Tuesday, 2 May 2017

कायदा लोकसेवा हक्काचा

 विविध प्रशिक्षणामध्ये अधिकाऱ्यांनी विचारलेले प्रश्न व अडचणी विचारात घेऊन 'महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम २०१५' बाबत  एक  सर्वसमावेशक पुस्तकलेखन करण्याची जबाबदारी स्वीकारून मा.श्री.प्रल्हाद कचरे सर ,उपायुक्त (महसूल) ,औरंगाबाद विभाग तथा संचालक  मराठवाडा प्रशासकीय व विकास प्रबोधिनी  (मदता) ,पैठण  यांनी 'कायदा लोकसेवा हक्काचा'  हे पुस्तक लिहले आहे.हे पुस्तक 'मराठवाडा प्रशासकीय व विकास प्रबोधिनी  (मदता) ,पैठण यांनी एप्रिल २०१७ मध्ये प्रकाशित केले आहे.सदर पुस्तक ब्लॉग वर प्रकाशित करणेसाठी मा.कचरे सर यांनी परवानगी दिली असून pdf  स्वरुपात हे पुस्तक प्रकाशित करत आहोत.


पुस्तक प्राप्त करणेसाठी खालील लिंक वर क्लिक करा
कायदा लोकसेवा हक्काचा

महसूल कायद्याविषयक सुलभीकरणाचे महत्वपूर्ण निर्णय

महसूल कायद्यामध्ये विविध कायद्यांचा समावेश होतो.या सर्व कायद्यांमध्ये नेहमी महत्वपूर्ण सुधारणा करणेत येतात परंतु आपलेकडे या सुधारणा एकत्रित स्वरुपात पहावयास मिळत नाही.या सर्व बाबींचा विचार करून विभागीय आयुक्त कार्यालय ,औरंगाबाद यांनी सन २०१४ ते फेब्रुवारी २०१७ पर्यंत महसूल विषयक सुधारणांचा एकत्रित संच तयार करून सर्वांसाठी उपलब्ध करून दिला आहे.मा.प्रल्हाद कचरे सर,उपायुक्त (महसूल ) औरंगाबाद विभाग यांनी सदर संचिका उपलब्ध करून दिली असून सरांनी त्याबाबत खालील प्रतिक्रिया दिली आहे.

"We have compiled important amendments made to Maharashtra Land Laws during last few years. As GoM is following up "Ease of Doing Business Policy" This would help in effective implementation and monitoring." 

With regards. 
*********************************************
Pralhad Kachare
Deputy Commissioner (Revenue)
Divisional Commissioner's Office,
Aurangabad Division, Delhi Gate, Aurangabad .
Tel..0240-2353562 Cell- 9422750464
Blog : www.revenueofficers.blogspot.com


सदर सुधारणा बाबत संचिका प्राप्त करणेसाठी खालील लिंक वर क्लिक करा.