*एका तहसीलदाराची कहाणी*
आता महसूल विभागात काही राहिलं नाही असं आपण अनेकदा ऐकतो... नुकतंच श्री जे बी कुलकर्णी यांचे *"एका तहसिलदाराची कहाणी"* हे पुस्तक वाचनात
आलं...
सन 1962 या वर्षी देखील त्यावेळचे मामलेदार,उपजिल्हाधिकारी हेच म्हणत होते...
So be happy 👍
हा उतारा मी दोन-तीन महसूल ग्रुपवर शेअर केला होता... त्यानंतर अनेकांनी या पुस्तकाची मागणी केली होती तसेच अनेक आपल्या जवळच्या महसूल अधिकारी मित्रांचे फोन आले व हे पुस्तक उपलब्ध करून देण्याची विनंती केली... म्हणून मी हे पुस्तक स्कॅन करून त्याची पीडीएफ शेअर करत आहे.... पुस्तकातील अनुभव हे नक्कीच आपल्याला परिचित वाटतील...
या पुस्तकाचे लेखक श्री.जे. बी कुलकर्णी यांचे दोन वर्षांपूर्वी निधन झाले...
त्यांची महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगामार्फत सन 1962 मध्ये सरळसेवा तहसिलदार म्हणून निवड झाली व सन 1995 या वर्षी उपजिल्हाधिकारी भूसंपादन या पदावरून ते निवृत्त झाले...
स्वान्त सुखाय म्हणून त्यांनी हे आत्मचरित्र लिहिले होते व स्वतःच प्रकाशित करून मित्रमंडळीत वितरित केले होते...टंकलेखनाच्या व इतर किरकोळ चुका आहेत परंतु त्यातील अनुभव मात्र खूपच परिचित आहेत... त्यांचा रामशास्त्री बाणा व स्वतःच्या काही प्रशासकीय अडचणीमुळे त्यांचे प्रमोशन रखडले होते....तीस वर्ष तहसीलदारकी केल्यानंतर त्यांना प्रमोशन मिळाले होते...
साहित्यिक अंगाने कदाचित या पुस्तकास साहित्यमूल्य कमी असेल परंतु अनुभव कथन मात्र अतिशय प्रांजळ आणि रिलेट होणारे आहे... सुरुवातीची आत्मचरित्रातील पन्नासेक पाने हे बालपण आणि कॉलेज जीवन आहे. ते कदाचित रिलेट होणार नाही. परंतु पुढील सर्व प्रशासकीय कारकीर्द मात्र नक्कीच रिलेट होईल...
*गणेश मिसाळ*
*उपजिल्हाधिकारी भूसंपादन क्रमांक दोन ,नाशिक*
वरील आत्मचरित्र pdf स्वरूपात प्राप्त करणेसाठी खालील लिंक वर क्लिक करा
👇👇👇👇👇
🔴🟠🟡🟢🔵🟣⚫⚪⚫🔴🟠🟡🟢
*लेखक -कै. जे.बी कुलकर्णी ,से.नि उपजिल्हाधिकारी*
*संकलन-मोहसिन शेख ,मंडळ अधिकारी*
*Blog-mohsin7-12.blogspot.com*
🔴🟠🟡🟢🔵🟣⚫⚪⚫🔴🟠🟡🟢
No comments:
Post a Comment