विभागीय दुय्यम सेवा परीक्षा तलाठी यांनी मुदतीत म्हणजे ४ वर्ष आणि ३ संधी
मध्ये उत्तीर्ण होणे आवश्यक आहे.तलाठी संवर्ग विभागीय दुय्यम सेवा परीक्षा यामध्ये
४ विषय बाबत प्रश्नपत्रिका असतात आणि एक
विषय हा मुलाखतीचा विषय असतो.प्रश्नपत्रिका क्रमांक १ व २ हे २५० गुणांचे असून
यामध्ये पास होणेसाठी किमान ५०% म्हणजे १२५ गुणांची आवश्यकता आहे. पण अनेक तलाठी
या परीक्षे मध्ये नापास होतात कारण प्रश्नपत्रिका कशी सोडवावी याबाबत जास्त माहिती
नसलेमुळे हे घडते. महसूल बाबी क्र. १ प्रश्नपत्रिके विषयी आज आपण माहिती घेऊ या.
हा विषय महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम
१९६६ व त्याखालील नियम यावर आधारित आहे.यामध्ये
मागील प्रश्नपत्रिका चे अवलोकन केले असता बरेच प्रश्न दरवर्षी विचारले
जातात.सर्वसाधारण पणे व्याख्या ४० गुणांसाठी विचारले जातात मागील वर्षीची
प्रश्नपत्रिका पहिली असता व्याख्या ऐवेजी टिपा व संक्षिप्त माहिती द्या या
स्वरूपाचे प्रश्न विचारले गेले आहेत यावर्षीही याप्रकारच्या प्रश्नाचा समावेश होऊ
शकतो.सर्वसाधारणपणे व्याख्या लिहिताना महाराष्ट्र जमिन महसूल अधिनियम १९६६ चे कलम २
मधील पोटकलम चा उल्लेख करावा उदा.जमीन मालक व्याख्या विचारलेस महाराष्ट्र जमीन
महसूल अधिनियम १९६६ चे कलम २ (१७)नुसार जमीन मालक या संज्ञेचा अर्थ जमीन पट्ट्याने
देणारा असा होतो. अशा प्रकारे लिहावी कोणत्याही अधिनियमात व्याख्या या कलम २ मधेच
असतात त्यामुळे पोटकलम लक्षात ठेवावे. महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम १९६६
मधील कलम २ मध्ये एकूण ४४ व्याख्या सर्व व्याख्या पाठ कराव्यात याचा तलाठी कामकाज खूप
फायदा होतो व संकल्पना ही स्पष्ट होतात.मागील प्रश्नपत्रिका चा विचार करता
महत्वाच्या व्याख्या पुढील प्रमाणे दुमाला ,शेतातील इमारत,चावडी ,जमीन
महसूल,भोगवटदार,पार्डी जमीन कुळ ,वाडा जमीन ,नागरी क्षेत्र या व्याख्या पाठ
कराव्यात व वर सांगितले प्रमाणे कलम २ मधील पोटकलम उल्लेख करून लिहावे.तसेच
प्रत्येक मोठा प्रश्न,छोटा प्रश्न किंवा टिप लिहिताना संदर्भ म्हणून म.ज.म अ.१९६६
चे कलम..... असे अधोरीखीत करून उत्तर लिहण्यास सुरुवात करावी.अशा महत्वाचे प्रश्न व त्यांची उत्तरे देणारी एक pdf तयार केली याचा सर्वाना उपयोग होईल
ही pdf प्राप्त करणेसाठी खालील लिंक वर क्लिक करा
6 comments:
अगदी सुरुवातीला जर महसूल विषयक माहिती आम्हाला कुठे मिळाली असेल तर ती आपल्या ब्लॉग वर!!
महसूल विषयक माहिती जीर्ण झालेल्या SO file मधेच मिळते अशी आमची त्या पूर्वीची धारणा होती ती आपण बदलली महसुली माहितीचा सागर आमच्या ओंजळीमध्ये उपलब्द करून दिला..
आपल्या ब्लॉग ने ज्ञान दान यज्ञाला सुरुवात केली त्यात अनेकांनी आपापल्या परीने समिधा टाकून हे यज्ञ धगधगत ठेवले..����
आपले खूप खूप खूप आभार��
दिनेश नकाते(सहाय्यक विक्रीकर आयूक्त)
एक नंबर माहिती आहे
Plz mala 4 number chi प्रश्नपत्रिका आहे का
👌
👌
👌
Post a Comment