कर्मचारी विभाग

Tuesday, 25 October 2016

भोगवटदार वर्ग -2 जमीन हस्तांतरण तरतुदी-मा.बबन काकडे सर,तहसिलदार नाशिक

               भोगवटादार वर्ग-2' ही संकल्पना बरीच व्यापक आहे, वेगवेगळ्या कारणांनी "भोगवटादार वर्ग-2" हा शेरा दाखल केला जातो, तसेच अशा जमिनींना हस्तांतरणासाठी पूर्वपरवानगी देण्यासाठी वेगवेगळ्या स्तरावर सक्षम प्राधिकारी नेमलेले आहेत, उदा- देवस्थान इनाम जमिनींचे अधिकार शासनास, नवीन शर्तीच्या (पूर्वाश्रमीच्या शासन जमिनी ) चे अधिकार विभागीय आयुक्तांना, "इनाम वर्ग 6 ब" चे अधिकार जिल्हाधिकारी / अपर जिल्हाधिकारी यांना आहेत, तर पाटील, कुलकर्णी यांसारख्या इनाम जमिनी, आहे त्याच न.अ.श.वर खरेदी द्यावयाच्या असतील तर त्यासाठी दि.9 जुलै 2002 रोजीच्या शा.नि.नुसार पूर्वपरवनगीची गरज नाही, असंच कुळकायदा, पुनर्वसन , सिलिंग इत्यादी जमीनीबाबत देखील सक्षम प्राधिकारी निश्चित करणेत आलेले आहेत, त्यामुळे अशा जमिनीच्या सर्व नोंदी, इनाम रजिस्टर, इत्यादी तपासल्याशिवाय कोणत्या टप्प्यावर कार्यवाही करणे आवश्यक आहे ते निश्चित करता येत नाही, 

"भोगवटादार वर्ग-2" जमिनींचे प्रकार ? अशा जमिनीच्या हस्तांतरणास पूर्वपरवानगी देणारे सक्षम प्राधिकारी ? भरावा लागणारा  नजराणा ? सोप्या आणि सरळ स्वरुपात मा.श्री.बबन काकडे ,तहसिलदार,जिल्हाधिकारी कार्यालय नाशिक यांनी तक्ता स्वरुपात तयार केले आहे.सदर pdf प्राप्त करणेसाठी खालील लिंक वर क्लिक करा.


29 comments:

  1. Sir
    Ceiing madhil jamin akrushik vaparasathi karaychi asel tar najarana 75% kontya valuation var asel krushik ki akrushik??pls reply

    ReplyDelete
  2. भोगवाटा वर्ग 2 मधे सामूहिक क्षेत्र असु शकते का?जर वारस दोन आहेत आणि नाव एक जणाचे असेल तर क़ाय करावे??

    ReplyDelete
  3. भोगवाटा वर्ग 1 मधे सामूहिक क्षेत्र सहा जन असेल तर खरेदी विक्री एक व्यक्ति करू शकतो का त्या साठी सर्वांची सम्मति आवश्यक आहे की दोन ते तीन जन सम्मति देऊन जमीन विक्री करू शकतात का??

    ReplyDelete
  4. महाराष्ट्र अधिनियम क्र. 21/2002दि.6 मे 2002 व महसूल व वन विभाग यांचे कडील शासन परिपत्रक क्र. वतन/1099/प्रक्र.-223/ल- दि.9 जुलै 2002
    सर हा शासन निर्णय कुठे मिळणार

    ReplyDelete
  5. सर, भोगवटादार वर्ग -२ चे वर्ग -१ मध्ये रूपांतर करणेबाबत अद्ययावत (latest - updated) नियम, अटि, शर्ती काय आहेत याचे कृपया मार्गदर्शन करावे. - १२/१२/२०१९

    ReplyDelete
  6. Maji jamin potkharab dakhavli ahe 5 ekar ta mi Kay karu maji jamin bhogvatadar 2 madhe she

    ReplyDelete
  7. sir, patil enam varg 6 chi jamin kharedi karayechi ahe tya sathi kiti njrana brawa lagel...

    ReplyDelete
  8. वर्ग 2 जमीन खरेदी परवानगी आता प्रांत कार्यालयात मिळणार असा नवीन जी. आर. आला आहे काय

    ReplyDelete
  9. वर्ग 2 ब सत्ता प्रकारातील जमिन माझ्या वडिलांनी सन 1995-96 मध्ये खरेदी केली आहे.याआधी आम्ही ज्यांच्या कडून ही जमिन खरेदी केली त्यांनी ही जमिन पहिला मालक ज्यांना 1973 साली शासनाने जमिन वाटप केली त्यांचेकडून खरेदी केली आहे.आता मला ही जमिन ब सत्ता प्रकारातून अ सत्ता प्रकारात रुपांतर करण्यासाठी काय कराव लागेल? व खर्च किती येईल? सदर जमीन अकृषिक असून ग्रामपंचायत हद्दीत आहे.
    कृपया माहिती मिळावी.

    ReplyDelete
  10. सर पुनर्वसन ची जमीन खरेदी केली आहे त्याचा द्स्तही झाला आहे परंतु पुनर्वसन खात्याची मंजूरी घेतली का नाही ते समजुन येत नाही त्यामुळे आज रोजी ७ १२ पत्रकी दस्त नोंद नाही.
    यासाठी काय करावे ते सांगावे ही विनंती.

    ReplyDelete
  11. वर्ग 2 जमिनीवर 15 कब्जा कसा हटवावे

    ReplyDelete
  12. सर, भोगवटादार वर्ग -२ चे वर्ग -१ मध्ये रूपांतर करणेबाबत अद्ययावत (latest - updated) नियम, अटि, शर्ती काय आहेत याचे कृपया मार्गदर्शन करावे. - १२/१२/२०१९

    Reply

    ReplyDelete
  13. भोगवटादार 2ची जमीन खरेदी करायची आहे. घेणारा आदिवासी आहे. परवानगी कोण देते. सदर खरेदी साठी प्रोसेस व खर्च किती? कृपया मार्गदर्शन करावे, ही विनंती.

    ReplyDelete
  14. माजी सैनिकाला मिळालेली वर्ग२ची जमिन खरेदी कोणत्या नियमानुसार/ शासन निर्णयानुसार करता येते त्याबाबत पध्दत कोणती सक्षम प्राधिकरण कोणते या बाबत सविस्तर माहीती कृपया देण्यात यावी ही विनंती

    ReplyDelete
  15. Res.sir , आमची जमीन महार वतनी जमिनिव्यतिरिक्त नवीन अविभाज्य शर्ति भोगवटदार-2 ची आहे .मला ती खरेदी विक्री (मोबदला होत नसल्याने )करावयाची आहे . परवानगी घेण्याची आवश्यकता आहे का ? असल्यास कोणत्या शासन निर्णयानुसार किंवा नसल्यास कोण ता शासन निर्णय लागू होईल(शासन परिपत्रक क्रमांक 1099/प्र. क्र.223/ल.-4दि.9जुलै2002 व्यतिरिक्त काही असल्यास ) कृपया सविस्तर माहिती द्यावी ही विनंती.

    ReplyDelete
  16. सर माजी सैनिक्स मिळालेकि जमीन भोगवता 2 छे वारिसदार ना विकट येईल का

    ReplyDelete
    Replies
    1. माजी सैनिक यांना मिळालेली जमीन विकत घेता येते का

      Delete
  17. माजी सैनिकाला मिळालेली वर्ग२ची जमिन खरेदी कोणत्या नियमानुसार/ शासन निर्णयानुसार करता येते त्याबाबत पध्दत कोणती सक्षम प्राधिकरण कोणते या बाबत सविस्तर माहीती कृपया देण्यात यावी ही विनंती 9657588990 yogesh kaware

    ReplyDelete
  18. 10.12.2020 ला नविन जी आर नुसार सगळे थाबवले आहे असे का
    ते सुरु कधी होणार

    ReplyDelete
  19. इनाम जमीन बिनशेती करणे बाबत माहिती.

    ReplyDelete
  20. इनाम 6 महार वतन जमीन भोगवटदार वर्ग 1 करता येईल का ?

    ReplyDelete
  21. आपली जमीन नवीन शर्ती ची आहे पण तसा त्या जमिनीच्या नवीन शर्तीचा प्रकार कसा ओळखावा

    ReplyDelete
  22. 1966 साला मध्ये आमच्या आजोबांच्या नावे जमीन होती, जमिनीचे सातबारा आज पण आहे, पण नंतर वतन जमिनी खालसा केली तेव्हा पैसे भरून नवीन शर्तीनुसार जमीन घ्यायला आजोबांकडे पैसे नव्हते अस असे फेरफार मध्ये नमूद करून वारस सोडून दुसऱ्याच व्यक्ती कबजेदार झाले.
    पण ती जमीन जुन्या शर्तीनुसार परत आम्हाला मिळवता येईल का?

    ReplyDelete
  23. सिलिंग कायद्यान्वये माजी सैनिकास मिळालेली भोगवटा वर्ग 2 नव्या शर्तीची जमिन जर शासकीय संमतीने खरेदी केली असेल तर तिची दहा वर्षानंतर पुर्नविक्री करण्यासाठी माजी दैनिकास असलेले नियम विद्यमान जमिन धारकासही लागू असतात का?

    ReplyDelete
  24. सर सध्या आपण बागलाण उपविभागीय अधिकारी या ठिकाणी उपविभागीय अधिकारी या पदावर आहात याच तालुक्यामध्ये काही गावांमधील वर्ग २ च्या जमिनी खरेदीविक्री साठी उप्पर जिल्हाधिकारी यांच्या कडे परवानगी साठी प्रस्तावित आहेत. या जमिनींना सदरच्या ठिकाणी विन विभागाच्या १९८० तरतुदी लागू आहेत का ? कसे याबाबत वन विभागाकडून उत्तर मिळत नाहीत त्यामुळे सदरचे प्रस्ताव प्रलंबित आहेत. यावर शासन स्तरावर काहीच उपाय योजना नाही का ? शासनाचे काही कायदे आहेत जसे उदा.लिमिटेशन अँक्ट या सारखे अजून याच्या तरतुदीनुसार परवानगी मिळू शकते का.

    ReplyDelete
  25. भोगवटादार वर्ग 2 मधुन मला माझी जमीन भोगवटादार वर्ग 1 मध्ये तबदील करायची आहे. त्यासाठी लागणारा शासकीय नजराना किती टक्के आहे आणि तसा आशयाचा शासकीय अध्यादेश मला मिळेल का?

    ReplyDelete