वतनदारी संपुष्टात येताना
' वतन ' या शब्दाचा अरबी भाषेतला अर्थ राहण्याची जागा असा आहे . एखाद्या स्थावर मालमत्तेचा हक्क त्यासाठी केलेली नेमणूक , चाकरी , वंश परंपरेने चालत आलेले काम , अशा अनेक अर्थानि वतन हा शब्द वापरला जातो . वर्तन ( उपजीवीकेचे साधन ) या संस्कृत शब्दापासून हा शब्द निघाला असे मानतात यासंदर्भातील दुसरा शब्द म्हणजे ' इनाम इनाम विशेषतः मुघल राजांनी मोठमोठ्या सरदारांना गावची कामे करणाऱ्यांना आणि धर्मादाय संस्थांना रोख रक्कम किंवा सोने चांदी देण्याऐवजी कायम स्वरूपी उत्पन्नाचे साधन म्हणून जमिनी दिल्या . थोडक्यात इथलीच जमीन इथल्याच लोकांना देऊन त्या बदल्यात चाकरी किंवा काम करून घेण्याची प्रथा पडली एखादे काम पिठ्यान् पिठ्या केल्यामुळे राहण्याच्या वस्तीपासून भिक्षुकी करेपर्यंत जी कामे वंशपरंपरेने काही लोक गावगाड्यात करत राहिले ते सर्व जण बतनदार बनले याच वतनदारीमुळे वतन वृत्ती बोकाळल बलांचा व्यवसाय मुले करू लागली . त्याचा परिणाम म्हणून वंश परंपरेने चालत असलेले व्यवसाय धंदे आयते मिळाले व या धंद्याचे बारकावे पण मुलांना लहानपणापासून माहिती झाले . वडिलांना सुद्धा माहीत असलेल्या व्यवसायात मुलाने पहावे असे वाटत असे या व्यवस्थेचे काही फायदे होते आणि काही तोटे होते . वतनदारी व्यवस्थेमुळे आणि वंश परंपरागत तेच तेच व्यवसाय करत आल्यामुळे त्यांच्यात प्राविण्य आणि कौशल्य निर्माण झाले खरे , परंतु मान्यता फारशी निर्माण परिणाम म्हणूनह बदल झाले नाहीत . गाव पादान असलेल्या कामाची सुतनदारी निर्माण झाली वारसा हक्काने लोकांची संख्या वाढल्यानंतर आणि स्पर्धा वाढल्यानंतर काही लोक वतनदारी सोडून अन्य गावांत स्थलांतरित होऊ लागले महाराष्ट्रात स्वातंत्र्याच्या वेळी अशा पद्धतीने वेगवेगळी कामे करणारी सुमारे ३०० जास्त वतने होती . १ ९ ५० ते १ ९ ५५ काळात महाराष्ट्रातील बहुसंख्य वहने नष्ट करण्याचे कायदे करण्यात आले . यामध्ये मुख्यतः परगणा व कुलकर्णी वतन , लोकोपयोगी नोकर इनामे , समाजास उपयुक्त सेवा इनामे , मुलकी पाटील इनाम , गावची कनिष्ठ वतने किरकोळ इनामे आदी रद्द करण्यात आली वतने खालसा झाल्यानंतर ठरावीक मुदत देऊन मूळ वतनदार खातेदारांना जमिनी आपल्या नावे करून घेण्याची संधी देण्यात आली होती . मूळ वतनदार किंवा मयत झाला असल्यास त्याचे वारस मूळ कब्जा हक्काची रक्कम भरण्यासाठी पात्र होते वतने खालसा करण्याच्या कायद्यामध्ये अशी कब्जे हक्काची रक्कम भरण्याची अंतिम तारीख प्रत्येक वतन प्रकारासाठी वेगवेगळी होती आजच्या सातबाराशी या वतनदारीचा बेट आणि जवळचा संबंध आहे . वतने खा झाल्यानंतर थोडी रक्कम ( जमीन महसुलाच्या तीन किया सहा पट रक्कम भरून जमीन नवीन शर्तीवर आणि जास्त रक्कम भरल्यावर ( दहा , बीस किंवा २६ पट ) रक्कम भरल्यास जुन्या शर्तीवर वतनदारांना मिळाली . अशा जमिनीच्या सातबारा वर आता नव्या शतनि किंवा जुन्या शर्तनि असे शब्द आढळून येतात आता या जमिनी विकताना सर्वसाधारणपणे बाजारभावाच्या ५० टक्के रक्कम सरकारकडून आकारली जाते या पारमा कारख जमीन का भी प्रश्न अनेक लोक आहे विचार जेव्हा केव्हा जमीन राजाने होती ही जमीन देण्यात आली होती . त्यापोटी कोणतीयावेळी त्या राजाने घेतली . शिवाय या वंशपरंपरेने जमीन कसण्याची अट होती ती जमीन विकून नफा कमवताना निदान ५० टक्के नफा उत्पन्न ) शासनसभरावे असे अपेक्षित आहे वेगवेगळ्या वतनापैकी महाराष्ट्र देवस्थान इनाम अद्याप रद्द करण्यात आलेले नाही पूर्वी अनेक होत आणि राज्य व्यवस्था बदलत असे . त्यामुळे चोर उचलून नेत नाही म्हणून लोक त्याला स्थिर सुरक्षित मालमत्ता समजत राजाची चाकरी करणारे लोक सुद्धास्थावर जमीन इनाम घेण्याला प्राधान्य देत . राजाला नवे नवे लोक चात घेण्यापेक्षा राज्य कमवण्यासाठी ज्या सरदार व लोक यांनी मदत केली त्याच्यावरच विसंबून राहणे जास्त सोयीचे वाटायचे पिका पिया आपले राज्य टिकलेसाठी ज्यांनी मदत केली त्यांच्यावर राहण्याच्या वृत्तीमुळे हो [ बदारी व्यवस्था वर्षा आता हो निर्माण झाली . गेल्या शंभर वतनदारी संपुष्टात येत आहे . आधुनिक लोकशाही व्यवस्थेमध्ये गुणदोषावर म्हणजे मेरिटर नोकरी करण्याचे व टिकवण्याचे स्वातंत्र्य मिळाले आहे . वतनदारी संपुष्टात येताना कोणाची मक्तेदारी मात्र निर्माण होणार नाही , हे पाहण्याची जबाबदारी मात्र सर्वांची आहे .
मा. श्री शेखर गायकवाड
साखर आयुक्त महाराष्ट्र राज्य
No comments:
Post a Comment