Sunday, 29 May 2016

कुलमुखत्यारपत्र

मागील काही लेखात आपण मृत्युपत्र ,हक्कसोडपत्र यासारखे दस्तांची माहिती करून घेतली त्याचप्रमाणे या दस्तामध्ये आणखी एक महत्वाचा दस्त आहे तो म्हणजे  कुलमुखत्यारपत्र .
सर्वसाधारणपणे यास मुखत्यारनामा,वटमुखत्यार ,आम मुखत्यार या नावानेही संबोधले जाते.याविषयी बरेच वेळा संभ्रम अवस्था अधिकारी / कर्मचारी व शेतकरी यामध्ये पहावयास मिळते.या दस्ताविषयी संपूर्ण माहिती देणेचा प्रयत्न या लेखात केला आहे. Adv.लक्ष्मण खिल्लारी साहेब,मा.डॉ.संजय कुंडेटकर सर यांचे एकत्रित  माहितीतून हा लेख मी संकलित केला आहे.हा लेख वाचून आपल्या मुखत्यारपत्रविषयी असणारे जवळपास सर्व शंका दूर होतील याची मला खात्री आहे.

हा लेख प्राप्त करणेसाठी खालिल लिंक वर क्लिक करा 

Saturday, 21 May 2016

7/12 वरील वारस नोंदी

७/१२ उतारा हा सर्वसामान्य माणसाच्या जीवनातील अत्यंत महत्वाचा भाग आहे.७/१२ वर होणारी प्रत्येक नोंद ही खातेदारासाठी महत्वाची असते.अनेक प्रकारच्या नोंदी ७/१२ वर करणेत  येतात त्यासाठी तलाठी यांचेकडून फेरफार केला जातो व तो फेरफार मंडळ अधिकारी यांचेमार्फत  प्रमाणित केला जातो व अशा प्रमाणित नोंदीचा अंमल ७/१२ वर घेतला जातो.या नोंदीमध्ये सर्वात महत्वपूर्ण नोंद म्हणजे वारस नोंद.
         एखादा खातेदार मयत झाला असलेस त्यास नेमके कोण वारस आहेत याबाबत अनेकदा विचारणा होते व संभ्रमता देखील पहावयास मिळते.तलाठी,मंडळाधिकारी यांना देखील अनेकदा वारस चौकशी करताना अडचणी येतात. अशावेळी वारस नोंदीबाबत या कायद्यातील  सहज ,सोप्या भाषेतील तरतुदी सर्वाना माहित असावेत या दृष्टीकोनातून डॉ.संजय कुंडेटकर ,उपजिल्हाधिकारी सातारा यांनी  सर्व वारस कायदे एका पुस्तकात सोप्या सहज व सर्वाना समजतील अशा भाषेत लिहिले आहेत. वारस कायद्यातील मृत्युपत्र व त्यासंबंधी तलाठी कार्यालयात असणारे नमुने याचा उचित संगम “७/१२ वरील वारस नोंदी” या पुस्तिकेत केला आहे.      

       तलाठी व मंडळाधिकारी यांना वारस नोंदी करताना ही पुस्तिका अत्यंत उपयोगी आहे तसेच महसूल अधिकारी,कर्मचारी व सर्वसामान्य नागरिक यांना देखील या पुस्तिकेचा अवश्य  लाभ होईल याची मला खात्री आहे.
       मा.डॉ.संजय कुंडेटकर सर ,उपजिल्हाधिकारी सातारा यांनी उत्तम लेखन करून पुस्तिका उपलब्ध करून दिलेबद्दल व या पुस्तकाला शुभेच्छा देणारे मा.गणेश मिसाळ सर ,उपविभागीय अधिकारी ,धुळे  यांचे मनापासून आभार.

ही पुस्तिका आपण mohsin7-12.blogspot.in या संकेतस्थळावरून pdf तसेच फ्लिप बुक स्वरुपात प्राप्त करू शकता .

पुस्तिका प्राप्त करणेसाठी खालील लिंक वर क्लिक करा 

7/12 वरील वारस नोंदी pdf बुक

7/12 वरील वारस नोंदी फ्लिप बुक

Sunday, 8 May 2016

तलाठी कामकाज मार्गदर्शिका फ्लिप बुक

संगणकावर विविध प्रकारच्या सोयी, सुविधा व सहीत तलाठी कामकाज मार्गदर्शिका फ्लिप book स्वरुपात प्रकाशित केले आहे.आपण संगणकावर download करून 12345 हा कोड वापरून हे पुस्तक अगदी आपल्या पारंपारिक पुस्तकाप्रमाणे संगणकावर वाचू शकता.
हे फ्लिप बुक खालील लिंक वर क्लिक करून संगणकावर वाचा.
तलाठी कामकाज मार्गदर्शिका फ्लिप बुक

Friday, 6 May 2016

तलाठी कामकाज मार्गदर्शिका

       तलाठी हा महसुल विभागाचा कणा मानला जातो.महसुल विभागातील सर्व महत्वाकांक्षी निर्णय तलाठी यांचे अहवालानुसार घेतले जातात व शासन स्तरावरील बहुतांशी योजना तळागाळापर्यंत पोहोचवणे ही जबाबदारी तलाठी यांची असते.गावपातळीवरील सर्वात महत्वाचे शासकीय पद अशी तलाठी या पदाची व्याख्या आपण सर्वसाधारणपणे करू शकतो.तलाठी या पदावरील व्यक्ती नेहमी कामात व्यस्त असते. ‘दप्तर कामकाज’ हे तलाठी यांचेसाठी अत्यावशक कामकाज आहे.
      तलाठी कामकाज हे ‘महाराष्ट्र जमीन महसुल नियम पुस्तिका खंड चार’ नुसार चालत असले तरी त्यातील भाषा व तरतुदी इतक्या किचकट स्वरुपात असून व्यस्त व्यक्ती त्यांचा  सहजासहजी अभ्यास करू शकत नाही.त्यासाठी तलाठी यांना केवळ त्यांचे दप्तर,गावनमुने व त्यासंदर्भातील तरतुदी व शासन निर्णय सहीत एकत्रित अशी छोटी पुस्तिका असावी असा विचार मनात होता.मा.डॉ.संजय कुंडेटकर सर ,उपजिल्हाधिकारी सातारा यांचे ‘महसूल कामकाज पुस्तिका’ हे पुस्तक सोप्या भाषेत आहे आणि ते खूप प्रसिध्द झाले आहे. सर हे तलाठी कामकाजाबाबत  लेखन सोप्या व सहज भाषेत करू शकतील याची मला खात्री होती.सरांना याबाबत विचारणा केली असता तात्काळ त्यांनी होकार देत याबाबत अगदी कमी वेळेत उत्तम अशी पुस्तिका ‘तलाठी कामकाज मार्गदर्शिका’  महाराष्ट्रातील तलाठी मित्रांसाठी तयार केली व ही पुस्तिका ऑनलाईन माझे ब्लॉग वर प्रसिध्द करणेस अनुमती देऊन माहितीचा खजिना एका क्लिकवर अवघ्या महाराष्ट्रातील तलाठी मित्रांना खुला करून दिला आहे.
       या पुस्तकात आपणास सर्व प्रकारचे म्हणजे १ ते २१ गावनमुने त्याबाबत असणाऱ्या बारीकसारीक बाबी अगदी सोप्या भाषेत विषद केलेल्या आहेत.अ पत्रक ,कमी जास्त पत्रक ,ग्राम आदर्श तक्ता,कार्यभार यादी  असे अनेक तलाठी दप्तरशी संबंधित बाबी उत्तम प्रकारे नमूद केल्या आहेत.या पुस्तिकेचे विशेष म्हणजे सहज उपलब्ध न होणारे शासन निर्णय व परिपत्रके जे केवळ तलाठी यांना दप्तर अद्यावत करताना व त्यांचे कामकाज सोयीस्कर करणेसाठी उपयोगी आहेत अशा शासन निर्णय व परिपत्रके यांचा संच पृष्ठ क्रमांक ११६ ते २०३ यामध्ये समावेश  केला आहे.या पुस्तिकेचा सर्व तलाठी मित्रांना लाभ होईल अशी मला खात्री आहे.पुस्तिका उत्तम तयार केली आहे तरी कमी वेळेत केली असलेने काही चुका ही होऊ शकतात किंवा काही शासन निर्णय ,परिपत्रके नव्याने समाविष्ट करता येऊ शकतात याबाबत तलाठी मित्रांचे येणाऱ्या सूचनांचा अवश्य विचार करून पुढील आवृत्ती मध्ये सुधारणा करणेत येईल.

       मा.डॉ.संजय कुंडेटकर सर ,उपजिल्हाधिकारी सातारा यांनी उत्तम लेखन करून पुस्तिका उपलब्ध करून दिलेबद्दल व या पुस्तकाला प्रस्तावना देणारे मा.प्रल्हाद कचरे सर ,उपायुक्त (करमणूक कर ),पुणे विभाग यांचे मनापासून आभार. 

हे पुस्तक प्राप्त करणेसाठी खालील लिंक वर क्लिक करा फ्लिप बुक साठी 12345 हा कोड वापरावा