Saturday, 24 October 2015

प्रश्न विचारण्यासाठी ब्लॉग वर विशेष सोय

           नागरिकांना महसूल विषयक अनेक प्रश्न व समस्या असतात परंतु मार्गदर्शन नसलेने वेळ ,पैसा तर वाया जातोच शिवाय मानसिक त्रास ही सहन करावा लागतो.प्रत्येकाला उचित मार्गदर्शन मिळाले तर या सर्व गोष्टी टाळता येऊ शकतील.यासाठीच मा. डॉ.विकास नाईक ,उपजिल्हाधिकारी यांनी व महाराष्ट्रातील  कर्तव्यदक्ष अधिकारी यांनी मिळून महाराष्ट्र सिविल सर्विस नावाची वेब चालू केली असून त्यावर जनतेसाठी  जनपीठ नावाचे स्वतंत्र दालन निर्माण केले आहे.जनपीठ मध्ये कोणीही कोणताही महसूलविषयक प्रश्न विचारू शकतो.या प्रश्नांचे उत्तर देणेसाठी महारष्ट्रातील तज्ञ अधिकारी वर्ग नेहमी तत्पर असतात.आजपर्यंत अनेक नागरिकांनी या वेब चा लाभ घेतला आहे.सदर वेब वरील जनपीठ या दालनाची लिंक या ब्लॉग वरील "महसूलविषयक प्रश्न येथे विचारा " यामध्ये जोडली आहे.त्यामुळे यावर क्लिक केलेस नागरिक थेट जनपीठ ला जोडले जाऊन आपले समस्या व प्रश्न मांडू शकतील.तरी ब्लॉग वरील या नवीन बाबींचा नागरिकानी लाभ घ्यावा. 

सौजन्य:- महाराष्ट्र  सिविल सर्विस

शिवार रस्ते मोकळीकरण मोहीम -पाचोरा उपविभाग

महाराजस्व अभियान अंतर्गत शिवार रस्ते मोकळीकरण मोहीम सध्या महारष्ट्रात सर्वत्र चालू आहे.या मोहीमे  अंतर्गत मा.गणेश मिसाळ सर .उपविभागीय अधिकारी ,पाचोरा उपविभाग यांनी त्यांचे उपविभागात हीमोहीम  अत्यंत उत्तमपणे राबवली असून या शिवार रस्ते मोकळीकरण मोहीम बाबत माहिती देणारी ppt तयार केली आहे.सदर ppt पाहणेसाठी येथे क्लिक करा

Wednesday, 21 October 2015

विविध प्रकारचे तपासणी नमुने -पुरवठा विभाग

                         महसूल मधील पुरवठा विभाग अंतर्गत वारंवार रास्त भाव दुकान तपासणी ,केरोसीन दुकान तपासणी ,तसेच  धान्य साठा तपासणी अहवाल अशी अनेक प्रकारची तपासणी करावी लागते .अशी तपासणी करताना आपलेकडे तपासणी अहवाल नमुने असलेस तपासणी करताना अडचण येत नाही.मा.श्री.राजेंद्र शिंदे सर ,पुरवठा अधिकारी ,अन्न धान्य वितरण अधिकारी कार्यालय अहमदनगर यांनी खालील तपासणी अहवाल नमुने एकाच pdf मध्ये तयार केले आहेत.
  • रास्त भाव दुकान तपासणी नमुना 
  • गहू व डाळीच्या साठ्याचा तपासणी अहवाल घाऊक/किरकोळ 
  • तेल व तेलबिया साठा तपासणी अहवाल घाऊक/किरकोळ 
  • साखर साठ्याचा तपासणी अहवाल घाऊक/किरकोळ 
  • केरोसीन परवाना तपासणी अहवाल घाऊक/किरकोळ 
  • पेट्रोल पंप/डिझेल पंप तपासणी अहवाल 
  • किरकोळ रॉकेल विक्री केंद्राचा तपासणी नमुना 
हे सर्व नमुने प्राप्त करणेसाठी येथे क्लिक करा