आपले प्रश्न येथे विचारा

"आपले प्रश्न येथे विचारा" हा tab ब्लॉगवर नवीन चालू करण्यात आलेला आहे.ब्लॉगवर  पोस्ट मधील कंमेन्ट सेक्शन किंवा इतर ठिकाणी प्रश्न विचारू नये. केवळ या tab मध्ये  विचारलेल्या प्रश्नांना शक्य तितक्या लवकर कायदेशीर संदर्भासह उत्तरे दिली जातील...हा tab ओपन केल्यानंतर post comment वर क्लिक करून प्रश्न विचारू शकता.प्रश्न विचारताना आपले नाव व पत्ता टाकणे आवश्यक आहे.


mohsin7-12.blogspot.com

343 comments:

1 – 200 of 343   Newer›   Newest»
A A Sayyed said...

म ज म का क 36 ची जमीन खातेदार ने मृत्युपत्राने 1 वारसाला दिली तर या कलमाची हसतंत्रण ची परवानगी लागेल का ?

Unknown said...

सर अकृषिक टॅक्स कलाम 44 व 45 साठी कशी आकारणी करावी

Mohsin shaikh said...

मृत्यूपत्र हे हस्तांतरण या व्याख्येत येत नाही त्यामुळे मृत्यूपत्र नोंदीसाठी परवानगी आवश्यक नाही.ब्लॉगवरील उच्च न्यायालयाने दिलेला निकाल वाचावा.

Mohsin shaikh said...

कलम 44 नुसार अकृषिक परवानगी देताना संबंधित अधिकारी अधिकारी निश्चित करून देतात तसेच कलम 44 45 47 नुसार अकृषिक दंड आकारणीसाठी शासन निर्णय १ एप्रिल २०१७ पाहावे

A TO Z said...

Respected Sir,
Is it mandatory for Talathi to issue personal notice to all land holders in respective Gut No. before taking well registration (vihir nodani) on 7/12 extract?
If Talathi not done the same and taken the note what shall I do?

Mohsin shaikh said...

It is not manadatory to issue personal notice to all landholders according to MLRC 1966 sec 150(2) Whenever a Talathi makes an entry in the register of mutations, he shall at the same time post up a complete copy of the entry in a conspicuous place in the Chavdi, and shall give written intimation to all persons appearing from the record of rights or register of mutations to be interested in the mutation, and to any other person whom he has reason to believe to be interested therein.

A TO Z said...

माननीय महोदय,
खालील परिस्थीतीमधे काय करता येईल....

१) "अ " व "ब " यांची गट नं. "००" मधे ३ गुंठे क्षेत्रासह सामाईक विहीर आहे व तशी नोंद इतर अधिकार खाली ७/१२ वरती आहे.
२) सदर गटामध्ये "अ " च्या नावे २ आर पोटखराब क्षेत्र असून "ब " च्या नावे कसलेही क्षेत्र नाही (म्हणजे या गटामध्ये "ब " यांची कसलीही शेतजमीन नाही)
३) "अ " यांनी "ब " यांना कसलीही कल्पना न देता गट नं. "००" मधे शपथपत्राआधारे वरील १) प्रमाणे नोंद कायम असताना त्यांच्या मालकी हक्कात एक विहीर या गटामध्ये असल्याची नोंद घेतली आहे.
४) आता "अ" व "ब" यांच्या सामाईक विहिरीची व "अ " यांच्या स्वतंत्र विहिरींची नोंद ७/१२ वरती येते.
अशा परिस्थितीमध्ये "ब " यांना भविष्यात काही अडचण येऊ शकते का किंवा त्यांनी काय करायला हवे?
विहीर नोंद करताना तलाठी यांनी गट नं."००" च्या ७/१२ चे अवलोकन करणे गरजेचे नव्हते काय?
विहीर नोंद करताना तलाठी यांनीं स्थळ निरीक्षण करणे गरजेचे नव्हते काय?

----- मार्गर्शनाच्या अपेक्षेत ----

Mohsin shaikh said...

सदर गटामध्ये केवळ एकच विहीर असेल

तर ब यांनी

नवीन स्वतंत्र विहीर नोंदीबाबत मा उपविभागीय अधिकारी यांचेकड़े अपिल अर्ज दाखल करावा

Unknown said...

धरणग्रस्त किंवा प्रकल्पग्रस्त दाखला रक्ताच्या नात्यात वेळा हस्तांतरित करता येतो?

Mohsin shaikh said...

तीन वेळा

Seema Nilesh Ghanokar said...

सर गौण खनिज वसुली नोटीस चे पूर्ण नमुने मिळावे कृपया

Santosh kamble blogspot said...

7/12 च्या इतर हक्कातील अवॉर्ड बोजा कमी करण्यासाठी काय प्रक्रिया आहे.

Mohsin shaikh said...

ब्लॉगवरील सर्व लेख या टॅबमध्ये गौणखनिज अहवाल व नमुने आहेत

U s mali तलाठी रत्नागिरी said...

कुळ सदरी असणारी व्यक्ती आपला हक्क मृत्यू पत्राने देऊ शकते का?

Mohsin shaikh said...

कुळकायदा कलम ४० नुसार कुळास वारस लावता येतात. मृत्यूपत्र करता येत नाही.

Pramod pawar said...

माझे बाबा 1954 साली जमिनीस कुळ म्हणुन नाव लागले, जमीन मालक मानसिक दुर्बेल असल्यामुळे 7/12 उतारा वर "जमीन खरेदीचा हक्क पुढे ढकलण्यात आला आहे, जमीन मालक मानसिक दुर्बल आहे " असा शेरा आहे , आता माझ्या वडिलांचे नाव इतर हक्कात आहे , तर मालक म्हणुन नाव लावण्यासाठी काय करावे लागेल , कृपया माहिती द्यावी

Pramod pawar, malegaon, dist. Nashik

Mohsin shaikh said...

मालक आता हयात आहेत का ?
मालक मानसिक रित्या सक्षम झाले का ?
जर जमीन मालक मयत असतील तर मयत झाल्यापासून 2 वर्षाचे आत किंवा मालक मानसिक रित्या सक्षम झाल्यापासून 2 वर्षाचे आत विक्री किंमत निश्चित करण्यासाठी अर्ज करणे आवश्यक होते

मार्गदर्शन:-
श्री.किरण पानबुडे
उपजिल्हाधिकारी,महाराष्ट्र-शासन

Anonymous said...

साहेब , भोगवटादार जमीन २ संदर्भात काही प्रश्न आहेत ,कृपया करून मार्गदर्शन करावे .
एकूण जमीन ३० गुंठे आहे ,७/१२ ला ७ वारस नावे आहेत , १ वारस मयत असून ६ वारस जिवंत आहेत.

१. भोगवटादार जमीन २ जमीन हि ७० वर्षांपसून शेतजमीन आहे ,तर भोगवटादार वर्ग १ मध्ये होईल का?, जमीन भावानुसार किती % नजराणा सरकारला द्यावा लागेल .?
२.जर ४ वारसांनी ना हरकत लिहून दिल्यास , जमीन बाकी ३ वारसाच्या नावे होऊ शकते का ?
३. ३ वारसाच्या नावे करण्या पूर्वी भोगवटादार वर्ग १ मध्ये रूपांतर करणे बंधनकारक आहे का ?
४ ३ वारसाच्या नावे तुकडा बंदी कायद्यानुसार , प्रत्येकी १० गुंठे असे विभाजन करता येईल का?
५. प्रत्येकी १० गुंठे असे विभाजन केल्या नंतर , स्वतंत्रपणे भोगवटादार वर्ग १ मध्ये रूपांतर करता येईल का ?
६. जर जमीन भोगवटादार जमीन २ म्हणून ठेवली तर , जमीन मध्ये घर बांधण्याची परवानगी मिळेल का? भोगवटादार जमीन २ मध्ये घर बांधू शकतो का?
७. एकूण जमीन ३० गुंठे पैकी फक्त ५ गुंठे जमीन भोगवटादार वर्ग १ मध्ये रूपांतर करता येईल का?

आपला नम्र
सिद्धार्थ गायकवाड
मु. घोटसई , तालुका . कल्याण , जिल्हा . ठाणे

Mahesh musale said...

Selling madhil jamin vikat gheta yete ka

Sanjay Lohakare said...

सर भोगवटा2 चे 1 रूपांतरण शासनाने स्थगिती दिली आहे का व ते किती दिवस रहे

Anonymous said...

सर, अविभाज्य नियंत्रित सत्ता प्रकाराने शासनाकडून मिळालेली शेत जमीन कि ज्याच्यात वाटप आदेशात अट क्र. १ सदर जमिनीची वाटणी करता येणार नाही. असे असताना विभक्त कुटुंब असताना नैसर्गिक सरळ वारस सज्ञान असताना वारसाची संमती न घेता मे. तहसिलदार यांनी दिलेला वाटणीचा आदेश चुकीचा व बेकायदेशीर नाही का यावर कोणाकडे अपील अगर रिव्हिजन कोणत्या सेक्शन खाली करता येईल. सदरचा आदेश म.ज.म. १९६६ मधील ८५ प्रमाणे केलेला आहे. कृपया उत्तर मिळावे

Bipin said...

Which documents are necessary for N.A when land is under vikas prashikshan. And land comes under pradeshik udya.

Unknown said...

नामाप्र सरपंच आरक्षण आहे.आणी उमेदवार सर्वसाधारण स्त्री म्हणून निवडून आलेला आहे परंतु त्याचा मूळ प्रवर्ग नामाप्र आहे, तर त्याला सरपंच होता येईल का सर?

Unknown said...

१९४८ साली घर खरेदीखत केल्यापासून घराच्या मागे ,रस्त्याच्या पलिकडे असलेल्या ०२ गुंठे जागेपैकी ०१ गुंठा जागेत 'संडास बांधा'असे तोंडी सांगून मुळ मालकाने जागा दिली.सदर ०१ गुंठा जागेत 'शौचालय' बांधल्यापासून ७२ वर्षे आमची वहिवाट चालु आहे.परंतु आजमितिपर्यंत ७/१२ मध्ये मुळ मालकाचे नाव आहे.
करोनाच्या काळात आम्ही कोणी गावी जाऊ न शकल्याकारणाने शेजारील व्यक्तीने सदर जागेच्या ७/१२ मध्ये स्वत:चे नाव कुळ म्हणून फेरफारद्वारे समाविष्ट केले व मोजणी करून जागेत निस मारले.या जागेत आमची वहिवाट आहे तसेच 'शौचालय'वापरात आहे हे माहीत असूनसुद्धा आम्हास मोजणीसंबधी कळविले नाही.
यावरुन असे दिसून येते कि त्या व्यक्तीचा हेतू चांगला नाही.
तरी आम्ही पुढे काय कार्यवाही करावी जेणेकरून शेजारील व्यक्तीचा वाईट हेतु साध्य होणार नाही.
याचे कृपया लवकर मार्गदर्शन करावे, हि विनंती.

Anonymous said...

फाईल ड कसे नष्ट करावेत.
कृपया फाईल ड नष्ट करण्याची कार्यपद्धती स्पष्ट करावी

Aannaso Digambar Mali said...

माझे नाव अण्णासो दिगंबर माळी आहे माझ्या आजोबांनी १९७८ साली ५ एकर कुळाची जमीन खरेदी केली होती त्यातील ३ एकर मुलाच्या नावे केली होती व दोन एकर आजोबांच्या नावे होती. ३ एकराचा तलाठ्याने फेरफार २००७ साली नोंदविला आहे व उर्वरित दोन एकराचा फेरफार २००१ साली नोंदविला आहे. १९७८ साली झालेला दस्त आज ४२ वर्षांनी तो व्यवहार बेकायदेशीर ठरविला आहे. कुळ कायदा हा १९४८ ला लागू झालेला होता तर मग दुय्यम निबंधकाने त्या वेळी कोणत्या कायदयाने दस्त केला गेला आज इतक्या दिवसांनी तो व्यवहार बेकायदेशीर ठरविला आहे तो कायदा तर २०१४ ला लागू झाला आहे कि चाळीस पट रक्कम भरून ८४ अ प्रमाणे ती जमीन शेतकरी यास विकत घेता येते तसे असेल तर हे प्रकरण १९७८ चे आहे हे कसे बेकायदेशीर होऊ शकते यावरती काही उपाय आहे का

Mahendra khadpe said...

इनाम जमिनीत अकृषीक परवानगी मिलते काय.कृपया कोणत्या कलमांनुसार कृपया माहिती मिळावी.

Mak said...

सर अकृषिक टॅक्स कसा कॅल्क्युलेट करतात?

Shaik mudassir said...

तुकडेबन्दी कायदा म्हणजे काय& ताबेपावती काढण्या साठी काय करावे

Salima Husen Mulani said...

Hakk sod patr kelya nanter vadilaani mulila tyanchya kharedi paiki dilelya jagela nuksaan hoil kay.

Anonymous said...

namskar mohsin ji jar gavat ugavnari padik jamin krushi hya vyakhyet yet nahi tar kul lavne chukiche aahe tyasathi 7/12 varil kulachya nave zaei jamin ferfaar avhanit karun milavta yeil ka?

Unknown said...

Sir, एका अर्जदाराने स्थगिती हुकुमाची नोंद इतर अधिकार सदरी घ्यावी असा अर्ज केला अर्जासोबत कोर्ट मध्ये सध्या दावा दाखल केला आहे परंतु फायनल ऑर्डर झाली नाही. परंतु त्याच गटावर दुसऱ्या व्यक्तीने अर्ज केला लक्ष्मी योजना अंतर्गत त्याच्या पत्नीचे नाव ७/१२ वर लावावे.यावर काय करता येईल दुसऱ्या व्यक्तीच्या अर्जाची नोंद घेता येईल का plz replya

Unknown said...

Sir
A chya nave 5.00 he aar sheti
Aahe tyana varas B,C,D,E,F
Naib tasildar aadesh kartat
BCDEF sah hissedar nasun pratekala 1.00 he aar dyayache
Mhanun
Order yogya aahe Kay?
NT Yana asla order karnyache adhikar aslyash tyababat sandarbh
Sangave


D Y said...
This comment has been removed by the author.
D Y said...
This comment has been removed by the author.
vinod p said...

sir mamaledar court kalam 5 nusar shet rasta detanna kontya babi lakshat gheun rasta denyat yeto.

Unknown said...

हिब्बानामा नोंदी बाबत कायदेशीर बाबीची माहिती मिळावी

S L Mahajan said...

आमची शेतजमीन भंडारा जिल्ह्यात आहे. एकूण आठ सातबारा आहेत. शेतीची हिस्सेदारी करताना ज्यांच्या वाट्याला जी जमीन येत आहे त्या गटावर त्यांची नावे ठेवून बाकी व्यक्तींनी हक्कसोड केले आहे. संबधित दस्त रजिस्ट्रार ऑफिस मधून नोंदनी करून घेतले आहे. हक्कसोड करनारे सगळे रक्ताच्या नात्यातील आहेत. पण फेरफार करिता तलाठ्याकडे अर्ज केला असता हक्कसोड करतांना खाते फोडता येत नाही असे कारण सांगून तलाठी टाळाटाळ करण्याचा प्रयत्न करित आहे. व वाटणीपत्र करण्यास सांगत आहे. काय करावं?

Unknown said...

Sir we have purchased 01 guntha NA plot in Miraj registered at sub registrar office.What is next procedure to add name in 7/12 please tell detail with any application format and to whom approach.

Krushna Shinde said...

सर माझी आजी चंपाबई हिने दिनांक 6 /11/ 1993 रोजी तहसीलदार यांना अर्ज दिला की मला तीन मुले असून इतर दोघांना इतर ठिकाणी जमीन वाटून दिलेली आहे तेव्हा माझ्या नावे असणाऱ्या गट नं 313 मधील 74 आर क्षेत्रा पैकी 8 आणे हिस्सा माझ्या मुलाच्या सोमनाथ यांचे नावे करण्याची विनंती केली होती त्यावर तहसीलदार यांनी तलाठी यांना अर्जप्रमाने नोंद निर्माण करून घ्यावी असे लेखी कळवले त्यानुसार तलाठी यांनी 6/11/1993 रोजी फेर नं 276 ने सोमनाथ च्या नावाची 7/12 ला नोंद केली परंतु सदर नोंद घेण्यापूर्वी चंपाबाई हिने 8 आणे हिस्सा पांडुरंग यांना विक्री केला होता त्याची नोंद 249 ने झाली होती त्याला सोमनाथ यांनी तक्रार दिली होती ती नोंद प्रलंबित होती म्हणून मंडळअधिकारी यांनी गट नं 313 वरील फेरफार क्र 249 तक्रारी असल्याने ती नोंद निर्गत झाल्यावर फेर नोंद घ्यावी सबब नोंद रद्द असा शेरा मारून 276 ची नोंद रद्द केली त्यानंतर फेर नं 249 ची तक्रार दिनांक 1/9/1994 रोजी मंजूर झाली आहे त्यानंतर तलाठी यांनी फेर नंबर 276 ची पुन्हा नोंद घेणे अपेक्षित होते परंतु त्यांनी अद्याप पर्यंत घेतलेली नाही आणि दरम्यान च्या काळात चंपबाई 2002 मधे मयत झाली आहे तेव्हा आम्ही तलाठी यांना भेटलो आणि 276 ची पुन्हा नोंद घेण्यासाठी विनंती केली परंतु ते खूप वेळ झाला आहे चंपबई मयत आहे म्हणून नकार देत आहेत तेव्हा फेर नं 276 ची पुन्हा नोंद घेण्यासाठी काय करावे याबाबत मार्गदर्शन करावे ही विनंती
ती जमीन सोमनाथ हेच वहिवाट करत असून इतर दोन भावांची काही हरकत नाही मात्र वारस नोंद केल्यास ते सोमनाथ यांना जमीन देतील याची शाश्वती नाही म्हणून 276 चा पुन्हा ईफेक्ट देण्यासाठी काय करावे ?? कृपया मार्गदर्शन करावे ही विनंती

A TO Z said...

मार्गदर्शन मिळणेस नम्र विनंती...

१) गट नं. "००" मध्ये "अ " यांची २२ आर क्षेत्र व २ आर पोटखराब अशी जमीन आहे.

२) याच गटामध्ये "ब " यांची १ हे. १८ आर क्षेत्र व ० आर पोटखराब अशी जमीन आहे.

३) "अ" यांच्यानावे गट न. "००" सोडून इतर गट नं. मध्ये शेतजमीन आहे.

४) "अ" यांचे वरील १) मध्ये नमूद क्षेत्र "ब" यांच्य्या क्षेत्रास लागून आहे,

"अ" हे त्यांच्या २२ आर क्षेत्रापैकी ४ आर क्षेत्र "ब" याना विकत देण्यास इच्छुक आहेत व "ब" सुद्धा "अ" यांचेकडून सदरील ४ आर क्षेत्र विकत घेण्यास तयार आहेत.

तरी वरील परिस्थितीमध्ये "ब" यांना "अ" यांचेकडून सदरील ४ आर क्षेत्र कायदेशीरपणे खरेदी करता येईल काय व कसे?

Krushna Shinde said...

आदरणीय , सर
१) माझी आजी चंपाबाई हिने दिनांक 6/11/1993 रोजी तहसीलदार यांचेकडे अर्ज दिला की माझे नावे गट नं 313 मधे 8 आणे हिस्सा असून मला तीन मुले आहेत 1) भाऊसाहेब 2) सोमनाथ 3) बप्पा, परंतु भाऊसाहेब व बप्पा यांना यापूर्वीच जमीन वाटून दिलेली आहे म्हणून गट नं 313 वरील माझे नाव कमी करून मुलगा सोमनाथ याचे नाव दाखल करावे

२) त्या अर्जावर तहसीलदार यांनी तलाठी यांस अर्जदार यांचे अर्जवरून 7/12 ला नोंद घ्यावी असा शेरा मारला

३) त्यानंतर तलाठी यांनी 7/12 ला फेरफार क्र 276 अन्वये सोमनाथ च्या नावची नोंद केली
४) परंतु त्या वेळी गट नं 313 वरती फेरफार क्र 249 तक्रारी होता आणि प्रलंबित होता
५) त्यामुळे मंडळ अधिकारी यांनी गट नं 313 ची फेर नों 249 तक्रारी असल्याने ती नोंद निर्गत झाल्यावर फेर नोंद घ्यावी सबब नोंद रद्द असा शेरा मारून फेर नंबर 276 ला कोणतीही तक्रार नसताना विनाकारण रद्द केली वास्तविक पाहता त्यांनी 249 निकाली निघेपर्यंत 276 प्रलंबित ठेवायला हवी होती

६) सोमनाथ यांना वाटले माझ्या नावाची नोंद झाली आहे तेव्हा पासून ते सदर जमीन वहिवाट करत आहेत इतर दोन भाऊ त्यांच्या हिश्श्याची जमीन वहिवाट करत आहेत

७) 2002 साली चंपाबाई ह्या मयत झाल्या आहेत

८) 2010 साली सोमनाथ जेव्हा कर्ज काढण्यासाठी 7/12 काढायला गेले तेव्हा लक्षात आलं की त्यांची नोंद रद्द झाली आहे आणि 249 ची नोंद निर्गत झाल्यावर पुन्हा घ्या असा शेरा मंडळ अधिकारी यांनी मारला आहे
तेव्हा संबंधित फेरफार काढले असता 249 ची नोंद 1994 सालीच निर्गत झाली असल्याचे निदर्शनास आले
९) त्यानंतर सोमनाथ यांनी पुन्हा तहसीलदार यांना अर्ज करून फेर नं 276 ची पुन्हा नोंद घेण्याची विनंती केली त्यांनी तलाठी यांना गाव दप्तरी खात्री करून घेऊन कार्यवाही करावी असे कळवले सोमनाथ यांना वाटले आता पुन्हा नोंद होईल मात्र त्यांनी पुन्हा नोंद घेतली नाही

१०) मात्र अद्याप पर्यंत फेर नं 276 ची नोंद पुन्हा घेण्यात न आल्याने आम्ही तलाठी यांची भेट घेतली असता आता खूप वेळ झाला असल्याने मी आता पुन्हा नोंद घेऊ शकत नाही
.११) आपल्या ब्लॉग वरील मा. डॉ संजय कुंडेटकर सरांचे चला गोष्टीतून फेरफार शिकूया हे पुस्तक वाचल्यावर लक्षात आले की मंडळ अधिकारी यांनी नोंद रद्द केल्यानंतर प्रांत अधिकारी हेच त्यात बदल करू शकतात

१२) तेव्हा प्रश्न हा आहे की कोणतीही तक्रार नसताना केवळ संबंधित गटावरील एखादी नोंद प्रलंबित असताना त्याच गटावर दुसरी नोंद केल्यामुळे मंडळ अधिकारी ती दुसरी नोंद कायदेशीर दृष्टया रद्द करू शकतात का ???

१३) आणि आम्ही आता मंडळ अधिकारी यांच्या 1993 च्या निर्णयाविरुद्ध उपविभागीय अधिकारी यांच्या कडे आता रिव्हिजन अपील करू शकतो का ??
१४) रिव्हिजन अपील करण्यासाठी मुदतीची मर्यादा येईल का ??
तसेच उपविभागीय अधिकारी हे मंडळ अधिकारी यांनी 1993 साली दिलेला निर्णय बदलू शकतील का ??
कृपया मार्गदर्शन करावे ही कळकळीची विनंती

Onkar said...

7/12 patraki 5 vyakti aasun tyapaiki 2 vyaki mayat aahet. KJP karatana kitichi sammati garajechi ashe?

Unknown said...

शेत रस्ता अतिक्रमण झाले आहे.अतिक्रमण हाटवणे बाबत मा.तहसीलदार यांनी आदेशात केले आहे.सोबत TLR पोलीस निरीक्षक यांना आदेशात केले आहे......
नेमकं काय करावं

Unknown said...

महाराष्ट्र शासन महसूल व वन विभाग परिपत्रक क्र . नोंदणी -२००२/३२३३/प्र. क्र . ७८८/ म -१, दिनांक ०६. ०१. २००३. please provide this GR...

Anonymous said...

Eka mansachya nave jastit jast kiti jamin chalate

kasim said...
This comment has been removed by the author.
Anonymous said...

एकाच शेती क्षेत्राची दोन वेळा खरेदी दिली असेल तर खरेदी देणार्यावर काय गुन्हा नोंदविला जाऊ शकतो...?
8605885555

Shree Sadguru Computer Institute said...

प्रकरण न्यायालयात असेल तर तलाठ्या कडे वारस नोंदी करता अर्ज करू शकते काय?

Unknown said...

NAP 36, 34, 48 बाबत माहिती MLRC मध्ये कुठे मिळेल?

तलाठी said...

कोर्ट आदेश घेऊन कमी करा

Mohsin shaikh said...

स्थगिती नसेल तर करता येईल

Mohsin shaikh said...

भा दं वि ४२० फसवणूक

Mohsin shaikh said...

केवळ आकडेमोड चुकले असेल तर प्रांत अधिकारी यांना पुनर्विलोकन करता येईल कलम 258 नुसार त्यात पुन्हा दुरुस्ती होऊ शकते

Mohsin shaikh said...

अतिक्रमण न काढल्यास गुन्हा दाखल करता येईल भारतीय दंड विधान कलम 188 नुसार

Mohsin shaikh said...

महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 चे कलम 247 व 251 नुसार विलंब माफी अर्जासह प्रांत अधिकारी यांचे कडेस अपिल दाखल करावे

Mohsin shaikh said...

तुकडे जोड तूकडे बंदी कायद्याचा भंग होत नसेल तर खरेदी विक्री होईल सदर जमीन लगत असलेबाबत भूमिअभिलेख यांचा नकाशा आवश्यक आहे

Anonymous said...

तक्रार दाखल केल्यानंतर ती आँनलाईन भरली तर त्या गटात दुसरा फेरफार घेता येत नाही तेव्हा पण खातेदार यांना काय सांगणार कृपया ??

Unknown said...

सर मा न्यायालयाचा तडजोड हुकूमनाम्याआधारे 7/12 रेकॉर्ड ला नाव नोंद करण्याकरिता तो हुकूमनामा भारतीय नोंदणी कायद्यानुसार नोंदणीकृत करणे गरजेचे आहे का

Mohsin shaikh said...

हो नवीन नाव दाखल होत असेल तर 89 अ नुसार नोंदणी करणे गरजेचे आहे

Unknown said...

सर सुप्रीम कोर्टाच्या निकालानुसार तडजोड हुकूमनामा असेल तर त्यास नोंदणीकृत करण्याची गरज नाही असे मा न्यालायने म्हंटले आहे आणि भारतीय नोंदणी कायदाच्याच्या कलम 17(2) vi नुसार तडजोड हुकूमनाम्यास नोंदणीकृत करण्यापासून सूट आहे.

By conjointly reading Section17(1)(b) and Section 17(2)(vi), it is clear that a compromise decree comprising immovable property other than which is the subject matter of the suit or proceeding requires registration, although any decree or order of a Court is exempted from registration by virtue of Section 17(2)(vi).

Unknown said...

या बद्दल मार्गदर्शन व्हावे

Unknown said...

सर वसुली करताना आधी जि.प.आकारणी 6.50 प्रमाणे होत असे.आता जि प आकारणी 7 पैसे प्रमाणे केली जाते,याबाबत काही शासन निर्णय किवा GR उपलब्ध आहे का?
कल्पेश शेवाळे तलाठी धडगाव ता अक्राणी जि नंदुरबार

Unknown said...

Sir mi tumchya email id var maza prasn mandala aahe krupaya tyache nirkaran kara

Unknown said...

Sir mi tumchya email id var maza prasn mandala aahe krupaya tyache nirkaran kara

Unknown said...

Sir mi tumchya email id var maza prasn mandala aahe krupaya tyache nirkaran kara

प्रतिभा उंदीर said...

महोदय,
पोकळीस्थ जमिनी म्हणजे काय? जर दोन सर्वे नं.मध्ये किंवा बाजूला पोकळीस्थ जमीन येत असेल तर त्या जमिनीवर लगतकब्जेदाराचा अधिकार आहे की नाही? त्या पोकळीस्थ जमीनिंचा सर्वे नं. किंवा 7/12 उतारा देखील नाही. अशा परिस्थितीत या पोकळीस्थ जमीनीवर जास्त अधिकार लगत कब्जेदाराचा आहे की सरकारचा? अशा पोकळीस्थ जमिनीचा वापर अथवा वहिवाट करण्याचा अधिकार कुणाला आहे? अशा जमीनीवर जर ईतर ग्रामस्थ अतिक्रमण करून ती जमीन ताब्यात ठेवण्याचा प्रयत्न करीत असतील तर त्यावर उपाय काय? अशा जमिनी लगतकब्जेदार स्वतच्या जमीनिस जोडू शकतो का? त्यासाठी काय उपाय योजना करावी लागेल? यासंदर्भातील जीआर किंवा परीसूचना असल्यास कळवणे. धन्यवाद

Anil Mallav said...

सर, मी मल्लाव अनिल मला सरकारी जागा क्षेत्र निवासी प्रयोजनासाठी महाराष्ट्र जमीन महसूल नियम 1971 मधील नियम 26 ते 30,32 आणि 41 अन्वये निवासी प्रयोजनासाठी शासकीय
जमीन प्रदान करण्याची तरतूद आहे. तरी मला अर्ज कोठे व कसा दयाचा. सर मार्गदर्शन करावे
ही विनंती

Anil Mallav said...

सर,मी मल्लाव अनिल शिरूर,पुणे
गावठाण विस्तार योजना, राज्य योजनांतर्गत
योजना भटक्या जाती, विमुक्त जाती व मागासवर्गीयांचे पुनर्वसन करून त्यांना कायमस्वरूपी घरकुलासाठी जागा देण्याची ग्रामीण
भागापूर्ती मर्यादित ) सर, या साठी अर्ज कोठे करावा लागणार आहे. तरी मला मार्गदर्शन करावे
ही विनंती.

Anonymous said...

नमस्कार सर,
सदर जमीनीबाबत हरकत तक्रार अर्ज दिलेला असता संबधित तलाठी यांनी त्याबाबत कोणतेही कार्यवाही न केल्याने अर्जदार यांने तलाठी यांचेवर कायदेशीर कारवाई करणेबाबत तक्रार अर्ज दाखल केला आहे त्याबाबत मागदर्शन मिळावे.

Unknown said...

Hi sir
शेती गायराण २ हेक्टर आहे आणि शेती लागवडी खाली आहे पण ७/१२ वर शेती पोटखराब खाली आहे तर सर शेती लागवडी खाली अनाची आहे तर काय करावं लागेल

KISHOR SHNTARAM KARHALE said...

महोदय, नमस्कार मी किशोर शांताराम कऱ्हाळे (माजी सैनिक) सध्या तलाठी मोताळा तालुका जि.बुलडाणा मला खालील प्रमाणे काही माहिती हवी होती तरी मला खालील माहिती देण्याची कृपा करावी.
1) नोंदणी करीता आलेले दस्त आपण किती वर्ष सांभाळून ठेवावे.
2) दस्त नष्ट करावयाचे असले तर त्याची प्रक्रिया काय आहे व कसा आहे अधिनियम किंवा एखादे पत्र असले तर बरे होईल कृपया माझ्या प्रश्नाच्या उत्तराची अपेक्षा आहे.
आपला विश्वासू
के.एस.कऱ्हाळे

Unknown said...

सर जमीन खरेदी करावयाची आहे पण एकूण ०.३४.०० गुंठे जमीन आहे त्यातील ०.२६.०० गुंठे जमीन खरेदी करावयाची आहे आणि त्यामध्ये चार भाऊ व बहिण सहहिस्सेदार आहेत. ती खरेदी करावयाची असेल तर काय करावे लागेल त्याबरोबर दुसरा गट ही विकत घ्यावयाचा आहे त्यामध्ये ही ०.१४.०० गुंठे जमीन आहे त्यातील ०.०६.०० गुंठे जमीन खरेदी करावयाची आहे त्यासाठी तुकडा पद्धत बंद असल्याने कशा प्रकारे जमीन खरेदी करावी लागेल

Wamanrao B.Gaikwad said...

सप्रेम वंदे ! ! !
maa.मंडलाधिकारी साहेब ,
माझे प्रश्न उपस्थित करण्यापूर्वि सादर केलेला घटनाक्रम ,साक्षिप्त असता तर ,आपणास मार्गदर्शनाची अडचण निर्माण झाली असती...म्हणून थोड्याशा नव्हे ,तर बराच मोठ्या विस्ताराने मांडला आहे ,.म्हणून क्षमस्व ! ! ! उपस्थित केलेल्या सर्व प्रश्नाची उत्तरे मिळावी हीच एक अपेक्षा ! इनाम वर्ग 6 ब ची एकूण 10 एकर जमीन असून ती आजोबाच्या नावे होती. आजोबास तीन मुले होती अ.ब.क.....पैकी अ.ब. माझे चुलते तर क.हे माझे वडील होते. अ.ला दोन मुले तर ब.ला एक मुलगी होती. क.म्हणजे माझ्या वडिलांना एकूण तीन मुले होती. (एकूण 5 भाऊ व एक बहीण ) आजोबांनी हयात असताना ही वडीलोपार्जित जमीन अ. हे कारभारी आसल्याने तसेच ,ब. व क. हे दोघे नोकरी निमिताने बाहेरगावीच राहत असल्याने , अ.च्या म्हणजेच माझ्या मोठ्या चुलत्याच्या नावावर केली.. तद्न्तर आजोबा ,दोन चुलते चुलत्या , माझे वडील व आई , मयत झाल्यावर या जमीनिस आम्ही 5 भाऊ व एक बहीण ( ती सुद्धा आज परागंदा आहे ) वारसदार होतो यात काही शंका आहे का ? असे असताना कालांतराने 1987 मध्ये ही वडीलोपार्जित जमीन चुलत्याच्या दोन्ही मुलांनी 50 ,50, टक्के (प्रत्तेकी 5 एकर) अशी आपापसात ,एका नोंदीद्वारे ,वाटून घेतली ,( त्या नोदीत त्यांनी स्पष्ट म्हटले की.....आमच्या वडीलास एकही भाऊ नव्हता ,म्हणून या जमीनिस आम्ही दोघेच भाऊ वारसदार आहोत.) व आमचा वारसहक्क डावलला .माझ्या मधल्या चुलत्याचे किवा माझ्या वडीलाचे कधीही 7/12 वर नाव आले नाही,.ते दोघेही भूमिहीन म्हणूनच मयत झाले. आज ते दोन चुलत भाऊ व दोन्ही वाहिन्या ,तसेच माझा मोठा भाऊ मयत असून ,नातू म्हणून आता फक्त आम्ही दोन भाऊ व आमची मोठी वाहिनी हयात आहे.. माझा धाकटा भाऊ केवळ ५ महिन्याचा असताना ,नोकरीच्या गावीच वडीलाचे निधन झाले. अवघ्या दोन महिन्याच्या आत माझ्या आईला विधवा आश्रमात तर आम्हा दोघांना अनाथलयात दाखल व्हावे लागले. कारण आई व वडीलाचे सर्व नातेवाईक आधार देण्यास असमर्थ होते. पुढे बंदिस्त जीवन ,मोफत अन्न ,वस्त्र व ,निवारा यांच्या आधारावर आम्ही मोठे झालो ,शिक्षण घेतले .पण आश्रमाच्या बाहेर पडल्यावर ,हे जग किती मोठे आहे ,याची जाणीव झाली. नातेवाईक नाहीत , कोणाचेही पाठबळ किवा आधार ,नसताना या जगात पाय रोवून उभे राहण्यास ,व शुन्न्यातून ,आपल्या आस्तित्वाची इतरांना जाणीव करून देण्यास ,बराच आवधी लागला.....म्हणूनच जाग येण्यास विलंब झाला. आज एका चुलत भावाच्या हिश्यावर (5 एकरवर) त्याच्या चार मुलीचा ,तर दुसर्‍या भावाच्या वाटणीवर (5 एकरवर) त्याच्या एका मूलीचा अर्धा (2.5 एकर) तर दुसर्‍या मुलीच्या मृत्तूपत्रा आधारे एका त्रयस्थ इसमाचा (2.5 एकर) अर्धा ताबा आहे.......त्या चार पुतण्या म्हणजेच (चार मुली) आज त्यांच्याकडील 2.5 एकर आम्हाला देण्यास तयार आहेत ,पण उद्या त्या इतरांच्या दबावाखाली नाही म्हणाल्या तर ? कारण त्या गावी आहेत तर ,आम्ही त्यांच्यापासून दूर किमान 200 की.मी.वर वास्तव्यास आहोत. याशिवाय आमच्या हकाच्या उरलेल्या 2.5 एकरचे काय ? सर , सदर जमिनीवर आमची नावे वारसदार म्हणून लागतील का ?1987 सालची नोंद व मृत्तूपत्र ,रद्द होऊ शकते का ? ते 2.5 एकर मिळत असतील तर ,कोणत्या पद्धतीने घ्यावे ? या सर्व कामासाठी काय काय करावे लागेल.? पुन्हा एकदा उत्तराची अपेक्षा ठेऊनच विराम घेतो. दि 16 जून 21.






Unknown said...

सर 2003 चे 32 म प्रमाणपत्र आहे त्याची आता 2021 मध्ये नोंद घेत येईल का?

Simplifying Engineering with onkar sir said...

2014 ला कायदेशीर रजिस्टर समोर वाटप केले असताना त्या सदर (दुसरी)व्यक्ती वाटपा प्रमाणे वहिवाटू देत नाही (मनगटाच्या जोरावर) विहीरी वरील समाईक विनापरवानगी झाडे काढली, दोघात रस्ता असताना अडवणे, विना परवाना माती उचलणे ( कायदेशीर वाटपपत्र होण्याअगोदर) पाइपलाइन फोर्डने इत्यादी..
ती व्यक्ती मात्र त्याचे सर्व शेत वाटपा प्रमाणे वहिवाटतो..
या संबंधी कायद्यत कोणती तरतूद आहे का. किंवा कोणाकडे दाद मागावी..

Simplifying Engineering with onkar sir said...

9689452407 contact number

Anoj Ramesh Deshmukh said...

आमचे आजोबांचे नाव स कुळ म्हणून लागले आहे व ते आताच्या उताऱ्यात सुद्धा इतर हक्कात त्यांचे नाव येत आहे त्यामुळे त्यांचे वारस नोंद होणेसाठी आम्ही तलाठ्याकडे अर्ज केला आहे परंतु दुसऱ्या व्यक्तीने ती जमीन मी १९७७ साली खरेदी घेतली आहे व तेव्हापासून मी कसत आहे मूळ मालकाने १९७३ साली टेनन्सी दाखल करून कुळ उतरले आहे व मला विकली आहे असे म्हणून आमच्या नोंदीवर हरकत घेतली आहे परंतु आम्हाला कुळ कमी करणे साठी नोटीस बजावली नाही मुळात उताऱ्यावर आज हि स कुळ इतर हक्कात आहे तर त्यांच्या वारसाची नोंद होऊ शकते का

Unknown said...

आदरणीय मोहसीन सर मी नवीन तलाठी आहे मला फेर फेर घेत असताना अडचणी येत आहेत तरी कृपा करून मला फेर फार कशे घ्याचे pdf पाठवा

Unknown said...

आदरणीय महोदय,

गावच्या नकाशावरील पाच आणे म्हणजे किती फुट रस्ता होय ?

जमिनीचे सक्षम अधिकाऱ्याचे परवानगीशिवाय झालेले हस्तांतरण नियामाकुल करणे said...

मा सर ,
सदर आमची जमीन हि "अ" या मालकाकडून १९७० साली कुळकायद्याने
"ब" या माणसाकडे हस्तांतरित झाली कायद्याने त्याचा ३२ग हा झाला आहे
.त्या नंतर "ब" या मालकाने त्याची जमीन आम्हाला विकली. त्याचे
खरेदीखत हे आमच्या वडलांच्या नावे झालेले आहे.
सदर जमीन हि आम्ही वर्ष २००५ पर्यंत कसत होतो. २००५ मध्ये मूळमालक
"अ" यांनी हा व्यवहार गैर पद्धतीने झाला आहे असे तहसीलदार यांना
निदर्शनास आणून दिले.म्हणजेच सदर व्यवहार हा कलम. ४३ अन्वये
जिल्हाधिकाऱ्यांची परवानगी न घेता झाला आहे असे निदर्शनास आणून
दिले.(कुळ कायदा कलम 43 शर्त शेरा ).

सदर जमिनीचे सर्व हक्क , ७/१२ , खरेदीखत हे आमच्या नावे आहे . सदर
केस हि high court मध्ये चालू होती . त्यामध्ये वकिलालनकडून कोणताही
पाठपुरावा झाला नाही . त्यामुळे high court मधून हि केस परत तहसीलदार
यांच्याकडे नियमित करण्यासाठी आली असता त्याचा पाठपुरावा न
झाल्यामुळे सदर जमीन हि २००८ साली सरकार जमा झाली आहे. आता हि
जमीन आम्ही ५०% नजराणा भरून घ्यावयास तयार आहे तरी त्या साठी काय
तरतूद आहे हे कळावे. तसेच हि जमीन "ब" या माणसाला मिळू शकते का ..
तसेच जर ५० % नजराणा भरून हि जमीन आमच्या नावे होत असेल तर
आम्ही परत हि जमीन दुसऱ्या शेतकर्र्याला विकू शकतो का .. कळावे...

Unknown said...

Apghat vima claim v DCPS after death claim kase dyave

Unknown said...


सर माझ्या जमिनीमध्ये 1952सली जंगल वहिवाट द्वारे काही इसामांच नावे दाखल झाली आहेत 70% क्षेत्रावर पण त्यांनी ते क्षेत्र 5 वर्षाच्या आत विकले आहे.तरीही माझ्या वशाजांची नावे त्यांच्या क्षेत्रापैकी 40% हिष्यावर चालू सात बऱ्यावर 7/12 दाखवत आहेत. जंगल वहिवाट मध्ये त्याची नावे ही चुकीच्या पध्दतीने दाखल केली आहेत. कारण क्षेत्र बुकला माझ्या वंशजांची नावे असतानाही त्याची नावे दाखल करण्यात आली आहेत तरी त्याची नावे कमी करण्यासाठी काय करावे
यावर सर आपण मार्गदर्शन करावे,ही आपणास विनंती.आपणास दिलेल्या तसदिबद्दल क्षमस्व.
आपला विश्वासू
संकेत धिंडले
ता. वेल्हे जि. पुणे

Unknown said...

Hi sir,
My land map and 7/12 area showing difference. All maps (survey map, Gat Map and court commission map )is same but Gunawan book ,sheti book ,7/12 showing less area ex. Map shows 57 gunthe and 7/12 shows 14. Is it possible to change satbara as per nakasha.what is process? Please guide

Prajag said...

सर ,आम्ही 11 गुंठे बागायत शेती 5 जणांमध्ये घेतली आहे पुणे जिल्हामध्ये,मग आमची 5 जणांची 7/12 नोंद होऊ शकते का ? तुकडबंदी कायदा लागू होत नाही ना ?

Prasad said...

कलम 227 1 ल्य काय आहे व कोणत्या बाबींशी संबंधित आहे याबद्दल माहिती मिळावी

Unknown said...

७/१२ उताऱ्यावर इतर हक्कात असणारी नोंद
भूमिहीन शेतकरी,शेतमजूर,सैनिक ह्यांना वाटप जमीन
ही नोंद ७/१२ उतऱ्या वरून कमी करता येते का
कृपया मार्गदशन करावे

Unknown said...

नवीन तलाठ्याने ऑनलाईन काम कसे करावे या संदर्भात एखादी माहितीपुस्तिका असेल तर नवीन तलाठ्यांना ऑनलाइन काम करण्यासाठी मदत होईल

Unknown said...

नमस्कार मला सहकारी गृहनिर्माण संस्थेमधील भुखंड भोगवटादार वर्ग २ मधून वर्ग 1 मध्ये रूपांतर करण्यासाठी ची प्रकिया सांगावी तसेच सदर भूखंड घेताना पूर्वी नजराणा रक्कम भरलेली असेल तर पुन्हा नजराणा रक्कम भरावी लागेल का त्याबद्दल चे नियम सांगावेत

Unknown said...

नमस्कार सर माझी बहीण विधवा असून तिच्या पतीचे १९९९ साली निधन झाले ते नोकरीनिमित्त नाशिक येथे वास्तव्यास होते. त्यांच्या पश्चात माझी बहीण व तिची दोन मुले असे वारस आहेत त्यांची शेत जमीन व वाडे गेवराई येथील रामपुरी गावी आहे. पण माझ्या बहिणाला आम्ही तिच्या पतीच्या निधना नंतर आमच्या घरी घेऊन आलो त्या गावातील राजकारणी यांनी आमच्या परस्पर ती जमीन ताब्यात घेऊन कसायला घेतली आज पण तिची जमीन त्याच्या ताब्यात आहे त्या वेळी बहिणी वर आणि आमच्या कुटूंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असल्यामुळे आम्ही जमिनीबाबत लक्ष दिले नाही आणि तिच्या दिराने हि यांच्या कडे दुर्लक्ष केल्यामूळे त्या राजकरणी व्यक्तीने फायदा घेतला आहे जमीन त्याच्या ताब्यात आहे आणि उत्पन्न ही तोच घेतो आहे . मी पुण्यात अर्ज करून शेतीला त्यांची वारस नोंद केली आहे तरी ती जमीन त्या माणसाकडून माझ्या बहिणी ला मिळण्यासाठी काय करावे लागेल कारण ती अबला आहे गाव गुंडापुढे तिचा निभाव कसा लागेल तरी याबाबत मार्गदर्शन करावे हि नम्र विनंती तसेच त्या गावात त्यांचे वडीलोपार्जित ४ वाडे आहेत त्या वाड्या पैकी एक वाडा तिचा दिराने परस्पर विकून टाकला आहे आणि आम्हाला त्या सर्व वाड्याच्या मिळकत क्रमांक माहित नाही तरी त्या वाड्याच्या विक्रीला हरकत घेता येईल का आणि त्या वाडयांना माझ्या बहीण आणि तिच्या मुलांची वारस नोंद करता येईल का याबाबत हि मार्गदर्शन करावे हि नम्र विनंती

श्रीपाद कुलकर्णी
मो. नं ८८८८२१५४३२

Kunal Pawar said...

Sir, जमीन कासण्याची रीत या नोंदी या संदर्भात काही सांगाल का.?

कालिदास said...

नमस्कार साहेब!
ए.कु.मॅनेजर असल्याने कुळ कायद्यानुसार जमीन खरेदी करण्यासाठी भावाने निम्मी खरेदी किंमत न दिल्यामुळे सर्व खरेदी किंमत स्वकष्टार्जित उत्पन्नातून भरली असल्यास, त्या भावास जमीनीत समान वाटणी मागण्याचा अधिकार आहे का? असल्यास तो कोणत्या कायद्याने असतो.

कालिदास said...

Is agricultural land purchased solely by huf karta under tenancy act a self acquired property?

कालिदास said...

Is agricultural land, purchased solely by HUF Karta एकुमॅ due to no contribution by the brother, under tenancy act sec. 32G & 32M, a self acquired property?

VIRESH said...

अ व्यक्तीने मृत्युपत्राद्वारे जमीन 5 मुले व 1 मुलगी यांना न देता 5 नातवांचे नावे (मुलांचे मुले)केले. अ व्यक्ती मयत होताच दुखावलेल्या मुलीने वारस नोंदीसाठी अर्ज केला आहे. अर्जात 5 मुले व 1 मुलीचा समावेश आहे. तलाठी यांनी 6क ला नोंद घेतली असता मुलांनी हरकत नोंदवून मृत्युपत्राप्रमाणे नोंद होणेबाबत विनंती केली आहे. पुढील करावयाच्या कार्यवाही बाबत तरतुदीसह मार्गदर्शन होणेस विनंती आहे

Omkar said...

32 म चे certificate 1993 ला झाले आहे व अजून फेरफार करून घेतला नाही आहे व उताऱ्यावर नाव आले नाही तरी यासंबंधी पुढील कार्यवाही काय करावी

Anonymous said...

सर मी एक (सदनिका) प्रॉपर्टी खरेदी केली आहे त्याची रीतसर SRO मध्ये दस्तनोंदनी झाली आहे त्या नंतर मी 7/12 वर नाव नोंदवण्यासाठी प्रत्यक्ष अर्ज दिला आहे व एक महिना उलटून गेला आहे अजून नाव लागले नाहीये व ज्याच्याकडून प्रॉपर्टी खरेदी केली आहे त्यांना कसल्या ही प्रकारची नोटीस मिळाली नाहीये व ऑनलाईन चावडी वरती फेरफार नंबर दिसत आहे फेरोफार दिनांक ची तारीख दिसत आहे व ऑनलाईन नोटीस ही दिसून येत आहे व ऑनलाईन 7/12 मध्ये प्रलंबीत फेरफार नंबर पण दिसत आहे परंतु हरकत घेण्याची शेवटची तारीख तेथे दिसत नाहीये आशा स्तिथी मध्ये काय केले पाहिजे कृपया मार्गदर्शन करा.

Unknown said...

सर,माझ्या आजोबांना 1968 साली फॉरेस्ट विभागाकडून
जमीन मिळाली त्याची फेरफार नोंद 1990 साली झाली
व ती मंजूर पण झाली,पण ती नोंद 7/12 वर उतरली नाहीं जमीन आम्ही अजूनही कास्तो मग आता ती जमीन माझ्या आजोबांच्या नावावर होण्यासाठी आता मी काय करू
मला मार्गदर्शन करा.

Unknown said...

सर, 1964 मध्ये वडिलांनी गावठाण जागा एका
व्यक्तीकडून खरेदी केली आहे. खरेदी खतात लांबी 22 हात व रुंदी 11हात असा माप आहे. तर आज चा मापात फुटामध्ये व तसेच किती चौ फूट होतो. प्लीज सांगावे.

Smart Work said...

Sir SSD exam cha syllabus milel ka

Unknown said...

नविन रस्ता मागणी कलम 143 नुसार जिल्हा आधिकार्याकडे आपिल केली आसता गैरसोयीचा निर्णय देऊन मागणी फेटाळली . आता आम्ही काय करावे ?
प्रविण चोळके नांदगाव

Unknown said...

प्रश्न चुकला उपजिल्हा आधिकार्याकडे आपिल केली आसता

Unknown said...

नविन रस्ता मागणी कलम 143 नुसार उपजिल्हा आधिकार्याकडे आपिल केली आसता गैरसोयीचा निर्णय देऊन मागणी फेटाळली . आता आम्ही काय करावे ? प्रविण चोळके नांदगाव.

Anonymous said...

सर म.ज.म.सं. १९६६. २०२१ पर्यंत सुधारित असेल तर अपलोड करावे सोबत महाराष्ट्र नगर रचना अधिनियम १९६६ पण सुधारीत अपलोड करावे .
नाहीतर सुधारित सर्व कोणत्या ठिकाणी भेटतील याचा पत्ता द्यावा.
आभारी

Badrinarayan said...

माझ्या आईची जमीन हिंगोली जिल्ह्यात आहे. परंतु ती बुलढाणा जिल्ह्यात राहते तर मृत्यूपत्र कोणत्या जिल्ह्यात करावे....

Badrinarayan said...

माझी जमीन हिंगोली तालुका हिंगोली जिल्ह्यात आहे परंतु मी लोणार तालुका बुलडाणा जिल्ह्यात राहतो. तर मी लोणार तालुक्यात बुलढाणा जिल्हा येथे मृत्यूपत्र करू शकतो का. कोर्टात ते मान्य राहील का.??

Unknown said...

माझ्या पत्नीचे नाव ७/१२ वर लावण्यासाठी काय करावे.

Mayur Wankhade said...

जमीन महसूल अधिनियम 1966 कलम 150 नुसार जर नायब तहसीलदार आदेश पारित करत असेल तर त्यांची नोंद किती दिवसात घेणे तलाटी याना बंधनकारक आहे

Mayur Wankhade said...

जिथे जमीन आहे त्याच जिल्ह्यात रितसर नोंदनी करता येते

Mayur Wankhade said...

नाही

Unknown said...

If a talathi urges himself/herself for transfer within any district from one sub division to another subdivision, is he/she bound to lose the seniority

गुरू पाटील said...

जर आजोबांनी केलेले वाटणीपत्र रद्द झाले असेल तरी ती जमीन नातवंडे कसू शकतात का?

Unknown said...

सर,आमच्या वडिलोपाजीँत जमीनीतील एकाच गट नंबरमधून 60 गूठे जमीन कँनाँलसाठी व 106 गूंठे जमीन धरणग्रस्तांना वाटप झाली आहे.हा आमच्यावर अन्याय झालेला आहे.माहीती मिळावी.

गुलाब शेख said...

सर हैद्राबाद इनाम वतन वर्ग २ जमीनीचे बिना परवानगी खरेदी होते का शा़़ नी़ ९ जुलै २००२ नुसार कृपया मार्गदर्शन करावे

रोहन said...

महाराष्‍ट्र जमीन महसुल अधिनियम १९६६ नुसार एखाद्या फेरफारास आक्षेप अर्ज आल्‍यास सुनावणी घेऊन तो किती दिवसात निकाली काढावा याबाबत शासन निर्णय मिळावा याबाबत विनंती

चंद्रकांत पाटील तलाठी said...

सर न्यायालयात आपसात वाटणीपत्र डिक्री झाली आहे ती नोंदवता येते काय व त्याला दुय्यमनिबंध यांचेकडे नोंदवणे आवश्यक आहे काय मार्गदर्शन मिळावे हि विनंती

Unknown said...

आम्ही पाच ते सहा वर्षापूर्वी सात गुंठे जागा घेतली आहे पण सात बारा अद्याप नावावर केला नाही सदर जागा नेंदणीकृत केलेली आहे.
तसेच जागा घेण्यापूर्वी एन ए ऑडर घेतली होती परंतु ती एक वर्षानी रद झाली आहे त्यास काय तरतुद आहे

Sachin said...

प्रश्न:
सातबारावर आणेवारीची नोंद आहे पण वाटप झाले नाही आहे खाते फोडले नाही आहे सदर उताऱ्यावर ३ नावे होती व टोटल २४५ गुंठे जमीन होती त्यातली एकाने त्याचा हिस्याची सन २०१० साली २४५/३=८१. ५ गुंठे क्षेत्र विकले आहे)(समान तिसरा हिसा ) ते विकताना इतर दोघांची संमती घेऊन विकले आहे. त्यातील १ आता मयत झाले आहे ते अशिक्षित होते त्यानंतर त्याचा वारसाची नावे लागली आहे. आता वारसांनी त्यांना खाते वाटप करण्या साठी विचारले असता ते सांगत आहे कि आमचे भावांचे आणेवारी वाटप १९७५ साली झाले असे सांगत आहे आणि त्याचा हिस्सा जास्त आहे असे सांगत आहे जमीन विकले आहे त्याचा ६ अणे ९ पैसे व त्याचा ६ अणे ९ पैसे आणि मयत इसमाचा २ अणे ६ पैसे आहे पन सदर सातबारावर सामूहिक क्षेत्र दाखवत आहे आणि खाते सुद्धा फोडलेले नाही आहे आणि वारस राहिलेले क्षेत्र =२४५-८१. ५=१६५ गुंठे क्षेत्र समान वाटप करण्यास सांगत आहे परंतु ते मान्य करत नाही. जुने फेरफार तपासले असता वाटप पत्र हे भावामध्ये आपसी झाले आहे फक्त अर्जाद्वारे आणेवारी नुसार नोंदणी कृत नाही. ती आणेवारी वारसांना मान्यनसल्यास काय करावे आणि चालू ७/१२ मध्ये ती दिसत नाही आहे सामूहिक क्षेत्र दिसत आहे आणि जुन्या ७/१२ मध्ये फक्त १ इसमाचा नावाखाली आणेवारी दिसत आहे. कृपया मार्गदर्शन करावे हि विनंती

Sachin Avhad
At Post :Paste Nashik

Unknown said...

सर पोट खराबा दुरुस्ती फॉर्म pdf मिळेल का व पुढील प्रोसेस काय आहे

Unknown said...

मा मोहसीन शेख साहेब मंडळ अधिकारी महोदय माझे वडील दिनांक २५/०१/२०१९ रोजी THRISSUR KERAL INDIA केरळ येथे हरवले आहे शोधणेचे भरपूर कोशिस केली परंतु माझे वडील आज पर्यंत मिळाले नाही केरळ मध्ये पोलीस कडे तशी नोंद झालेली आहे वडीलाच्या नावे गावी ०५ एकर जमीन आहे ७/१२ उतारे वर वारस नोंद कशी करता येईल याची माहिती मीळावी हि नम्र विनंती नाव शकूर लालख मुलतानी रा न्याहारखेडे बु तालुका येवला जी नाशिक महाराष्ट्र मो 9270137370

Unknown said...

Mala 10 gunte shet jamin gavat ghyaychi hhaye mi gheu sakto kay majya navavar honar kay

Unknown said...

Gavatil 10 gunte shet jaminiche 1 _1 guntya madhye na polt hotil kay

प्रकाश पाटील said...

रजिस्टर साठेखत 7/12 सदरी इतर अधिकारात नोंद घेता येते का? कायदेशीर प्रक्रिया काय आहे

Admin said...

जमीन संपादित केल्यानंतर शेतकरी भूमिहीन होण्यामुले फेरफार नोंद टाकण्यात अडचण येते का?

उदाहरणार्थ: जर तुम्ही शेतकर्‍याकडून संपूर्ण जमिनीचा तुकडा विकत घेतला असेल आणि खरेदी केल्यानंतर ते भूमिहीन होणार असेल, तर कशी खरीदी करावी?

भूमिहीनबद्दल अटी, शर्ती व कायदे स्पष्ट करा.

Unknown said...

आजोबांपासून सातबारा वरती नाव लागले नाही तर काय करावे

Jaykumar Mane said...

नवीन शर्त महार वतन जमीन 7/12 नोंद करण्यासाठी लॉक अर्ज कसा करावा

Unknown said...

42 ब बिनशेती रद्द करू शकतो का?

Unknown said...

माझ्या संख्या मावशीला कुळाने भेटलेली जमीन मला मृत्यूपत्र करून २ एकर दिली आहे .परंतु रजिस्टर मृत्यूपत्र करताना महसूल अधिकाऱ्याची परवानगी आवश्यक.आहे .ka

Unknown said...

विक्री प्रमाणपत्र बद्दल नोंद कशी घ्यावी याबाबत मार्गदर्शन करावे

सचिन said...

आईने मुलगा - सून व नातू यांच्या नावाने सदनिका करणे कामी मुलींचा हक्क रहाणार नाही,असे हक्कसोड नोटरी करायची आहे. सदनिका यावर मुलगा आणि आईचे नाव आहे. मुलगा सदनिका कर्जाचे हप्ते फेडत आहे. त्याचा नमुना/माहिती मिळणेस विनंती आहे.

Unknown said...

सर तुकडे बंदी मध्ये 1966 पूर्वी आमची जमीन आमच्या लागत असणाऱ्या खातेदाराने विकत घेतली तोच मालक ती जमीन आम्हाला विक्री करत आहे ती आम्हाला कोणत्या प्रोषिजर नी घ्यायला जमेल

Unknown said...

सर 7/12 उतारात इतर अधिकारात सन 1980 पासून कोणतीही नोंद नसताना बेकायदेशीर रित्या इतर व्यक्तीचे नाव दिसत आहे. अभिलेख शाखेत शोध घेतला असता सदर नावाची ना फेरफार नोंद आहे ना काही पुरावा सदर क्षेत्र विक्री करावयाचे आहे. सदर इतर अधिकारात असलेले नाव कमी करणे बाबत आपल्या माहिती प्रमाणे काही आदेश किंवा सदरचे नाव कोणत्या कलम अन्वये कमी करता येईल याची सविस्तर माहिती द्यावी. 🙏🙏

Madhuri bhanudas lawand said...

Majya father expire houn 3month zle
varas manun majya brother ne nav nodvle fkth ektyche at a MLA ani mother la nav nodvanysti ky kravee lagel

Feroz khan said...

Sir your number pls

Anonymous said...

आदिवासी व्यक्तींच्या जमिनीतून वहिवाटीकरीता रस्ता घेता येतो का ? अथवा मिळू शकतो का ? कार्यपध्दती काय आहे याबाबत

Unknown said...

नमस्कार सर आमची गट नं 74 अशी जमीन आहे सदर जमिनीत आमचे पणजोबा यांचे नाव सन 1950 पासून इतर हक्कात स.कुळ म्हणून दाखल आहे परंतु सदर मिळकत ही पणजोबा v त्यांचे चुलत भाऊ यांनी खरेदी ने घेतलेली आहे तसे दस्त ऐवज देखील आहे सन 1949 साल चे.यात पंजोबा नं चे चुलत भाऊ यांचे नाव भोगवट दार सदरी आहे आहे v आमचे पंजो यांचे नाव कुळ म्हणून आहे तर हे नाव भोगवट दार सद्री कशा मार्गाने घ्यावे याचे मार्गदर्शन मिळावे

Habib Bilal Patel said...

मैं हबीब पटेल साकुर ता.संगमनेर ,अहेमदनगर से हु हमें भोगवटादार नं २ की जमीन नं १ में हस्तांतरण करना है ईसकी क्या प्रोसेस है ,और आपका Email id ya whatsapp No.dijiye

Unknown said...

m.i.d.c act 1961

Unknown said...

MAHARASHTRA INDUSTRIAL DEVELOPMENT CORPOTATION ACT 1961 PELASE PROVIDE

Unknown said...

वाघोली पुणे येथे अकरा जणांमध्ये जागा आहे प्रत्येकी एक एक गुंठा हे खरेदीखते अकरा जणांमध्ये झालेले आहे तर सातबारावर नाव येण्यासाठी काय करावे लागेल

Unknown said...

नमस्कार
माझे नाव -अशोक धुमाळ
पेठ, आंबेगाव, पुणे
प्रश्न -20 वर्षापुवीचे वारसा हक्काने सरस निरस झालेले वाटपपत्र रद्द करता येते का? उपाय मार्ग सांगा

Unknown said...

सर मी विजय सोनुने जिल्हा वाशिम शिपाई पद मला आपला मोबाइल नंबर पाहिजे सर प्लिज

महेश said...

सर माझे नाव महेश पाटील आहे
मी नंदुरबार जिल्ह्य़ातील एका छोट्या गावाचा रहिवासी आहे
प्रश्न- सर 3 महिन्यापुर्वी मी माझ्या गावातील माझ्या residential NA प्लॉट्स मध्ये छोटा फूड प्रोसेसिंग चा उद्योग चालू केला आहे आणि त्या निगडित लाइसेन्स पण मिळवले आहे पण 2 दिवसांपूर्वी माझ्या यूनिट ला आमच्या एरिया चे सर्कल व तलाठी भेट देऊन गेले व त्यांनी असे सांगितले की तुम्ही आमच्याकडून परवानगी का घेतली नाही तुम्ही आम्हाला न विचारातच residential प्लॉट्स मध्ये व्यवसाय करत आहात त्या साठी तुम्हाला प्लॉट्स च्या किमतीच्या 40-50% प्रमाणे मोठा 5-6 लाखांचा कर व दंड भरावा लागेल नाहीतर तुम्हाला मोठा प्रॉब्लेम होईल असे सांगितले.सर मला या नियमा बाबत काहीच माहिती नव्हती.
एवढे पैसे देऊन कर भरणे मला कुठल्याही परिस्थितीत शक्य नाहीये.माझा व्यवसाय कसा चालू ठेवू कृपया उपाय मार्ग सांगा.

धन्यवाद
krishnam7862@gmail.com

Pravin halkare said...

मुंबई हायकोर्टाच्या औरंगाबाद बेंचच्या आदेशानुसार प्रोबेट रद्द करण्यात आले. परंतु तलाठ्याने जिल्हा न्यायालयाच्या आदेशानुसार घेतला. तो फेरफार रद्द करण्याचा अधिकार महाराष्ट्र राज्यात कोणाला आहे?

Pravin halkare said...

तलाठ्याने जिल्हा न्यायालयाच्या 18/10/2021 च्या आदेशानुसार प्रोबेट वैध ठरवून फेर घेतला होता.ते प्रोबेट मुंबई हायकोर्टाच्या औरंगाबाद बेंचच्या 6/12/2021 आदेशानुसार प्रोबेट रद्द करण्यात आले. आता पुर्वीच्या तो फेरफार रद्द करण्याचा अधिकार महाराष्ट्र राज्यात कोणाला आहे याबाबत माहिती द्यावी? शेत जमीन औरंगाबाद जिल्ह्यातील फुलंब्री तालुक्यातील आहे.

Katkade Babasaheb said...

आदरणीय सर,
समजा एखाद्या सामाईक क्षेत्रात चार हिस्सेदार आहेत त्यापैकी एका व्यक्तीने आपला शेतजमिनीचा हिस्सा अविभाज्य खरेदी विक्री नियमांतर्गत विकला व नंतर उरलेल्या तिघांनाही त्यांचा सामाईक हिस्सा विकावयाचा असल्यास त्यांना बाहेरील व्यक्तीस विकायचा आहे तर त्यांनी काय करावे?
जर या तिघांनी त्यांचा हिस्सा बाहेरील व्यक्तीस विकला तर जो नवीन व्यक्ती हिस्सेदार झालेला आहे तो त्या तिघांना नोंदीस अडचण निर्माण करू शकतो का?
जर तो नवीन आलेला हिस्सेदार कमी किमतीत या तिघांची जमीन खरेदी करू इच्छित असेल व त्यांना दुसर्‍यास विकण्यास अडचण निर्माण करीत असेल करीत असेल तर काय करावे?

संग्राम सावंत said...

साहेब,
नमस्ते।
पायवाटचा रस्ता किती फुट असतो.याबाबत माहिती हवी.पायवाटेचा रस्ता खाजगी जमिनीतून जातो.गेली 40 वर्षे वहिवाट सुरू आहे.त्या पायवाटेच्या रस्त्या बंद करता येतो का?

Pramod pawar said...

साहेब, मालक कधी मयत झाले याची माहिती नाही,आता त्यांचे वारस उपलब्ध झालेत, आम्हाला आता 32ग किंमत ठरवून मिळेल का

Unknown said...

वारस नोंद मध्ये जो फेर पडतो त्यामध्ये 1 गटाचा उल्लेख येत नसेल तर फेर दुरुस्ती, अथवा नवीन फेर उल्लेख करून मिळण्यासाठी काय अडचण आहे.. जर महसूल च्या चुकीने जर यात अडचण येत असेल तर.. कलेक्टर, अथवा आयुक्त महसूल यांना कागदपत्रे सहित अर्ज सादर करावा लागेल काय?

Unknown said...

आमची जमिन बँकेकडे तारन होती ती बँकेने फाॅरेस्टला विकलेली आहे ती परत घेता येईल का?

Prasad said...

सन 1988 दरम्यान माझे वडील व इतर दोघांमध्ये एक गुंठा जागा खरेदी झालेली आहे कालांतराने 1992 पर्यंत वडिलांनी उर्वरीत दोघांकडून त्यांचे हिस्स्याची असलेली जमीन खरेदी केली परंतु 7/12 वर वडिलांच्या नावासमोर 84 क चा शेरा नोंदविला गेलेला असल्याने, 7/12 वरून उर्वरित दोघांची नावे निघत नाहीत. वडील शेतकरी नाहीत. तथापि सदरची जागा 1998 पासून पुणे महानगरपालिका मध्ये समाविष्ट झालेले आहे आणि सद्यस्थितीत सदर सर्व्हे नंबर पुणे महानगरपालिका अंतर्गत निवासी झोन मध्ये आहे. त्यामुळे सदरची जागा निवासी झोन मध्ये असल्याने त्याआधारावर 7/12 वरून 84 क शेरा काढता येईल काय? ������

Unknown said...

तहसीलदार ने एखाद्या जमीन प्रकरणात फेर लावण्याचा संदर्भात निकाल दिल्यानंतर, तलाठ्याने फेर लावण्याचे संबंधात पुढिल काय प्रक्रिया आहे

Unknown said...

कृपया मार्गदर्शन करावे

Unknown said...

आदरणीय सरजी,
नमस्कार!!
महोदय आपणास विनंती करतो की मला 32ग अन्वये दावा दाखल करावयाचा आहे .या संबंधीचा अर्ज असल्यास द्यावा .किंवा कसा अर्ज करावा यासंबंधी मार्गदर्शन करावे!!
महारनवर नितेश
दिघी ता.कर्जत

Unknown said...

7/12 इतर हक्कात कु.का.47 प्रमाणे बेकायदेशीर खरेदी व्यवहार असा शेरा असुन तो कमी करणे आहे तसेच जुने अभिलेखे मिळत नाही या संबंधी कमी करणे करिता मार्गदर्शन करावे... Sir

Shiva Autangi said...

प्रलंबित फेरफार हा किती दिवस असावा

Unknown said...

सर नमस्कार
माझ्या वडिलांनी 2003 साली घरासाठी जमीन घेऊन घर बांधिले होते , ह9 जागा सत्ताप्रकार ब मध्ये आहे. ह्या कोरोना काळात वडिलांचे निधन झाले ,वडिलांनी मृत्युपत्र केले आहे त्या प्रमाणे मी रजिस्ट्रार ऑफिसातून सूची क्रमांक 3 पण काढला आहे
Cts मध्य मृत्युपत्र सोबत सूची क्रमांक 3 जोडून अर्ज दिला असता, cts चे अधिकारी म्हणतात विडिलांनी जमीन खरेदी करीत असताना जिल्हाधिकारी कार्यालयात नजराणा भरणा केला होता का त्या बाबत मला काही एक माहिती नाही
आता हे घर मला नावी करण्यासाठी काय करावे लागेल ते सांगाल तर महेरबानी होईल
जागा वडिलांच्या नावे आहेच मृत्युपत्राने ती माझ्या नवे व्हायला हवी

Unknown said...

आपण माहिती द्याल अशी विनंती सर

Unknown said...

सर माझे नाव प्रदीप देविदास हिरे, नवापुर जिल्हा नंदुरबार

Unknown said...

Aply navavar Gavthan asel tar tya jagevar Gavala amchya parvangishivai kuni Ghar bandhoo shakta ka.

Unknown said...

माझे खापर आजोबा जातीने एसटी यांची जमीन?
जातीने एससी हे कसत होते तर त्यांच्या नावी झाली ती जमीन तर ती आम्हाला परत कशी मिळेल

Unknown said...

Hi

Unknown said...

Sir वडलोपर्जित जमीन २४ गुंट आहे.बायको आजारी पडली आहे . घरावर्ती कर्ज कडून तिला दवाखान्यात दाखवत आलो आहे . आता माझ्याकडे २४ गुंटे जमीन विकल्याशिवय पर्याय नाही.मी हताश झालो आहे.मी ती जमीन विक्री करू शकतो का?

Unknown said...

आणि तीच जमीन सामाईक चेत्रातील २४ गूंट अडकली असेल तर काय करावे लागेल sir

Unknown said...

N.A.Leout मधील Public Utility जमीनीच्या विक्री परवानगी देता येईल का > किंवा कसे ?

N P Patil said...

सर जिल्हा परिषद व ग्रामपंचायत उपकर आकारणी बाबतचा शासन निर्णय अथवा परिपत्रक अथवा कायदेशीर तरतुदी बाबत माहिती मिळेल का ?

Unknown said...

मोहसीन शेख साहेब, सिलिंग जमीन कायदेशीर खरेदी विक्री करता येईल काय, व नजराणा हा किती भरावा लागतो

adgai1969 said...

नमस्कार सर, सन 2000 पूर्वी आईला तिच्या आईकडून आणि भावांकडून 3 गुंठे जमीन नोंदणीक्रूत खरेदीखताद्वारे देण्यात आली. सातबारावर इतर हक्कामध्ये आईची नोंद दिसते. तिथे आवास योजनेतंर्गत दोन रूमचे घर बांधण्यात आले आहे. सातबारावरील नोंद नियमित करण्याबाबत तलाठी प्रांतसााे चे 25% चलन भरण्याबाबत घाई करत आहे. (रक्कम रू.70500/-)(आम्ही अनुसूचित जाती आणि दारिद्यरेषेखालील कुटुंबात समाविष्ट आहे.) मार्गदर्शन व्हावे.

adgai1969 said...
This comment has been removed by the author.
Unknown said...

51.52.nakkal.kute.milel

Anonymous said...

एक माहिती पाहिजे होती माझ्याकडे 2 एकर शेती आहे मला शेत घर बांधायचे आहे तर विना बिनशेती मी किती sqft बांधकाम करू शकतो

Unknown said...

सरकारी जमीन भेटलेली , त्यावर महाराष्ट्र शासनाचा शिकामोर्तब करून त्यांनी ती जमीन सीलिंग केली तर ती आपल्याला परत जमीन कशी भेटेल

Unknown said...

माझी जमीन सातबारा वरती 6.8 एकर 40 वर्षे जुनी आहे आणि आता 5.20 आहे तर कशी

Unknown said...

महसूल अधिनियम 1966 कलम 143 नुसार तहसीलदाराकडे अर्ज सादर केला तर रस्ता मिळतो का ? आणि जर विरोधी शेतकर्‍याने रस्ता देत नाही म्हटलं आणि माझ्या शेतातून रस्ता नाही म्हटलं आणि नकाशामद्धे रस्ता उपलब्ध नसला तर निकाल काय लागेल याची माहिती द्या.

अमृत पाटील ,वाबगाव त. देवळी. जि. वर्धा

Unknown said...

महसूल अधिनियम 1966 कलम 143 नुसार तहसीलदाराकडे अर्ज सादर केला तर रस्ता मिळतो का ? आणि जर विरोधी शेतकर्‍याने रस्ता देत नाही म्हटलं आणि माझ्या शेतातून रस्ता नाही म्हटलं आणि नकाशामद्धे रस्ता उपलब्ध नसला तर निकाल काय लागेल याची माहिती द्या


अमृत पाटील ,वाबगाव त. देवळी. जि. वर्धा मो 9764752614

Unknown said...

माझ्या जमिनीवर चुलत्याने ताबा केला जमिन माझ्या नावावर आहे काय करावे

Unknown said...

आमची जमीन भूमिहीन(सिलिंग)जमीन धारनेची कमाल मर्यादा या प्रकारात मोडते.ही जमीन वर्ग 2 ची असल्याने ती वर्ग 1 करता येईल का,सविस्तर माहिती द्या.

Unknown said...


महरवतान इनामवर्ग ६ब ची जमीन विनापरवाना खरेदीखत केले फेरफार नोंद रद्द झाली तर सिनियर डिविजन जज साहेब यांना कलेक्टर यांना सादर नोंदीसाठी नजराणा भरून घेऊन खरेदीखतास मान्यता देता येते का? तशी कायद्यात तरतूद आहे का

Unknown said...

नमस्कार सर,

मी सुबोध माझे वडील मयत झाल्यावर मी तलाठी यांच्याकडे वारस तपास करण्यासाठी गेलो तेव्हा मला समजले कि आमच्या जमिनीवर माझे मोठे चुलते यांचे नाव ए.कु.प.म्हणून आहे व माझ्या वडिलांचे व आत्याचे नाव वारस तपास व 6क मध्ये आहे पण त्या वेळी एक मोठी आत्या होती तिचे नाव त्यांनी वारस तपास केला तेव्हा सांगितले नाही व तेव्हा ती आत्या मयत होती आणि आता मी जेंव्हा सहिस्सेदार साठि अर्ज केला तेव्हा त्याचा नोटीस ला त्यांनी त्या आत्याचे वारस यांचे हि नाव आले पाहिजे म्हणून हरकत केली आहे, परंतु मी 6क प्रमाणे अर्ज केला आहे आता प्रकरण मंडळ अधिकारी यांच्याकडे आहे तर माझी नोंद होईल कि रद्द करतील व तिच्या वारसांना त्यांचे हक्क कसे मिळतील व मला वारस तपास कसा करता येईल मार्गदर्शन करा सर.
आशा करतो कि लवकरात लवकर मार्गदर्शन करावे

Unknown said...

नमस्कार सर,
आम्ही ३० वर्षांपासून पाटबंधारे विभागाचया जमिनीत राहत आहोत, सदर जमीन‌ आम्ही खरेदी करू शकतो का?

Umesh rahangdale talathi gondiya said...

सर वडिलोपार्जित जमिनीवर वारस नोंद घेतली आहे त्यावर 6 वारस पैकी 1 वारसाने हरकत घेऊन सदर फेरफार रद्द करून माझ्या नावाने मूर्तीपत्र केलेला आहे ,त्यामुळे फेरफार घेण्यासाठी हरकत घेतली आहे त्यामुळे आक्षेप नोंदवली आहे .आता फेरफार संबधी समोरील काय कार्यपद्धती केली पाहिजे याबद्दल मार्गरदर्शन करा सर.

Ankush said...

गावठाण जगा खरिदीसाठी काय करायला पाहिजे

Www.roshni.com said...

48 आर जमिनीचा पट्टा होईल का

Santosh Walgude said...

३६ घुंटे जमिनीचे वाटणी पत्र २ समान भागात करता इते का

Santosh Walgude said...

करता एत असल्यास कसे करता एईल त्याची काय प्रोसेस आहे त्यासाठी किती स्टॅम्प दुती लागते आणि किती ragistration fee लागते. कृपया माहिती द्या.

Unknown said...

उप विभागीय अधिकारी

Unknown said...

21दिवस

Unknown said...

सर आमची शेतजमीन जिल्हाधिकारी तथा उपसंचालक पुनवर्सन विभागाने आमचे आजोबा हयात असताना संपादित केली त्या जमिनीवर आमच्या काकांनी व वडिलांनी दावा दाखल केला आहे. पुनर्वसन विभागाला त्यांचे म्हणणे व जबाब मांडण्यासाठी
कोर्टाकडून 8 वेळा नोटीस बजावण्यात आली परंतु पुनर्वसन विभागाकडून फक्त मुदत वाढवून घेण्यात येत आहे त्यांचे म्हणणे लवकर येण्यासाठी काय करावे लागेल तसेच या विभागाकडून दावा प्रलंबित असताना धरणग्रस्तांना परस्पर जमिनीचे वाटप करण्यात येत आहे.व त्याची नोंद अधिकार अभिलेखात होऊ नये म्हणून तलाठी यांचेकडे हरकत घेतली असता मंडल अधिकारी हरकतीची दखल न घेता 15 दिवसाच्या मुदतीच्या आत नोंद घेऊन सातबारा उतारा देत आहेत तरी त्यांच्यावर काय कारवाई करता येईल.
विजय दीक्षित
जयसिंगपूर कोल्हापूर

Unknown said...

लाभ क्षेत्राबहेरील जमीन सरकार संपादित करू शकते का?
पाठबंदरेचा दाखला व नकाशा मध्ये लाभ क्षेत्रबहेरील जमीन असा लेखी उल्लेख आहे...
(चीकोत्रा खोरे)

Anonymous said...

बंदी उठवण्यात आली आहे. भोगवदार वर्ग २ मधुन १ करता येतो.

पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह said...

४२ ड नुसार अकृषक करण्यासाठी नगर रचना विभागाचा नाहरकत लागतो का ? सदर अकृषक करण्यासाठी अधिकार तहसिलदार यांना असतो का ?

Unknown said...

48 गुंठे सामाइक क्षेत्र आहे .त्यात 7 काका आहेत. प्रत्येकाला 7 गुन्थ्र् जमीन येते.तर वाटणी कशी करावी

Unknown said...

सर मि एक गुंठा जमीन घेतली आहे त्या जमिनीवर कलम 36आहे सदरील 1गुंठा जमीन ग्रामपंचायत मध्ये नोंद करीत नहीत

Unknown said...

सर, मला ६०७ गट नंबर चे जुने फेर फार हवे आहेत ,महाराष्ट् शासनाच्या पोर्टलवर पुणे जिल्ह्यातील माहिती दाखवत नाही. त्यासाठी काय करावे? प्लिज सांगा

Unknown said...

गावं-रहाटवडे ,तालुका-हवेली , जिल्हा- पुणे

Unknown said...

सर मला सांगा वाटणीपत्रात (वाटणीपत्रास मान्यता देणार ) हे वारसदार असतात का ? माझ्या वडिलांनी आणि चुलत्याने वाटणीपत्रात मला समाविष्ट केले नाही तर मी वारसदार होईल का ? 7775072060 sushilhivarkar82@gmail.com

Unknown said...

Garamin bhagatil 20gunthe navchi karnyasathi kay karva lagn

Unknown said...

Sir aamchy setjaminivr dusrya Don lokanchi nave aahet te kulkayda madye yetat tr tyanchi nave Kasi kadta yetil

Prakash Jagannath Kawade solapur 9890354906 said...

सातबारामधील वडील मयत झाल्यानंतर आई व आम्हा पाच जणाची नावे लागले आहेत. पैकी आईचे मयत झालिये तिचे नाव कमी करायचे आहे.मार्गदर्शन करा.

Unknown said...

सिलींग जमीन भोगवटा वर्ग-1 मधे होते का?
सिलींग जमीन बिनशेती होते का?
या सर्व प्रश्नांची कागदपत्रे कोणती ते सांग ही नंम्र विनंती...

«Oldest ‹Older   1 – 200 of 343   Newer› Newest»