Tuesday, 11 October 2016

महसूल प्रश्नोत्तरे -डॉ.संजय कुंडेटकर

      
       


      महसूल अधिकारी किंवा कर्मचारी म्हणून काम करतांना आपण राज्य शासनाच्या एकूण ३७ शासकीय विभागांपैकी २६ विभागांसाठी दररोज अनेक भिन्न भिन्न कायद्यांतर्गत काम करीत असतो. प्रत्येक कामाबद्दल आपल्याला पुरेसे ज्ञान असतेच असे नाही. त्यामुळे काहीवेळा अजाणतेपणाने आपल्या हातून चुका होतात. कधी कधी याची फार मोठी किंमत मोजावी लागते.  
      महसूल खात्यांत अनेक वेळा तात्काळ निर्णय घ्यावा लागतो. त्यावेळेस अनेक प्रश्न मनात उपस्थित होतात. त्यांची उत्तरे शोधण्याचा प्रयत्न‍ केला तर अनेक कायद्यााची पुस्तके चाळावी लागतात.अनेक अधिकारी/कर्मचारी यांनी विविध प्रकारचे अभ्यासू व अनुभवी मार्गदर्शन करतांना, कायदेशीर तरतुदींवर अनेक उत्कृष्ठ लेख लिहिलेले आहेत. परंतु अशा लेखांतून नेमके उत्तर शोधणे काहीवेळा शक्य होत नाही.

        या गोष्टींचा विचार करून, तातडीच्या वेळेला नेमके उत्तर मिळावे या दृष्टीकोनातून "महसूल प्रश्नोत्तरे" ची रचना केलेली आहे. यात 'महसूल विषयक' विभागात २०७ प्रश्न, 'कुळकायदा विषयक' विभागात ४० प्रश्न 'न्या‍य विषयक' विभागात ५६ प्रश्न आणि 'वारस विषयक' विभागात ८८ प्रश्न असे एकूण ३९१ प्रश्न, असे भाग करून प्रश्नांचे विविध संच, विषयनिहाय उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केला आहे. विविध प्रश्नांची उत्तरे देतांना, शक्य तिथे कायदेशीर तरतुदी, कायद्यातील कलम आणि न्यायालयीन आदेशांचा संदर्भ दिलेला आहे. यामुळे कायदेशीर अथवा न्या‍यालयीन निकालाचा संदर्भ देऊन निकाल लिहिण्यास किंवा एखाद्या अर्जाला उत्तर देण्यास मदत होईल.  

       "महसूल प्रश्नो्त्तरे" महसूल खात्यातील सर्वच स्तरावरील अधिकारी/कर्मचार्यांसाठी उपयुक्त ठरेल अशी अपेक्षा आहे. "महसूल प्रश्नोत्तरे" मध्ये काही त्रुटी असण्याची शक्यता नाकारता येत नाही. आवश्यक तेथे अद्ययावत तरतुदींचा संदर्भ घ्यावा ही विनंती.  

हे पुस्तक प्राप्त करणेसाठी खालील लिंक वर क्लिक करा 


6 comments:

KANTESHWAR MEHENGE said...

सर कोर्ट मध्ये तडजोड झाली तर सदर तडजोड आधारे नियमानुसार कार्यवाही करावी. असे तहसिल कार्यालयातुन पत्र देऊन कळविण्यात आले. मात्र मा.नोंदणी महानिरीक्षक पुणे यांचे २०१३ चे परिपत्रकात म्हटले आहे कि, कोणत्याही प्रकारचा न्यायालयाने पारित केलेला आदेश अथवा डिक्री सदर मिळकत ज्या दुय्यम निबंधक यांचे कार्यक्षेत्रात येत असेल तेथे नोंदणी करणे आवश्यक राहील. तरीदेखील तहसिल मधुन रक्ताच्या नात्यात तडजोड झाली असेल तर फेरफार घेण्यात यावा असे सांगितले .तरी कृपया यावर मार्गदर्शन करावे व रक्ताचे नाते या संज्ञेत कोण - कोण व्यक्ती समाविष्ट होतात ते कळवावे. कारण सदर तडजोड काका- पुतण्या मध्ये आहे .


आपला
के.पी.मेहेंगे, तलाठी
सजा आघुर, ता.वैजापुर जि.औरंगाबाद
whatsapp no.9764250324 कृपया प्रतिक्रिया द्या
धन्यवाद !!!!

Unknown said...

कोर्ट मध्ये तडजोड झाली तर सदर तडजोड आधारे नियमानुसार कार्यवाही करावी. असे तहसिल कार्यालयातुन पत्र देऊन कळविण्यात आले. मात्र मा.नोंदणी महानिरीक्षक पुणे यांचे २०१३ चे परिपत्रकात म्हटले आहे कि, कोणत्याही प्रकारचा न्यायालयाने पारित केलेला आदेश अथवा डिक्री सदर मिळकत ज्या दुय्यम निबंधक यांचे कार्यक्षेत्रात येत असेल तेथे नोंदणी करणे आवश्यक राहील. तरीदेखील तहसिल मधुन रक्ताच्या नात्यात तडजोड झाली असेल तर फेरफार घेण्यात यावा असे सांगितले .तरी कृपया यावर मार्गदर्शन करावे व रक्ताचे नाते या संज्ञेत कोण - कोण व्यक्ती समाविष्ट होतात ते कळवावे. कारण सदर तडजोड काका- पुतण्या मध्ये आहे .

Unknown said...

सर,मुलकी पड ची व्याख्या सांगावी

Unknown said...

सर जुनी खरेदी दस्त असेल तर त्याची नोंद करताना करताना कोणाची परवानगी घेणे गरजेचे आहे का का तलाठी एका अर्जावरु नोंद घेऊ शकतो का

Unknown said...

सर आदिवासी एकत्र कुंटुबातील जमीनीचे वाटणीपत्र करावयाचे आहे रजिस्टरी ऑफीस त्याची नोंदणी करत नाही त्याबदल अर्जाचा काही फारमॅट असेल PDF स्वरुपात उपलब्ध व्हावा ही विनंती

Dilawarkhan Pathan said...

सर,देवस्थान इनाम जमिनी व वक्फ जमिनी हया कश्या ओळखाव्या....कृपया मार्गदर्शन करावे