राज्यातील प्रथम लाभार्थी ट्रॅकिंग व घरपोच मंजुरी आदेश सेवा” #संजय गांधी निराधार योजनेला नवे डिजिटल रूप*
#कर्जत तहसिल संजय गांधी योजना शाखेचा नावीन्यपूर्ण प्रयोग*
कर्जत, दिनांक-संजय गांधी निराधार सामाजिक अर्थ साहाय्य योजना ही निराधार आणि गरजू नागरिकांसाठी जीवनदायी योजना असली तरी अर्ज प्रक्रिया आणि मंजुरीसंबंधी अनेक अडचणी यापूर्वी निर्माण होत होत्या. अर्ज भरल्यानंतर अर्जाची स्थिती तपासण्याची सुविधा नसल्याने लाभार्थ्यांना वारंवार कार्यालयात जावे लागत होते. त्यात मंजूर आदेश वेळेवर मिळत नसल्याने आर्थिक अडचणी वाढत होत्या.ही अडचण लक्षात घेऊन *कर्जतचे नायब तहसीलदार डॉ. मोहसिन शेख* यांनी नाविन्यपूर्ण विचारातून व *गुरु बिराजदार तहसिलदार कर्जत यांचे मार्गदर्शनाखाली *"निराधार मित्र”* हे मोबाईल अॅप विकसित केले. या अॅपच्या माध्यमातून लाभार्थ्यांना अर्ज ट्रॅक करण्याची सुविधा मिळणार असून मंजूर आदेश थेट घरपोच मिळणार आहेत. त्यामुळे ही सेवा “राज्यातील प्रथम लाभार्थी ट्रॅकिंग व घरपोच आदेश सेवा” म्हणून राज्यासाठी दिशादर्शक ठरणार आहे.
⸻
*सेवेची वैशिष्ट्ये*
✔ आधार क्रमांकाच्या शेवटच्या 5 अंकांद्वारे अर्ज स्थिती तपासता येते
✔ अर्ज क्रमांक शेवटचे 5 अंक किंवा मोबाईल क्रमांक वापरून तपासणी शक्य
✔ अर्ज मंजूर असल्यास आदेश प्रत मोबाईलवर पाहता व डाउनलोड करता येते
✔ अर्ज नामंजूर असल्यास कारण आणि त्रुटी स्पष्ट समजते
✔ वर्ष व महिन्यानुसार संपूर्ण गावाची मंजूर यादी पाहण्याची सुविधा
✔ गावात नेमलेले स्वयंसेवक “निराधार मित्र” लाभार्थ्यांना अर्ज तपासून देण्यास मदत करतात
या सेवा ग्रामीण भागातील लाभार्थ्यांसाठी वेळ व पैसा वाचवणारी आणि पारदर्शक प्रशासनाची नवी पायरी ठरणार आहे
*स्वयंसेवकांची भूमिका – सेवा प्रत्येक घरापर्यंत*
प्रत्येक गावात स्वयंसेवक स्वरूपात ग्राम महसूल अधिकारी ,पंचायत अधिकारी महसूल सेवक व स्वयंसेवक इच्छुक तरुणांना ऍप बाबत प्रशिक्षण देऊन त्यांना संबंधित गावासाठी “निराधार मित्र” म्हणून नेमण्यात येणार आहे ते अर्ज तपासणे, आदेश मिळवून देणे आणि त्रुटी समजावून सांगणे अशी सेवा लाभार्थ्यांपर्यंत विनामूल्य पोहोचवतील. यामुळे अर्जदारांना जे वृद्ध,निराधार असतात त्यांना चौकशी व मंजुरी आदेश प्राप्त करणेसाठी सरकारी कार्यालयात वारंवार जावे लागणार नाही आणि सेवा थेट त्यांच्या घरापर्यंत मिळणार आहे.


















































