महसूलमधील कायद्यांचे किचकट स्वरूप व वेळे अभावी होणारे अपुरे
प्रशिक्षण यामुळे महसूल खात्यातील कर्मचारी व अधिकारी यांना अनेक अडचणी येतात.या
अडचणी कमी व्हाव्यात या उद्देशाने दिनांक १ जुलै २०१५ रोजी महसूल मित्र मोहसिन शेख
(mohsin7-12.blogspot.in) या नावाने ब्लॉग तयार केला व माझे काही लेख
त्यावर शेअर केले.ब्लॉगला उत्तम प्रतिसाद मिळाला व या माध्यमातून राज्यातील
अभ्यासू अधिकारी व कर्मचारी यांची चांगली ओळख निर्माण झाली व त्यातून सप्टेंबर
२०१५ मधेच महाराष्ट्र तलाठी व महसूल महाराष्ट्र या दोन राज्यस्तरीय ग्रुपची निर्मिती
केली.महाराष्ट्र तलाठी या ग्रुप मध्ये केवळ तलाठी असून त्यामध्ये संघटना चर्चा व
कायदेशीर मार्गदर्शन या दोन्ही बाबी शेअर केल्या जातात तर महसूल महाराष्ट्र या
ग्रुप मध्ये अप्पर जिल्हाधिकारी पासून तलाठी या संवर्गातील अधिकारी व कर्मचारी
असून यामध्ये केवळ महसूल मधील शंका समाधान केले इतर माहिती टाकणाऱ्या सदस्याला तत्काळ
रिमुव्ह केले जाते.महसूल महाराष्ट्र या ग्रुपची लोकप्रियता खूप असलेमुळे आज रोजी
या ग्रुपचे १० ग्रुप कार्यरत आहेत.या प्रत्येक ग्रुप मध्ये डॉ.संजय कुंडेटकर सर
प्रमुख मार्गदर्शक असून त्यांनी आज अखेर महसूल मधील अनेक विषयांवर १६० पेक्षा अधिक
लेख लिहले आहेत.या ग्रुपच्या माध्यमातून महसूल ज्ञानाचा खजाना त्यांनी सर्वांसाठी
खुला केला आहे.हे सर्व लेख एकत्र असल्यास त्यांचा अभ्यास व वाचन करणे सोपे जाईल
असे अनेक अधिकारी कर्मचारी यांची मागणी होती त्यामुळे मी कुंडेटकर यांनी मिळून
महत्वपूर्ण १०१ लेख असणारे एक पुस्तक संकलित करायचे ठरवले व त्याप्रमाणे हे पुस्तक
तयार केले आहे सदर पुस्तक १३२५ पानांचे असून आपण याची प्रिंट काढून संग्रही ठेवावी
असे हे पुस्तक आहे.तरी सर्व अधिकारी ,कर्मचारी व नागरिकांनी या पुस्तकाचा लाभ
घ्यावा.
लेखक-डॉ.संजय कुंडेटकर,उपजिल्हाधिकारी परभणी
संकलन श्री.मोहसिन शेख,मंडळ अधिकारी मिरजगाव ता.कर्जत जि.नगर
blog -mohsin7-12.blogspot.in
email.mohsin7128a@gmail.com
contact-9766366363
हे पुस्तक प्राप्त करणेसाठी खालील लिंक वर क्लिक करावे.
No comments:
Post a Comment