Saturday 24 October 2015

प्रश्न विचारण्यासाठी ब्लॉग वर विशेष सोय

           नागरिकांना महसूल विषयक अनेक प्रश्न व समस्या असतात परंतु मार्गदर्शन नसलेने वेळ ,पैसा तर वाया जातोच शिवाय मानसिक त्रास ही सहन करावा लागतो.प्रत्येकाला उचित मार्गदर्शन मिळाले तर या सर्व गोष्टी टाळता येऊ शकतील.यासाठीच मा. डॉ.विकास नाईक ,उपजिल्हाधिकारी यांनी व महाराष्ट्रातील  कर्तव्यदक्ष अधिकारी यांनी मिळून महाराष्ट्र सिविल सर्विस नावाची वेब चालू केली असून त्यावर जनतेसाठी  जनपीठ नावाचे स्वतंत्र दालन निर्माण केले आहे.जनपीठ मध्ये कोणीही कोणताही महसूलविषयक प्रश्न विचारू शकतो.या प्रश्नांचे उत्तर देणेसाठी महारष्ट्रातील तज्ञ अधिकारी वर्ग नेहमी तत्पर असतात.आजपर्यंत अनेक नागरिकांनी या वेब चा लाभ घेतला आहे.सदर वेब वरील जनपीठ या दालनाची लिंक या ब्लॉग वरील "महसूलविषयक प्रश्न येथे विचारा " यामध्ये जोडली आहे.त्यामुळे यावर क्लिक केलेस नागरिक थेट जनपीठ ला जोडले जाऊन आपले समस्या व प्रश्न मांडू शकतील.तरी ब्लॉग वरील या नवीन बाबींचा नागरिकानी लाभ घ्यावा. 

सौजन्य:- महाराष्ट्र  सिविल सर्विस

8 comments:

Unknown said...

महोदय, अ.पा.क.नोंदि मधे पालकास हस्तांतरण करण्याचे अधिकार असतात का? अथवा पालकना ती जमीन विक्री /वाटप करता येईल का ?

Mohsin shaikh said...

हिंदू अज्ञानत्व व पालकत्व अधिनियम १९५६ मधील कलम ८ नुसार अ.पा.क जमीन मध्ये पालकास दिवाणी न्यायालय यांचे परवानगी ने हस्तांतरण करता येते.

Unknown said...
This comment has been removed by the author.
Kkk said...

वारस नोंद व हक्कसोड पत्र करयाचे आहे. माहिती सांगा

mohasin 7-12blogspot.com said...

मला माझ्या शेतातील भावाला क्षेञ वाटुण देण्यासाठी काय करावे लागेल

Unknown said...

आता लॉकडाउन मध्ये करता येईल का हक्कसोडपत्र.. किती दिवस लागतील त्याला जर खूप गरजेचं असेल आत्ताच करण तर ....??? pls reply on rutujachaudhari591@gmail.com

Unknown said...

35 ते 40 वर्षापूर्वी वडिलांच्या बहिणीने जमिनी मध्ये हक्क सोडला होता त्यावेळी त्यांनी सही अंगठा तलाठी ऑफिसमध्ये दिला होता त्या जुन्या नोंदी कुठे मिळेल

sarikagawari said...

Binsheti vishyi gr pathwa