमान मला मिळालेला असून आता जबाबदारी अनेक पटीने वाढली आहे.माझे कुटुंबीय व मित्र परिवार यांची खंबीर साथ असलेने मी हा यशस्वीउपक्रम करू शकलो. तसेच मा.महसूल मंत्री ना.राधाकृष्ण विखे पाटील, शिर्डी उपविभागीय अधिकारी गोविंद शिंदे,डॉ.संजय कुंडेटकर उपजिल्हाधिकारी ,राहाता तालुक्याचे तहसीलदार कुंदन हिरे,निशिकांत पाटील तलाठी जळगाव माझे गुरु सुरेश जेठे तलाठी अहमदनगर,व महसूल महाराष्ट्र ग्रुप मधील मार्गदर्शक यांचे वेळोवेळी मार्गदर्शन व सहकार्य लाभले .महाराष्ट्र शासनाने दिलेला हा सन्मान महसूल ,महाराष्ट्र ग्रुप मधील सर्व सदस्य, महसूल खात्यात नाविन्यपूर्ण उपक्रम करणारे राज्यातील सर्व मंडळ अधिकारी तलाठी , महसूल सहायक व अव्वल कारकून यांना मी अर्पण करत आहे”.-डॉ.मोहसिन शेख,मंडळ अधिकारी राहाता


















Sunday, 16 October 2022

राहाता मंडळाधिकारी डॉ.मोहसिन शेख यांची कल्पक व नावीन्यपूर्ण संकल्पना

 विशेष वृत्त_ 

महसूली अर्धन्यायीक निकाल ‘क्यूआरकोड’ द्वारे घरबसल्या मिळणार !


राहाता मंडळाधिकारी डॉ.मोहसिन शेख यांची कल्पक व नावीन्यपूर्ण संकल्पना

राज्यासाठी दिशादर्शक ठरणार

शिर्डी, १६ ऑक्टोंबर (उमाका वृत्तसेवा) – महसूल विभागामार्फत दिले जाणारे अर्धन्यायीक निर्णय प्रथमच ‘क्यूआर कोड’च्या माध्यमातून देण्याचा नावीन्यपूर्ण उपक्रम राहाता मंडळ कार्यालयाने राबविला आहे. मंडळ अधिकारी डॉ.मोहसिन शेख यांनी ही कल्पक संकल्पना प्रत्यक्षात उतरविली असून राज्यातील महसूल विभागासाठी हा निर्णय दिशादर्शक ठरणार आहे. शासकीय कामात अधिक पारदर्शकता व तत्परता ‘क्यूआर कोड’ निर्णयामुळे येणार असून नागरिकांना घरबसल्या निकाल मिळणार आहे. राहाता मंडळ अधिकारी कार्यालयाचा हा उपक्रम स्तुत्य व वाखाणण्याजोगा असल्याची प्रतिक्रिया वरिष्ठ प्रशासकीय अधिकाऱ्यांनी दिल्या आहेत. 


सोलापूर जिल्ह्यातील रणजित डिसले या शिक्षकांने ‘क्यूआर कोड’चा वापर प्रथम पाठ्यपुस्तकांमध्ये केला. या कल्पकतेची शासनाने दखल घेत सर्वच पाठ्यपुस्तकांमध्ये ‘क्यूआर कोड’ वापरण्यास सुरूवात केली. अशाच प्रकारची कल्पकता व नावीन्यता डॉ.मोहसिन शेख यांनी महसूल विभागात प्रथमच राबविण्यास सुरूवात केली आहे.  महसूल विभागामार्फ़त विविध अर्धन्यायिक प्रकरणात निर्णय दिले जातात व सदर आदेश  https://eqjcourts.gov.in या संकेतस्थळावर देखील उपलब्ध असतात. मात्र, या संकेतस्थळावरील निकालपत्र प्राप्त करून घेण्याची प्रक्रिया किचकट व त्यावरील स्कॅनसाठी कमी साईजचे असलेले बंधन यामुळे निकालपत्र तितके स्पष्ट दिसत नाही. या सर्व बाबींवर मात करण्यासाठी राहाता मंडळ अधिकारी कार्यालयात अर्धन्यायिक प्रकरणासाठी ‘क्यूआर कोड’ (QR code) ही संकल्पना राबविण्यात आली.


 अर्जदार सामनेवाले यांना केवळ निकालाची समज देणेबाबत कायद्यात व शासन निर्णयात तरतूद असल्याने निकालाची समज देताना त्या पानावर हे ‘क्यूआर कोड’ असणार आहे. त्यामुळे सहजासहजी हे निकालपत्र स्कॅन करून प्राप्त करता येणार आहे. तसेच निकालपत्र हे डिजिटल सहीचे असल्याने पुन्हा नक्कल काढण्याची आवश्यकता नाही. यामुळे अर्जदार, सामनेवाले, हितसंबंधित व्यक्ती व विधिज्ञ यांना मोठा फायदा होणार आहे. यामुळे शासकीय कामात अधिक पारदर्शकता येऊन तत्परता येणार आहे. अशी माहिती मंडळ अधिकारी डॉ.मोहसिन शेख यांनी दिली.


नाशिक विभागीय आयुक्त कार्यालयातील उपायुक्त रमेश काळे म्हणाले, ‘‘विधिज्ञ आणि पक्षकारांना ‘क्यूआर कोड’ उपक्रमाचा फायदा होईल. मालमत्ता सर्च रिपोर्ट, प्रमाणित प्रत मिळण्यास होणारा वेळेचा अपव्यय यामुळे टळणार आहे. प्रशासकीय पारदर्शकता निर्माण होण्यास मदत होणार आहे.’’


‘‘भारतीय पुरावा कायदा १८७२ च्या कलम ८५ सी व ६५ अन्वये  व माहिती तंत्रज्ञान कायदा २००२ च्या कलम ४ अन्वये  डिजिटल स्वाक्षरी असलेला अभिलेख पुरावा म्हणून ग्राह्य धरला जातो. त्यामुळे वेगळी प्रमाणित प्रत मागण्याची आवश्यकता नाही.  अशी प्रत पुरावा कायद्याच्या कलम ७६ अन्वयेही प्रमाणित प्रत म्हणून ग्राह्य धरतात. या उपक्रमामुळे निकालाची प्रत सहज व सुस्पष्ट उपलब्ध होत आहे.  वापर करण्याची पद्धत ही अंत्यंत  साधी व सोपी आहे.’’ अशी प्रतिक्रिया मुंबईचे मुद्रांक जिल्हाधिकारी किरण पाणबुडे यांनी दिली आहे.


अत्यंत स्तुत्य आणि अत्याधुनिक प्रकल्प असल्याची प्रतिक्रिया उपजिल्हाधिकारी डॉ.संजय कुंडेटकर यांनी दिली आहे. राहाता तहसीलदार कुंदन हिरे म्हणाले, पक्षकारांच्या वेळेची बचत होण्याच्या दृष्टीने उचललेले सकारात्मक पाऊल असून अपील दाखल करण्यास विलंब टळणार आहे. 


शासनाकडून  अधिकृतपणे अशी कार्यपद्धती सर्वस्तरावर शक्य तितक्या लवकर बंधनकारक करण्यात यावी. अशी अपेक्षा सेवानिवृत्त महसूल उपायुक्त प्रल्हाद कचरे यांनी व्यक्त केली आहे. 


‘क्यूआर कोड’ चा वापर कसा करावा ?


मोबाईलमध्ये प्लेस्टोर किंवा ॲपस्टोर मधून ‘क्यूआर कोड’ स्कॅन ॲप डाऊनलोड करून घ्यावे व अँप मधील स्कॅन पर्याय वापर करून ‘क्यूआर कोड’ स्कॅन करावा. त्यांनतर ओपन वेबसाईट वर क्लिक केल्यास डिजिटल सहीचा संपूर्ण निकाल आपणाला मोबाईलमध्ये पीडीएफ स्वरूपात प्राप्त होईल. आपण त्याची प्रिंट काढू शकता व तो निकाल इतरांना पाठवू ही शकता.


Saturday, 1 October 2022

महसूल वाचनालय (महसूल ई -लायब्ररी)


महसूल वाचनालय या  विशेष उपक्रमात आपण महसूल विषयी बाजारात न मिळणारी पुस्तके  व  लेख  शेतकरी व सर्व सामान्य नागरिक यांना  एकाच ठिकाणी उपलब्ध करून देत आहोत.जवळपास महसूल विषयी सोप्या भाषेत माहिती देणारे 300 लेख  व पुस्तके या एकाच ठिकाणी उपलब्ध करून  देत आहोत ज्यामुळे महसूल कायद्या विषयी जागृती होण्यास नक्कीच मदत होईल.लेख अथवा पुस्तके प्राप्त करणेसाठी खालील लिंक वर क्लिक करावे.






प्रसिद्ध केलेले लेख व पुस्तके

1. चला गोष्टीतून फेरफार शिकूया 

2. 7/12 वरील वारसाची  नोंद 

3.  महसूल प्रश्नोत्तरे 

4.  महसूल न्यायालय 

5.  महसूल कामकाज मार्गदर्शिका

6. तलाठी कामकाज  मार्गदर्शिका 

७. जाणून घ्या महसूल सलंग्न कायदे 

8. 7/12 माहिती 

9. अलिअनेशन मॅन्युअल  

10. 7/12 वरील आणेवारी 

11. 7/12 वरील आणेवारी 

१२. ७/१२ पोटखराबा क्षेत्र म्हणजे काय ?

13. 7/12 वर कुळ म्हणजे काय ?

14. पिक पाहणी केस  बाबत माहिती

15. जाणून घ्या मोजणी मधील महत्त्वपूर्ण संज्ञा 

16. खातेफोड / वाटपपत्र तरतुदी 

17.मृत्युपत्र तरतुदी 

18. मृत्युपत्र शाबीत किंवा प्रोबेट करणे

19. नोंदणीकृत मृत्यूपत्र रद्द करता येईल काय ?

20. वारसा कायदे आणि मृत्यपत्र  

21. दत्तक कायदा

22. मुस्लिम वारस कायदा तरतुदी

23. गाव नमुना सात बारा

24.  वापरातील रस्ता अडवला आहे  काय?

25. अधिकारी पूर्व जबाबदारी तरतुदी

26. राज्य जमीन तरतुदी

27. गौणखनिज युनिट माहिती

28. फेरफार नोंद व अपील तरतुदी

29.रस्ता मागणी कशी करावी व रस्ता अडविल्यास काय करावे ?

30.सात बारा वरील चूक दुरुस्ती कशी करावी ??

31.इनाम व वतन जमिनी बद्दल जाणून घ्या

32.देवस्थान इनाम जमिनी बद्दल माहिती जाणून घ्या

33.बिनशेती आदेशाची नोंद कशी करावी ?

34.जातीचे दाखले विषयी आवश्यक माहिती

35.कुलमुखत्यार पत्र बाबत माहिती

36.ज्येष्ठ नागरिक बाबत तरतुदी

37.ओळखपरेड कशी घ्यावी ?

38.एकत्र कुटुंब कर्ता म्हणजे काय ?

39.ऐपत दाखला अथवा सॉलव्हनसी सर्टीफिकेट बाबत माहिती

40.पारसी वारस कायदा

41.महसूल कायदे ओळख

42.वर्ग 2 जमीन सुधारित तरतुदी

43.वृक्षतोड परवानगी

44.हिबानामा

45.थकबाकी वसुली कशी करावी ?

46.नोटीस कशी बजवावी ?

47.कुळकायदा महत्वाच्या तरतुदी

48.तहसिल कार्यालय कामकाज

49.गावठाण विस्तार बाबत माहिती

50.आदिवासी जमीन बाबत तरतुदी

51.महसूल शंका समाधान

52.फौजदारी संहिता कलम 145 ची कार्यवाही

53.सहा गठ्ठे पद्धत म्हणजे काय ?

54.फेरफार नोंद करताना तलाठी यांनी काय तपासणी करावी ?

55.वर्ग 2 वाटप जमिनी गाव नमुना 1क

56.कब्जेहक्क /भाडेपट्टा नोंदवही

57.शेतजमिनीची खरेदी करताना कोणती काळजी घ्यावी ?

58.गावातील शेत रस्ते व हद्दी

59.कमी जास्त पत्रक म्हणजे काय ?

60.इक्विटेबल मॉर्गेज म्हणजे काय

61.प्रतिकुल ताबा /ऍडव्हर्स पझेशन म्हणजे काय

62.टिपणी लेखन कसे करावे ?

63.टपाल व्यवस्थापन कसे करावे ?

64.कार्यविवरण आणि संकलन नोंदवही

६५. आदेशाची नोंदणी

66. पोकळीस्त कुळ कमी करणे

67. जमीन अतिक्रमण

68. पिक पाहणी केस फॉर्म नंबर 14 काय आहे ?

69. पिक पाहणी परिस्थिती मा.सर्वोच्च न्यायालय ने निकाल दिला

70. पोटहिस्सा मोजणी फी वसुली

71.  मुस्लिम व्यक्तीचा दत्तक अधिकार

72.



Tuesday, 29 March 2022

७/१२ वरील आणेवारी कशी काढावी

 Aanewari Convertor📱


महसूल खात्यात सध्या *आणे- पै*  हा विषय फारसा प्रचलित नसला तरी जुन्या सातबारामध्ये आणे आणि पै नुसार क्षेत्र नमूद असल्याचे दिसून येते.

त्या नोंदीवरून क्षेत्र किंवा हिस्सा कसा मोजावा यासाठीइकबाल मुलाणी सातारा यांनी हे सॉफ्टवेअर स्वरूपात तयार केले आहे . खालील  लिंक वापरून आपण सहज क्षेत्र ठरवू शकता


Online Aanewari Convertor

Convertor download


Android Application Download link

App Download